लातूर : भादा, शिवली मार्गे औसा ते मुरूड या रस्ता कामासाठी शासनाकडे आग्रही मागणी करून या कामासाठी निधी उपलब्ध करून घेतला जाईल व लवकरात लवकर या रस्त्याचे काम रुंदीकरणासह केले जाईल, असे भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार रमेश कराड यांनी औसा तालुक्यातील मौजे भादा येथून या मागणीसाठी पायी आलेल्या पंचेवीसपेक्षा अधिक तरूणांना आश्वासन दिले.
औसा ते मुरूड भादा, वरवडा, शिवली, शिंदेवाडी मार्गे जाणारा रस्ता राज्यमार्ग मंजूर आहे. या संपूर्ण रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून, रस्त्यात खड्डे की खड्यात रस्ते असा प्रश्न प्रत्येकानाच पडल्याशिवाय राहत नाही. सदर रस्त्यावरून दररोज तालुक्याच्या व जिल्हयाच्या ठिकाणी भाजीपाला, दुध, फुले घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्याबरोबरच रोजी रोजगार व उद्योगधंद्यासाठी तरूणांना जावे लागते. शाळा कॉलेजसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना व शासकीय कामासाठी सर्वसामान्य नागरीकांना सतत या रस्त्यावरून जावे लागते. प्रवास करणाऱ्या प्रत्येकाला आपला जिव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. या रस्त्यावर काहींना आपला जिव गमवावा लागला आहे.
सदरील रस्त्याची दुरावस्था आणि सर्वसामान्य नागरीकांना होणारा त्रास लक्षात घेवून, औसा तालुक्यातील मौजे भादा येथील पंचेवीसहून अधिक तरूणांनी अंबाजोगाई रोड वरील संवाद या संपर्क कार्यालयात भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेश कराड यांची भेट घेवून रस्त्याची दुरावस्था सांगून याबाबतचे सविस्तर निवेदन देवून हा प्रश्न प्राधान्याने सोडवावा, अशी आग्रहाची मागणी केली.
भादा येथील शिष्टमंडळाशी चर्चा करताना कराड यांनी भादा, शिवली मार्गे औसा ते मुरूड या रस्ता कामासाठी शासनाकडे आग्रह धरून या रस्त्याचे काम तात्काळ सुरू व्हावे यासाठी संबंधीताकडून निधी उपलब्ध करून घेतला जाईल व लवकरात लवकर या रस्त्याचे काम रुंदीकरणासह केले जाईल असे आश्वासन दिले.
[read_also content=”आरबीआयच्या नियमांचे पालन करून बारामती बँकेचा नावलौकिक वाढवू : अजित पवार https://www.navarashtra.com/maharashtra/we-will-enhance-the-reputation-of-baramati-bank-by-following-rbi-norms-ajit-pawar-nrdm-329696.html”]
भादा येथून पायी आलेल्या या शिष्टमंडळात अमोल पाटील, सुर्यकांत उबाळे, सचिन मुकडे, योगेश पाटील, जयप्रकाश हजारे, बबलू हजारे, शंभू पाटील, सुरेश शिंदे, फिरोज पठाण, प्रदिप उबाळे, संतोष कांबळे, शंकर मोहिते, कलिम शेख, शंकर गावळी, बालाजी चौधरी, मारूफ पठाण, राजाभाऊ गाडेकर, उजय उबाळे, सुरेश भोजने, परमेश्वर देवणे, भिमाशंकर पाटील, भाऊसाहेब कात्रे, श्रीमंत दरेकर, गणपती आगलावे, सदाशिव क्षीरसागर, विजय खंदारे, राज पठाण यांच्यासह अनेकांचा समावेश होता.