• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Another Blow To Eknath Shindes Scheme Anandacha Shidha Scheme Closed Nras

Anandacha Shidha Yojna: एकनाथ शिंदेंच्या आणखी एक योजनेला धक्का; ‘आनंदाचा शिधा’ योजना बंद

२०२२ साली दिवाळीदरम्यान ही योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत केशरी रेशन कार्डधारकांना अवघ्या १०० रुपयांमध्ये चार अन्नपदार्थ दिले जात होते.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Mar 11, 2025 | 01:23 PM
Anandacha Shidha Yojna: एकनाथ शिंदेंच्या आणखी एक योजनेला धक्का; ‘आनंदाचा शिधा’ योजना बंद

Photo Credit- Social Media एकनाथ शिंदेंच्या आणखी एक योजनेला धक्का; ‘आनंदाचा शिधा’ योजना बंद

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई:  राज्य सरकारच्या ‘आनंदाचा शिधा’ या लोकप्रिय योजनेला आता पूर्णविराम मिळाला आहे. याबाबत आधीच अंदाज व्यक्त करण्यात आला होता, आणि आता त्यावर अधिकृत मुहर लागली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात सुरू झालेल्या या योजनेचा १ कोटी ६३ लाख लोकांना लाभ होत होता. सणासुदीच्या काळात रेशनकार्डधारकांना १ किलो रवा, १ किलो साखर, १ किलो चना डाळ आणि १ लिटर पामतेल योजनेअंतर्गत वितरित करण्यात येत होते. मात्र, ही योजना आता पूर्णतः बंद करण्यात आली आहे.

 लाखो लाभार्थ्यांवर परिणाम

राज्य सरकारने ‘आनंदाचा शिधा’ योजना बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात, २०२२ साली दिवाळीदरम्यान ही योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत केशरी रेशन कार्डधारकांना अवघ्या १०० रुपयांमध्ये चार अन्नपदार्थ दिले जात होते.

Maharashtra Budget: निधीवाटपातही शिंदेंसोबत दुजाभाव, भाजप, राष्ट्रवादीला जास्त तर शिवसेनेला कमी

यानंतर २०२३ मध्ये गुढी पाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, गणेशोत्सव आणि दिवाळी अशा चार प्रमुख सणांच्या काळातही लाभार्थ्यांना हा शिधा वितरित करण्यात आला होता. प्रत्येक वेळी सरकारने ५०० कोटी रुपयांचा खर्च करून लाभार्थ्यांना प्रत्येकी १ किलो रवा, चणा डाळ, साखर आणि १ लिटर सोयाबीन तेल वितरित केले होते. राज्यात १.६ कोटी लाभार्थी या योजनेच्या माध्यमातून लाभ घेत होते. मात्र, आता सरकारने ही योजना पूर्णपणे बंद केल्याने हजारो गरीब कुटुंबांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

आणखी एक योजना बंद होण्याच्या मार्गावर

राज्य सरकार आर्थिक अडचणींचा सामना करत असताना, काही कल्याणकारी योजना बंद करण्याचा विचार सुरू आहे.  त्यात उद्धव ठाकरे सरकारच्या काळात सुरू झालेली ‘शिवभोजन थाळी’ आणि एकनाथ शिंदे सरकारच्या काळातील ‘आनंदाचा शिधा’ या योजना बंद करण्याबाबत चर्चा झाली होती.

अर्थमंत्र्यांकडून जुन्याच प्रकल्पांना सोन्याचा मुलामा! मुंबई, ठाणे, भिवंडीमधील प्रकल्पांना ६४ हजार ७८३ कोटींची तरतूद

चालू आर्थिक वर्षात या दोन योजनांसाठी १,३०० कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. मात्र, सध्या राज्याची वित्तीय तूट दोन लाख कोटींच्या पुढे गेली असून ती सकल राज्य देशांतर्गत उत्पादनाच्या (GSDP) ३% इतकी आहे. गेल्या महिन्यात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या योजनांबाबत चर्चा करण्यात आली होती. येत्या मार्च महिन्यातील अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर यावर अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, माजी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून ‘शिवभोजन थाळी’ योजना बंद करू नये, अशी मागणी केली आहे. महाविकास आघाडीच्या काळात, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आणि छगन भुजबळ अन्न व नागरी पुरवठा मंत्री असताना ही योजना सुरू करण्यात आली होती.

