मस्साजोग सरपंच पोटनिवडणूक जाहीर झाली असून संतोष देशमुख यांना न्याय मिळण्याची शक्यता आहे (फोटो - सोशल मीडिया)
Massajog Sarpanch By-election : मस्साजोग : बीडमधील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder) यांची ९ डिसेंबर २०२४ रोजी निर्घृनपणे हत्या करण्यात आली. त्यांच्या हत्येमुळे फक्त बीड (Beed News) नाही तर संपूर्ण महाराष्ट्र हळहळला. यानंतर आता मस्साजोग सरपंच पदाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. आजपासून ( ७ एप्रिल) गावच्या सरपंच पदाचे उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. यामुळे संतोष देशमुख यांच्यानंतर कोण हे पद सांभाळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बीड जिल्ह्यातील एकूण ८८ रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची प्रक्रिया प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे. यात जिल्ह्यातील १६ सरपंच आणि ७२ सदस्य अशा एकूण ८८ जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. येत्या ७ एप्रिलपासून १३ एप्रिलपर्यंत मस्साजोगच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. यामुळे कोणाला संधी मिळणार आणि कोण कोण अर्ज दाखल करणार याची उत्सुकता निर्माण झाली.
संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर दीड वर्ष मस्साजोग गावाचे सरपंच रिक्त झाले आहे. त्यामुळे त्यांच्यानंतर ही जबाबदारी योग्य व्यक्तीने घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांना उमेदवारी देऊन त्यांना सर्वांनी बिनशर्त पाठिंबा द्यावा अशी अपेक्षा गावकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. तसेच ही संतोष देशमुख यांच्यासाठी खरी श्रद्धांजली ठरेल अशा भावना गावकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. त्यांनी दिलेल्या बलिदानाला हे योग्य राहिल असे मत व्यक्त केले जात आहे.
हे देखील वाचा : “सुनेत्रा पवारांना महाविकास आघाडीकडून अधिकृत पाठिंबा नाही पण..; खासदार संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
संतोष देशमुख यांचे बंधू बंधू धनंजय देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले संतोष देशमुख यांच्या निधनामुळे गावात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी उर्वरित १८ महिन्यांचा कार्यकाळ त्यांच्या कुटुंबालाच मिळावा. तसेच अनेक ग्रामपंचायत सदस्यांनी आणि विविध पॅनेल प्रमुखांनी स्वतःहून संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची भेट घेऊन त्यांना बिनशर्त पाठिंबा दर्शवला आहे.
हे देखील वाचा : कृतघ्न मुलगा अन् कुटुंबाच्या पूर्वपुण्याईवर खासदार; काँग्रसेनी पार्थ पवारांना धरलं धारेवर
बारामती पोटनिवडणूकीमध्ये रंगत
दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. घरातील व्यक्ती वारल्यामुळे शरद पवार गटाने उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला. ही निवडणूक बिनविरोध करण्याची मागणी महायुतीकडून करण्यात आली. मात्र काँग्रेसने निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. आकाश मोरे यांना सुनेत्रा पवारांविरोधात उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे अजित पवारानंतर बारामतीकर कोणाला पाठिंबा देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






