एनसीपी पक्षाकडून अजित पवार पुत्र पार्थ पवारांना राज्यसभेची उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे (फोटो - सोशल मीडिया)
राष्ट्रवादी पक्षाच्या कोअर कमिटीची मुंबईमध्ये बैठक पार पडली. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे उपस्थित होते. या बैठकीमध्ये पार्थ पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्याचबरोबर 26 फेब्रुवारीला होणाऱ्या राष्ट्रीय अध्यक्ष निवडीसंदर्भात आयोजित केल्या जाणाऱ्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक तयारीविषयी या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. काही दिवसांमध्ये वरळी डोम येथे राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होणार आहे. यावेळी सुनेत्रा पवार यांच्या नावावर राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून शिक्कामोर्तब केले जाणार आहे.
हे देखील वाचा : हरदीपसिंग पुरींच्या मुलीचे नाव अमेरिकेतील ‘अनक्लेम्ड प्रॉपर्टी’ यादीत; नेमकं काय आहे प्रकरण?
भारतीय निवडणूक आयोगाने १० राज्यांमधील ३७ रिक्त राज्यसभेच्या जागांसाठी द्वैवार्षिक राज्यसभेच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत. यामध्ये महाराष्ट्रसह ओडिशा, तेलंगणा, तामिळनाडू, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, आसाम, हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि बिहार या राज्यांचा समावेश आहे. मतदानाची तारीख १६ मार्च २०२६ रोजी निश्चित करण्यात आली आहे. मतमोजणी त्याच दिवशी होईल. एप्रिलमध्ये या जागा वेगवेगळ्या तारखांना रिक्त होणार आहेत यासाठी आयोगाने निर्णय घेतला आहे.
हे देखील वाचा : लव्ह मॅरेज करताय? तर थांबा ! आता आई-वडिलांना सांगावंच लागणार; अन्यथा…
राज्यसभेमध्ये सर्वात जास्त जागा या महाराष्ट्राच्या असणार आहेत. महाराष्ट्रामध्ये सात खासदारांच्या जागांसाठी मतदान होणार आहे. तर यावर्षी सात खासदारांचा कार्यकाळ संपणार आहे. यामध्ये डॉ. भगवत किशनराव कराड, डॉ फ़ौज़िया तहसीन अहमद खान, प्रियंका चतुर्वेदी, शरद पवार, धैर्यशील पाटील, रजनी अशोकराव पाटील, रामदास आठवले यांच्या नावाचा समावेश आहे. मात्र राज्याचे राजकारण आणि समीकरण पूर्णपणे बदलल्यामुळे कोणते खासदार पुन्हा राज्यसभेवर जाणार आणि कोणाला नवीन संधी मिळणार याची उत्सुकता लागली आहे.






