शैक्षणिक धोरणात महत्त्वपूर्ण तरतुदी
महाराष्ट्र धर्मनिरपेक्ष शिक्षक संघटना (मस्ट) आयोजित ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरणः २०२०- विद्यार्थी, शिक्षक व समाजावरील परिणाम व आव्हाने’ या विषयावर आयोजित कार्यशाळेत प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी व पालक यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
प्राध्यापक, विद्याथ्यांच्या प्रश्नाचे शंकानिरसन
कार्यशाळेचे उद्घाटन कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. लवचिक व प्रभावी नव्या शैक्षणिक धोरणाची रचना, बहुभाषिक शिक्षण, कौशल्याधारित अभ्यासक्रम व डिजिटल शिक्षण पद्धती यांविषयी अभ्यासपूर्ण मार्गदर्शन करीत प्राचार्य, प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे देऊन उपस्थितांशी त्यांनी संवाद साधला. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीत काळानुरूप अनेक महत्त्वपूर्ण बदल सूचविलेले असून भविष्यात विद्याथ्यांच्या शिक्षण व करिअरच्या दृष्टीने अनेक नव्या संधी उपलब्ध होत आहेत. ‘मस्ट’ चे अध्यक्ष डॉ. विजय पवार यांनी या कार्यशाळेमागची भूमिका प्रास्ताविकातून मांडली.
विद्यार्थी, प्राध्यापक आणि शैक्षणिक क्षेत्रातील घटकांना जाणवत असणाऱ्या प्रश्नांबद्दल चर्चा घडवून आणावी आणि योग्य असे मार्गदर्शन मिळावे या हेतूने कार्यशाळेचे आयोजन केल्याचे डॉ. पवार यांनी सांगितले. शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्नांबाबत ‘मस्ट’ संघटना सातत्याने प्रयत्नशील असून सर्व घटकांना बरोबर घेऊन कार्य करत असल्याचे त्यांनी नमूद केले, शैक्षणिक धोरणात अत्यंत महत्त्वाचे योगदान दिलेले मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी या कार्यशाळेला मार्गदर्शक म्हणून लाभले याबद्दल त्यांनी आनंद व समाधान व्यक्त केले.






