
Beed News: रेशीम उत्पादकांसाठी मोठी खुशखबर! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
कृषी उत्पन्न बाजार समितीतील रेशीम कोष खरेदी केंद्रात मिळालेला ९३ हजार रुपये प्रतिक्विंटलचा भाव उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरला आहे. ९१० रुपये प्रतिकिलोपासून सुरू झालेली बोली व्यापाऱ्यांमधील स्पर्धेमुळे ९३० रुपयांपर्यंत पोहोचली. रेशीम शेतीसाठी मोठ्या मेहनतीनंतर तयार होणाऱ्या कोषाला चांगला भाव मिळाल्याने उत्पादकांचा उत्साह वाढला आहे. बाजार समितीच्या पारदर्शक लिलाव प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांना योग्य दर मिळण्यास मदत होत आहे. भविष्यातही बाजारभाव चांगले राहावेत, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली. Beed News:
शनिवारी (२९ ऑगस्टला ) सकाळपासूनच रेशीम कोषाची आवक खरेदी केंद्रावर सुरू होती. व्यापाऱ्यांच्या उपस्थितीत लिलाव प्रक्रियेला सुरुवात झाली. सुरुवातीची बोली ९१० रुपये प्रतिकिलोपासून सुरू झाली. त्यानंतर व्यापाऱ्यांमध्ये दरासाठी स्पर्धा निर्माण बहोत बोली ९१५, ९२० आणि ९२५ रुपयांपर्यंत पोहोचली. अखेर स्पर्धात्मक बोलीतून ९३० रुपये प्रतिकिलोचा सर्वोच्च दर निश्चित झाला.
विक्रमी भाव मिळाल्याचे स्पष्ट होताच उपस्थित शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. रेशीम शेतीसाठी लागणारे श्रम, उत्पादनासाठी घ्यावी लागणारी काळजी आणि बाजारातील – अनिश्चितता लक्षात घेता मिळालेला हा दर उत्पादकांसाठी दिलासादायक – मानला जात आहे.
८८ रेशीम कोषाला मिळालेला विक्रमी भाव हा बीडच्या रेशीम उत्पादक शेतकऱ्यांच्या कष्टाचे फलित आहे. बाजार समितीमध्ये रेशीम कोषाची आवक वाढत असून, शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला योग्य आणि स्पर्धात्मक दर मिळावा, यासाठी बाजार समितीच्या माध्यमातून आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
भविष्यातही पारदर्शक लिलाव प्रक्रिया आणि चांगली बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी बाजार समिती प्रयत्नशील राहील. – सरला कामराज मुळे, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती बीड.
९३ हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर हा बाजार समितीसाठी अभिमानाची बाब असून, या भावामुळे रेशीम उत्पादकांचा आत्मविश्वास वाढेल, असे सरला मुळे यांनी सांगितले. भविष्यातही पारदर्शक लिलाव प्रक्रिया आणि चांगली बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी बाजार समिती प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले, रेशीम कोषाला मिळालेल्या या विक्रमी दरामुळे जिल्ह्यातील रेशीम उत्पादक शेतक-यांना प्रोत्साहन मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
Nagpur Crime : गुन्हे नियंत्रणात नागपुर ग्रामीण पोलीस धुरंधर ; गुन्ह्यांच्या टक्क्यात घसरण
बीड कृषी उत्पन्न बाजार समितीतील रेशीम कोष खरेदी केंद्राने गेल्या सहा वर्षात उल्लेखनीय वाढ नौदवली आहे. २०२१ मध्ये १,१८६ शेतकऱ्याकडून ७ लाख ९ हजार ३५६ किलो रेशीम कोषाची आवक झाली होती. त्यातून ६ कोटी ५३ लाख १० हजार ९४६ रुपयांची उलाढाल झाली.
आजपर्यंत ५६ हजार १२९ शेतक-यांकडून ५८ लाख ७१ हजार ४०४ किलो रेशीम कोषाची आवक झाली असून, या माध्यमातून २६७ कोटी रुपयांपेक्षा अधिकची उलाढाल झाल्याची माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली.