Manoj Jarange
जालना : मराठा आरक्षणासाठी आग्रही भूमिका घेणारे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. त्यांचे हे संकेत मिळताच त्यांच्याकडे 800 हून अधिक इच्छुक उमेदवारांचे अर्ज आले आहेत. यामुळे आंतरवाली सराटीत मराठा समाजाच्या इच्छुक उमेदवारांची तोबा गर्दी झाली आहे.
मराठा आंदोलनाच्या माध्यमातून जरांगे पाटील यांनी राज्यात आपला ठसा उमटवला आहे. त्यांच्या दसरा मेळाव्याला झालेली गर्दी सत्ताधाऱ्यांसह विरोधी महाविकास आघाडीच्याही
उरात धडकी भरवणारी होती. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी माध्यमांशी बोलताना आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आपल्याकडे 800 हून अधिक इच्छुक उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाल्याची माहिती दिली आहे.
तसेच इच्छुक उमेदवारांशी मी उद्यापासून संवाद साधणार आहे. त्यानंतर 20 ऑक्टोबर रोजी निवडणूक लढवायची की सत्ताधाऱ्यांचे आमदार पाडायचे, याबाबतचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती मनोज जरांगे यांनी दिली.
लोकसभा निवडणुकीपूर्वी अनेक नेत्यांनी सत्ताधारी भाजपमध्ये प्रवेश केला होता. पण लोकसभा निवडणुकीत भाजपची हाराकिरी झाल्यामुळे ते आपल्या निर्णयावर फेरविचार करत आहेत.
तिसऱ्या आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरला
लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यात विधानसभा निवडणुका घेतल्या जाणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिसऱ्या आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरला आहे. सत्ता आल्यास मनोज जरांगे मुख्यमंत्री होतील. याबाबतची अधिकृत घोषणा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न आंबेडकर यांनी यापूर्वी केली.