Web Title: Another blow to eknath shindes scheme anandacha shidha scheme closed nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 11, 2025 | 01:23 PM

Topics:  

  • eknath shinde news

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Vehicles Fitness Test Fees: १५ नाही, आता १० वर्षांनंतर जुनी गाडी चालवणे पडू शकते महाग! सरकारने लागू केले नवे वाहन नियम 

Vehicles Fitness Test Fees: १५ नाही, आता १० वर्षांनंतर जुनी गाडी चालवणे पडू शकते महाग! सरकारने लागू केले नवे वाहन नियम 

Nov 19, 2025 | 03:10 PM
शिकाऱ्याचीच केली शिकार! नूडल्सप्रमाणे सापाला एका झटक्यातच गिळलं अन् किंग कोब्राच्या भयानक शिकारीचा Video Viral

शिकाऱ्याचीच केली शिकार! नूडल्सप्रमाणे सापाला एका झटक्यातच गिळलं अन् किंग कोब्राच्या भयानक शिकारीचा Video Viral

Nov 19, 2025 | 03:10 PM
दोन मुलींची अविवाहित आई; १० वर्षे चित्रपटांपासून दूर, तरीही १०० कोटींची संपत्ती, OTTवर पुन्हा केली धडाकेबाज एंट्री

दोन मुलींची अविवाहित आई; १० वर्षे चित्रपटांपासून दूर, तरीही १०० कोटींची संपत्ती, OTTवर पुन्हा केली धडाकेबाज एंट्री

Nov 19, 2025 | 03:08 PM
कोण आहे मान्य आनंद? जिने धनुषच्या मॅनेजरवर केला कास्टिंग काउचचा आरोप

कोण आहे मान्य आनंद? जिने धनुषच्या मॅनेजरवर केला कास्टिंग काउचचा आरोप

Nov 19, 2025 | 03:05 PM
पाण्याचा प्रत्येक थेंब शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी!  विभागांनी समन्वयाने काम करण्यावर दिला भर

पाण्याचा प्रत्येक थेंब शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी! विभागांनी समन्वयाने काम करण्यावर दिला भर

Nov 19, 2025 | 03:04 PM
शिरोली औद्योगिक वसाहतीत दोन कारखानदारात जोरदार हाणामारी; कंपनीमध्ये घुसून मारहाण

शिरोली औद्योगिक वसाहतीत दोन कारखानदारात जोरदार हाणामारी; कंपनीमध्ये घुसून मारहाण

Nov 19, 2025 | 03:03 PM
Navi Mumbai : नवी मुंबईत शिवछत्रपती स्मारक वाद तापला!

Navi Mumbai : नवी मुंबईत शिवछत्रपती स्मारक वाद तापला!

Nov 19, 2025 | 03:02 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Raigad : बिनविरोध विजयाची कमान राष्ट्रवादीकडे! वसुधा पाटीलांचा बिनविरोध विजय ठरला चर्चेचा विषय

Raigad : बिनविरोध विजयाची कमान राष्ट्रवादीकडे! वसुधा पाटीलांचा बिनविरोध विजय ठरला चर्चेचा विषय

Nov 19, 2025 | 02:58 PM
Ratnagiri : रत्नागिरी महायुतीची दमदार तयारी!

Ratnagiri : रत्नागिरी महायुतीची दमदार तयारी!

Nov 18, 2025 | 03:07 PM
Kalyan : कल्याणमध्ये गावठी पिस्टलसह इतर शस्त्रें बाळगणाऱ्यालास अटक

Kalyan : कल्याणमध्ये गावठी पिस्टलसह इतर शस्त्रें बाळगणाऱ्यालास अटक

Nov 18, 2025 | 03:03 PM
Sindhudurg : वेंगुर्ल्यात शिवसेना(उबाठा) चा एकला चलो रे चा नारा

Sindhudurg : वेंगुर्ल्यात शिवसेना(उबाठा) चा एकला चलो रे चा नारा

Nov 18, 2025 | 03:00 PM
Ulhasnagar : मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचे लढा, उल्हासनगरात आमरण उपोषणाला सुरुवात

Ulhasnagar : मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचे लढा, उल्हासनगरात आमरण उपोषणाला सुरुवात

Nov 18, 2025 | 02:57 PM
Bihar Election: बिहार निकालामुळे बार्गेनिंग पावर कुणाची घटली ?

Bihar Election: बिहार निकालामुळे बार्गेनिंग पावर कुणाची घटली ?

Nov 18, 2025 | 02:53 PM
Ahilyanagar : जिल्ह्यात बिबट्याची दहशत; गावकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण

Ahilyanagar : जिल्ह्यात बिबट्याची दहशत; गावकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण

Nov 17, 2025 | 08:21 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.