सातारा : सातारा जिल्हातील आशा व गटप्रवर्तक युनियनच्या वतीने शुक्रवारी अध्यक्ष आनंदी अवघडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले . आंदोलक महिलांनी भर उन्हात बसून ‘मानधन आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे’ अशा जोरदार घोषणा दिल्या. याबाबतचे निवेदन जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आले
आशा सेविकांना 7000 तर गटप्रवर्तकांना 6200 असे मानधन 18 ऑक्टोबरला आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी मंजूर केले होते . 12 जानेवारी रोजी गटप्रवर्तकांना आशांपेक्षा कमी वाढ झाली म्हणून त्यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दरे या त्यांच्या मूळ गावी भेट घेतली होती . 9 फेब्रुवारी 2024 पासून मुख्यमंत्री ठाणे येथे आहे वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या आणि मानधन वाढीचा जीआर द्या अशी मागणी यावेळी करण्यात आली होती . ठाणे येथे जास्त दिवस आंदोलन करता येणार नाही म्हणून आशा व गटप्रवर्तक संघटनेने आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन सुरू केले आहे . मात्र राज्य शासन या आंदोलनाची अध्यक्ष दखल घेत नाही
या आंदोलनाकडे लक्ष वेधण्यासाठी आनंदी अवघडे यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्ह्यामध्ये आशा व गटप्रवर्तक युनियनने जिल्हाधिकारी कार्यावर जोरदार घोषणाबाजी केली रस्त्यावर उन्हात बस्कन मारून त्यांनी राज्य शासनाच्या वेळ काढून निषेध केला . या आंदोलनामध्ये कल्याणी सोमदे, रूपाली पवार, चित्रा झिरपे ,जयश्री काळभोर, राणी कुंभार, पुष्पा मसणे, सुवर्णा पाटील ,शैला साळुंखे, सीमा भोसले इत्यादी आंदोलन महिला सहभागी झाल्या होत्या