मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Maharashtra Navnirman Sena) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी गायिका आशा भोसले यांनी शिवतीर्थ ( Asha Bhosale At Shivtirth) निवासस्थानी भेट दिली. गेल्या महिन्यातच राज ठाकरेंवर हिपबोनची शस्त्रक्रिया (Operation Of Raj Thackeray) झाली होती. त्या पार्श्वभूमीवरच आशा भोसले यांनी ठाकरेंची भेट घेतली आहे.
[read_also content=”५० पेक्षा अधिक दुकानांच्या अतिक्रमणाला कात्री, इतवारा परिसरात मनपाची अतिक्रमण निर्मूलन कारवाई https://www.navarashtra.com/maharashtra/encroachment-of-more-than-50-shops-itwara-locality-encroachment-removal-action-of-municipality-nraa-306466/”]
राज ठाकरेंची प्रकृती आता उत्तम असून ते पक्षाच्या कामामध्ये सक्रिय होत आहेत. काही दिवसांपूर्वी मनसेचे (MNS) महत्त्वाचे नेते, सरचिटणीस आणि विभाग अध्यक्षांची बैठक मुंबईत (Mumbai) झाली, ज्यात त्यांनी मार्गदर्शन केलं. काही दिवसांपुर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राज ठाकरे यांची भेट घेतली होती पण या भेटीच्या निमित्ताने राजकीय चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.
विशेषत: आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीवर चर्चा झाली असल्याची अधिक शक्यता आहे. एकीकडे राज ठाकरे पुन्हा सक्रिय होत असताना त्यांचे पुत्र अमित ठाकरे महासंपर्क अभियान घेत आहेत. अमित ठाकरे यांनी नुकताच कोकण दौरा केला होता. यात अमित ठाकरेंनी मनसेच्या विद्यार्थी सेनेच्या बांधणीवर विशेष लक्ष दिलं.