या ऐतिहासिक उपक्रमात भारत, इजिप्त, मेसोपोटेमिया, ग्रीस, रोम, पारस आणि चीन तसेच अविभाजित भारताच्या प्रांतांमधील संस्कृतींच्या कथा सांगणाऱ्या सुमारे 300 निवडक पुरातत्त्वीय वस्तूंचा समावेश आहे. सिंधू–सरस्वती (हडप्पा) संस्कृतीपासून सुरू होणाऱ्या या प्राचीन वारशाद्वारे भारतभरातील विद्यापीठे आणि शाळांना वस्तूंमधून इतिहास शिकवण्यास प्रोत्साहन देणे हा या दालनाचा मुख्य हेतू आहे.
गेल्या चार वर्षांपासून राबविलेल्या या महत्त्वपूर्ण प्रयत्नाला Getty च्या ‘शेअरिंग कलेक्शन्स प्रोग्रॅम’चे सहकार्य लाभले आहे. CSMVS आणि त्याचे दीर्घकालीन भागीदार ब्रिटिश म्युझियम, लंडन यांच्या आंतरराष्ट्रीय सहकार्याचा हा परिणाम आहे. तसेच स्टॅटलिशे म्युजेअन सु बर्लिन, म्युझियम रिएटबर्ग (झुरिच), आणि प्रथमच बेनकी म्युजियम (अथेन्स), अल-सबाह कलेक्शन (कुवेत), तसेच इफोरेट ऑफ अँटिक्विटीज ऑफ द सिटी ऑफ अथेन्स यांनीही या उपक्रमात सहभाग नोंदविला आहे.
या प्रकल्पास भारत सरकारच्या संस्कृति मंत्रालयाचे समर्थन प्राप्त झाले असून, पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग (ASI), राष्ट्रीय संग्रहालय नवी दिल्ली, अलाहाबाद संग्रहालय प्रयागराज, महाराष्ट्र शासनाचे पुरातत्त्व व संग्रहालय विभाग, इंडियन म्युझियम कोलकाता, बिहार संग्रहालय पटना, शासन संग्रहालय मथुरा आणि राज्य संग्रहालय लखनौ या संस्थांच्या समृद्ध संग्रहातील बहुमूल्य प्राचीन वस्तूंचाही समावेश आहे.
भारत आणि जगातील 15 महत्त्वपूर्ण संग्रहालयांमधील 300 हून अधिक अप्रतिम पुरातत्त्वीय वस्तूंच्या माध्यमातून प्राचीन भारताची जगाशी असलेली सांस्कृतिक, व्यापारी आणि वैचारिक नाळ उलगडून दाखवणारा हा एक क्रांतिकारी उपक्रम आहे. मानवजातीने एकमेकांसोबत राहणे, विचारांची देवाणघेवाण करणे आणि ज्ञान व संस्कृतीची दीर्घकालीन परंपरा उभारणं याचा अद्वितीय प्रवास या दालनात पाहायला मिळेल. या कथा वेगळ्या असल्या, तरी त्या एकमेकांशी निगडित आणि सामायिक मानवी इतिहासाचा भाग आहेत. प्राचीन जग आपल्या वर्तमानाची पायाभरणी आहे आणि आजही आपल्यावर प्रभाव टाकते. इतिहास समजून घेण्यासाठी जागतिक दृष्टीकोन आवश्यक आहे.” महासंचालक, CSMVS सब्यसाची मुखर्जी यांनी सांगितलं आहे.
“आज संग्रहालये केवळ वस्तू जतन करणारी ठिकाणे नाहीत, इतिहासाशी निगडीत शिक्षण, संवाद आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीची केंद्रे आहेत. ‘नेटवर्क्स ऑफ द पास्ट’ जगभरातील संग्रहांना एकत्र आणत प्राचीन संस्कृतींमधील पाळमुळं जाणून घेण्यास मदत करतं. या उपक्रमाला पाठिंबा देताना आनंद आहे. कलाकृती नव्या संदर्भात पाहिल्या की नवीन नाती, नवे विचार आणि नवीन दृष्टीकोन निर्माण होतात.”
— डॉ. कॅथरीन ई. फ्लेमिंग, अध्यक्ष आणि CEO, जे. पॉल गेट्टी ट्रस्ट
Ans: या ऐतिहासिक उपक्रमात भारत, इजिप्त, मेसोपोटेमिया, ग्रीस, रोम, पारस आणि चीन तसेच अविभाजित भारताच्या प्रांतांमधील संस्कृतींच्या कथा सांगणाऱ्या सुमारे 300 निवडक पुरातत्त्वीय वस्तूंचा समावेश आहे. सिंधू–सरस्वती (हडप्पा) संस्कृतीपासून सुरू होणाऱ्या या प्राचीन वारशाद्वारे भारतभरातील विद्यापीठे आणि शाळांना वस्तूंमधून इतिहास शिकवण्यास प्रोत्साहन देणे हा या दालनाचा मुख्य हेतू आहे.
Ans: भारत (सिंधू–सरस्वती/हडप्पा संस्कृती), इजिप्त, मेसोपोटेमिया, ग्रीस, रोम, पारस, चीन तसेच अविभाजित भारतातील विविध प्रांतांच्या संस्कृतींचा समावेश आहे.
Ans: भारत सरकारचे संस्कृति मंत्रालय, ASI, राष्ट्रीय संग्रहालय नवी दिल्ली, अलाहाबाद संग्रहालय, महाराष्ट्र शासनाचा पुरातत्त्व व संग्रहालय विभाग, इंडियन म्युझियम कोलकाता, बिहार संग्रहालय पटना, मथुरा व लखनौ येथील संग्रहालयांचा सहभाग आहे.






