'तोंड उघडलं तर मुंडे बंधू भगिनींना राजीनामा द्यावा लागेल'; करुणा मुंडेंचा पंकजा-धनंजय मुंडेंना इशारा
Karuna Sharma : धनंजय मुंडेंच्या अडचणी काही संपण्याचं नाव घेत नाहीत. कारण करुणा मुंडेंना महिना २ लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश कोर्टानं दिले आहेत. त्यानंतर आता करूणा मुंडे अधिकच आक्रमक झाल्या आहेत. आपण तोंड उघडलं तर धनंजय आणि पंकजा मुंडेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागेल, असा इशाराच त्यांनी दिला. एवढंच नव्हे तर त्यांना वाल्मिक कराडच्या प्रकरणात करूणा मुंडेंनी काही धक्कादायक खुलासे केले आहेत. कराडला वाचवण्यामागे धनंजय मुंडेंच असून मला इंदूरला पाठवताना कराडनं मारहाण केल्याचा आरोपही केला आहे.
आधीच अनेक प्रकरणांमुळे अडचणीत असलेल्या धनंजय मुंडेंना करूणा मुंडेंनी घेरलंय. त्यात करूणा मुंडेंनी धनंजय मुंडेंवर 25 हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचे आरोप केले आहेत. आणि यामुळेच करूणा मुंडेंचा घातपात होऊ शकतो. त्यांना सुरक्षा पुरवायला हवी अशी मागणी अंजित दमानियांनी केलीय.
सरपंच संतोष देशमुख हत्याकांडनंतर वाल्मिक कराडसोबतचे संबंध, पीक विमा घोटाळा प्रकरण आणि युरिया घोटाळ्याचे आरोप ताजे असताना करुणा मुंडेंनीही काही धक्कादायक खुलासे केल्यामुळे धनंजय मुंडेंचं टेंशन आणखीनच वाढलंय. मात्र यामुळे करूणा मुंडेंचा जीव खरंच धोक्यात आहे का? असेल तर सरकार त्यांना सुरक्षा पुरवणार का? असे अनेक सवाल उपस्थित झाले आहेत.
मंत्री धनंजय मुंडे यांना वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने करुणा शर्मांना दोन लाखांची पोटगी देण्याचे आदेश दिले आहेत. करुणा मुंडे यांनी दाखल केलेल्या घरगुती हिंसाचार तक्रारीच्या सुनावणीवर न्यायालयाने या सूचना केल्या आहेत. न्यायालयाच्या आदेशानंतर करुणा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेत, गेल्या अनेक महिन्यांपासून घराचा हफ्ता भरलेला नाही, त्यामुळे १५ लाख रुपये मिळावे यासाठी हायकोर्टात जाणार असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. मात्र आता करुणा मुंडे यांच्या मुलाने आईबाबत धक्कादायक खुलासे केले आहेत. इन्स्टाग्रामवरी त्याच्या पोस्टने खळबळ माजली आहे.
माझे वडील सर्वोत्तम नसले तरी ते नुकसान पोहोचवणारे नाहीत असं विधान धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांचा मुलगा सिशिव मुंडे याने केले आहे. वडील आईसोबत कठोर वागले असले तरी ते आमच्या सोबत तसे वागले नाहीत, असा दावा सिशिवने इन्स्टाग्राम स्टोरीमधून केला आहे. त्यामुळे आता मुंडे कुटुंबातल्या या प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे.
नेमकं काय म्हणाला सिशिव?
“मी सीशिव धनंजय मुंडे आहे आणि मला बोलण महत्वाचे वाटते कारण मिडिया माझ्या कुटुंबाला मनोरंजनाचे साधन बनवत आहेत. माझे वडील कदाचित सर्वोत्कृष्ट नसतील, परंतु ते कधीही आमच्यासाठी नुकसान पोहोचवणारे नव्हते. तिने ज्या कौटुंबिक हिंसाचाराचा दावा केला आहे तो माझ्यावर, माझ्या बहिणीवर आणि माझ्या वडिलांवरही झाला आहे. माझ्या आईने वडिलांना मारहाण केली आणि तेव्हापासून ते निघून गेले. त्यानंतर माझ्या आईने मला आणि बहिणीला सोडून दिलं. कारण तिला आमच्याशी काही देणंघेणं नाही.