Barkya gang involved in house burglaries and vehicle thefts arrested pune police
पुणे, गुन्हेगारांच्या टोपन नावाने पुण्यातील गुन्हेगारीक्षेत्र कायम चर्चेत असते. वयाने अल्पवयीन (बारका) असणाऱ्या सराईताने टोळीचे नामकरणच “बारक्या”करून गुन्हेगारी सुरू केली. घरफोड्या अन् वाहन चोरीत तरबेज असणाऱ्या या बारक्या टोळीला गुन्हे शाखेने जेरबंद केले असून, त्यांच्याकडून ६ गुन्ह्यांची उकलकरत तब्बल १२ लाख ७१ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
तडीपार गुंडासह चौघांना बेड्या, 4 पिस्तूल जप्त; गुन्हे शाखेची कारवाई
पृथ्वीराज उर्फ साहील संतोष आव्हाड (वय १९, रा. हडपसर), आनंद उत्तरेश्वर लोंढे (वय ३४), आर्यन कैलास आगलावे (वय १८), कुलदीप गणपत सोनवणे (वय १९) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर, टोळीचा म्होरक्या १७ वर्षीय असून, तो दुसऱ्या गुन्ह्यात ताब्यात घेतलेले आहे. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक वाहिद पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील रमेश मेमाणे, कानिफनाथ कारखेले व त्यांच्या पथकाने केली आहे.
समलैंगिक APP वर ओळख, भेटण्यास बोलावले अन्…; पुण्यातील धक्कादायक प्रकार
टोळीचा म्होरक्या असलेला अल्पवयीन मुलावर हडपसरमधील दरोड्याच्या गुन्ह्यात मोक्का कारवाई झाली होती. तो तेव्हा टोळीचा सदस्य होता. त्याला रिमांड होममध्ये दाखल केल्यानंतर तो काही महिन्यांनी बाहेर आला. नंतर त्याने आरोपींना सोबत घेऊन टोळी निर्माण केली. त्यांनी शहरात घरफोड्या व वाहन चोरीचे गुन्हे सुरू केले. अलंकार, चतु:श्रृंगी, हडपसर तसेच लोणीकंद भागात गुन्हे केले असल्याचे तपासात समोर आले आहे. त्यांच्याकडून वाहन चोरीचे चार आणि घरफोडीचे दोन गुन्हे उघडकीस आणत १२ लाख ७१ हजार रुपयांचा ऐवज देखील जप्त केला आहे.
लोंढेकडे चोरीच्या मुद्देमाल विक्रीची जबाबदारी
बारक्या टोळीने काही दिवसातच धुमाकूळ घालण्यास सुरूवात केली. घऱफोडी व वाहन चोरीत तरबेज असणाऱ्या आरोपींनी चोरलेले सोने विक्री करण्यासाठी आनंद लोंढे याच्याकडे जबाबदारी दिली होती. तो सोने विक्री करायचा किंवा गोल्ड लोनमध्ये द्यायचा. बाणेर येथील एका गोल्ड लोन कंपनीत त्यांनी काही सोने ठेवले होते.
नशा आणि मौजमजा
बारक्या टोळीला नशा करण्याची सवय आहे. पोलीस आता ते नेमकी नशा अमली पदार्थांची करतात याचा तपास सुरू केला आहे. नशा आणि चोरीच्या पैशांमधून आरोपी मौजमजा करत असल्याचे समोर आले आहे. त्यांनी पैसे नेमके कुठे उडविले याची माहिती घेतली जात आहे.