(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
मुंबई: अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात गंभीर जखमी झाला होता. अखेर सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीला आज वांद्रे कोर्टात हजर करण्यात आले होते. सुनावणी दरम्यान कोर्टाने सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अभिनेता सैफ अली खानवर हल्ला केलेल्या आरोपी मोहम्मद शहजादची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे.
अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करण्यात आलेल्या आरोपीला आज वांद्रे कोर्टात हजर करण्यात आले. दरम्यान सुनावणीदरम्यान, पोलिसांनी 14 दिसवयांच्या कोठडीची मागणी केली होती. मात्र कोर्टाने या आरोपीला 5 दिवसांची कोठडी सुनावली आहे. अटक करण्यात आलेल्या मोहम्मद शहजाद हा बांग्लादेशी घुसखोर असल्याची माहिती समोर येत आहे.
जुहू पोलिसांना मिळाली होती माहिती
जुहू पोलिस स्टेशनला माहिती मिळाली होती की, सैफ अली खान हल्ला प्रकरणातील एक संशयित ज्ञानेश्वरी एक्सप्रेसने प्रवास करत आहे. त्यानंतर संशयिताचा फोटो पाठवण्यात आला. यानंतर दुर्ग स्थानकावर दोन पथके तयार करण्यात आली. रेल्वे दुर्गला पोहोचली तेव्हा संशयिताला ताब्यात घेतले.
हेही वाचा: सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या ‘त्या’ संशयिताला अखेर बेड्या; छत्तीसगडच्या दुर्गमधून घेतलं ताब्यात
सैफवर सहा वार
गुरुवारी पहाटे सैफ अली खानवर त्याच्या घरात चोरट्याने हल्ला केला होता. चोर काही तासांपूर्वी घरात घुसला होता. जेव्हा सैफच्या मोलकरणीने चोराला पाहिले तेव्हा तिने अलार्म वाजवला. परिस्थिती हाताळण्यासाठी सैफ अली खान पोहोचला, पण चोराने त्याच्यावर चाकूने हल्ला केला. यादरम्यान सैफवर सहा वेळा चाकूने वार करण्यात आले. वैद्यकीय अहवालांनुसार, त्याच्या पाठीच्या कण्यापासून चाकूचा 2.5 इंचाचा भाग काढून टाकण्यात आला. सध्या सैफ अली खानची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.
सैफ अली खानवरील हल्ल्याबाबत अधिकृत निवेदन जारी
सैफ अली खानवर त्याच्या घरी एक अज्ञाताने चाकूने हल्ला केला आहे. यादरम्यान आता बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार घेत आहे. दरम्यान, अभिनेत्याचे अधिकृत विधान समोर आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, ‘अभिनेता सैफ अली खानच्या घरी चोरीचा प्रयत्न करण्यात आला. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात शस्त्रक्रिया सुरू आहे. आम्ही मीडिया आणि चाहत्यांना विनंती करतो की कृपया धीर धरा. ही पोलिसांची बाब आहे. पुढील परिस्थितीबद्दल आम्ही तुम्हाला माहिती देत राहू.’ असे लिहून अभिनेत्याच्या टीमने हे विधान जाहीर केले आहे.
हेही वाचा: Saif Ali Khan: सैफ अली खानवरील हल्ल्याबाबत अधिकृत निवेदन जारी, सैफच्या टीमने काय म्हटले?
पोलिसांची प्रतिक्रिया
वांद्रे डीसीपी म्हणाले, हे खरे आहे, एक अज्ञात व्यक्ती पहाटे २.३० वाजता सैफ अली खानच्या घरात घुसला. यादरम्यान एका चोराने सैफ अली खानवर चाकूने हल्ला केला. यानंतर, त्यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले, असे डीसीपीने सांगितले. तथापि, या दुखापती इतक्या गंभीर नाहीत. हाणामारीत त्याला चाकूने वार करण्यात आले की जखमी झाली आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या बातमीने अभिनेत्याचे चाहते चांगलेच चकित झाले आहेत.