औरंगाबाद : राज्यपाल भगत सिंग कोश्यारी ()आणि भाजपचे (BJP) राष्ट्रीय प्रवक्ता सुधांशू त्रिवेदी (Sudhanshu Trivedi) यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद राज्यभरात उमटत आहे. त्यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ काल राज्यभरात विविध ठिकाणी आंदोलनही करण्यात आली. दरम्यान आज औरंगाबादच्या कन्नड तालुक्यात आज सुधांशू त्रिवेदी यांचा निषेध म्हणून बंदची हाक देण्यात आली आहे.
[read_also content=”जॉनसन्स ॲण्ड जॉनसन्स कंपनीला एफडीएने ठोठावला १६ लाखांचा दंड https://www.navarashtra.com/india/johnson-johnson-company-was-fined-16-lakhs-by-fda-347154.html”]
सुधांशू त्रिवेदी यांनी दोन दिवसापूर्वी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर राज्यभरात त्यांच्या विरोधात मोठा संताप पाहायला मिळत आहे. तसेच राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनीही एका कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज आणि नितीन गडकरी यांची तुलना करत वादग्रस्त विधान केलं होतं. यावरुन काल राज्यभरात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाल. त्यांच्या वक्तव्याचा विरोध करत औरंगबादमध्ये माजी आमदार हर्षवर्धन जाधव (Harshvardhan Jadhav) यांनी या बंदची हाक दिली आहे. याबाबतचा याबाबत जाधव यांनी एक व्हिडीओ देखील पोस्ट केला आहे.