Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 14 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Solapur News: “ऊस बिलासाठी रणसंग्राम”, तोडगा निघेना; पाचव्या दिवशीही शेतकऱ्यांचे उपोषण सुरू

दक्षिण सोलापूरच्या धोत्री येथील गोकुळ साखर कारखान्याकडे १३० कोटींचे ऊस बिल थकीत असल्याने सोलापूर व धाराशिवमधील शेतकऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ५ व्या दिवशीही उपोषण सुरू आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: May 29, 2026 | 06:12 PM
Solapur News: “ऊस बिलासाठी रणसंग्राम”, तोडगा निघेना; पाचव्या दिवशीही शेतकऱ्यांचे उपोषण सुरू
Follow Us
Follow Us:
  • सोलापुरात ऊस उत्पादकांचा एल्गार!
  • ‘गोकुळ’ कारखान्याकडे १३० कोटी थकीत
  • जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर चूल पेटवून पाचव्या दिवशीही उपोषण सुरूच
सोलापूर शहर प्रतिनिधी : दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री येथील गोकुळ साखर कारखान्याकडे तब्बल 130 कोटी रुपयांचे ऊस बिल थकीत असल्याने सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेले शेतकऱ्यांचे बेमुदत उपोषण शुक्रवारी पाचव्या दिवशीही कायम राहिले. अद्याप कोणताही ठोस तोडगा न निघाल्याने आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दखल घेत दक्षिण सोलापूरचे तहसीलदार किरण जमदाडे यांनी शेतकरी प्रतिनिधी व कारखाना प्रशासनासोबत बैठक घेतली. यावेळी कारखान्याकडून ऊस बिलासाठी वेळ मागण्यात आला. तर नियमानुसार आरआरसी कारवाई करून शेतकऱ्यांची रक्कम मिळवून देण्यासाठी सुमारे दोन महिन्यांचा कालावधी लागू शकतो, अशी भूमिका प्रशासनाने मांडली. मात्र “जोपर्यंत खात्यावर पैसे जमा होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही,” असा निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केला.

‘ऊस बिलासाठी रणांगण!’ सोलापुरात शेतकऱ्यांचे बेमुदत ठिय्या आंदोलन तीव्र; प्रशासनाची विनंती धुडकावली

आंदोलनस्थळीच शेतकऱ्यांनी चूल पेटवत डाळ-भात शिजवून उदरनिर्वाह सुरू केला आहे. “ऊस बिल मिळेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच डाळ-भात शिजवून खाऊ,” अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयाने कारखान्यावर जप्तीचे आदेश काढल्याची माहिती समोर आली आहे. तरीही प्रत्यक्ष रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे आंदोलनकर्ते अमोल पाटील यांनी सांगितले.

शुक्रवारी आमदार प्रवीण स्वामी यांनी आंदोलनस्थळी भेट देत शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी शेतकरी संघटनांचे पदाधिकारी तसेच अरविंद घोडके, अंबादास शिवशंकर, सचिन जवळगे, प्रशांत सुरवसे, गणेश नरे यांच्यासह तीस गावांतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“कारखान्याचा लिलाव होईना; कारखानदार बिलही देईना”

ऊस बिलाच्या रकमेकरिता सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी मागील पाच दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत आहेत. मात्र ना कारखान्याकडून पैसे मिळत आहेत, ना प्रशासनाकडून ठोस कारवाई होत आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून त्यांच्या संतापात दिवसेंदिवस भर पडत आहे.

प्रवीण स्वामींची आंदोलन स्थळाला भेट

सोलापूर जिल्हा अधिकारी कार्यालयापुढे गोकुळ शुगर कारखान्याने ऊस बिल थकवल्याविरोधात गेली पाच दिवसापासून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्याकरिता व शेतकऱ्यांशी चर्चा करण्याकरिता शुक्रवारी उमरग्याचे आमदार प्रवीण स्वामी यांनी आंदोलन स्थळी भेट देत शेतकऱ्यांसमवेत चर्चा करत सोलापूरचे जिल्हाधिकारी, तहसीलदार जमदाडे, गोकुळ शुगरचे चेअरमन दत्ता शिंदे यांना फोन द्वारे चर्चा केल्याचे आंदोलन शेतकरी सांगितले.

“चित्रपटांपेक्षा माणसांची ‘होप’ बनण्यातच खरे समाधान”- सोनू सूद; मोहोळ तालुक्यातील मसलेचौधरी गाव दत्तक

Web Title: Battle for sugarcane dues no resolution in sight farmers hunger strike continues into the fifth day

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 29, 2026 | 06:12 PM

Topics:  

  • Farmer Protest
  • Solapur
  • Sugarcane

संबंधित बातम्या

‘विठ्ठल रुक्मिणी वारकरी योजना-2026’ लागू; अपघाती मृत्यू, अपंगत्व आणि उपचारांसाठी लाखोंची आर्थिक मदत
1

‘विठ्ठल रुक्मिणी वारकरी योजना-2026’ लागू; अपघाती मृत्यू, अपंगत्व आणि उपचारांसाठी लाखोंची आर्थिक मदत

‘सगळं उद्ध्वस्त होईल…’, शेतकऱ्यांचा संताप, पंजाबमध्ये India-US Trade Deal विरोधात आंदोलन, नेमक्या मागण्या काय?
2

‘सगळं उद्ध्वस्त होईल…’, शेतकऱ्यांचा संताप, पंजाबमध्ये India-US Trade Deal विरोधात आंदोलन, नेमक्या मागण्या काय?

पूर नियंत्रणाच्या कामात अडथळा; सोलापुरात जमीन मालकावर गुन्हा, स्टॉर्म वॉटर ड्रेन प्रकल्प रोखल्याचा आरोप
3

पूर नियंत्रणाच्या कामात अडथळा; सोलापुरात जमीन मालकावर गुन्हा, स्टॉर्म वॉटर ड्रेन प्रकल्प रोखल्याचा आरोप

भेसळीचे ३७ हजार लिटर दूध नष्ट, १५ लाखांचा दूधसाठा जप्त; जवळ्यातील अजिंक्यराणा अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई
4

भेसळीचे ३७ हजार लिटर दूध नष्ट, १५ लाखांचा दूधसाठा जप्त; जवळ्यातील अजिंक्यराणा अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.