Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिक्षकांवर अशैक्षणिक कामांचा ताण; शालेय निकालावर परिणाम होण्याची भीती, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित

परीक्षा काळात शिक्षकांवर वाढलेल्या अशैक्षणिक जबाबदाऱ्यांमुळे शालेय शिक्षणावर परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. शासकीय कामांमुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 10, 2026 | 02:34 PM
शिक्षकांवर अशैक्षणिक कामांचा ताण; शालेय निकालावर परिणाम होण्याची भीती, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित

शिक्षकांवर अशैक्षणिक कामांचा ताण; शालेय निकालावर परिणाम होण्याची भीती, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित

Follow Us
Follow Us:
  • शिक्षकांवर जनगणना, बीएलओसारख्या कामांचा ताण वाढल्याने शैक्षणिक कामांवर परिणाम होत आहे.
  • परीक्षा काळात पेपर तपासणीसोबत इतर कामांमुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची भीती आहे.
  • पटपडताळणी प्रक्रियेवर शिक्षकांचा विरोध असून प्रशासनाकडून हस्तक्षेपाची मागणी होत आहे.
मोहाडी/भंडारा: सध्या शिक्षकांवर मोठ्या प्रमाणात अशैक्षणिक जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्याने त्याचा थेट परिणाम शालेय निकालाच्या गुणवत्तेवर होण्याची भीती व्यक्त होत आहे. २ मे रोजी शाळांचे निकाल जाहीर होणार असून त्यानंतर उन्हाळ्याच्या सुट्या लागणार आहेत. मात्र, या अत्यंत महत्त्वाच्या कालावधीत परीक्षा पेपर तपासणी, निकाल तयार करणे यांसोबतच जनगणना, विशेष सघन पुनरावलोकन (एसआयआर) आणि मतदार केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांसारखी कामेही शिक्षकांवर सोपवण्यात आली आहेत. त्यामुळे शिक्षक वर्गात संतापाचे वातावरण आहे.

Raigad News: किल्ले रायगडावर पाण्याचा तुटवडा; ऐतिहासिक कामे ठप्प होण्याच्या मार्गावर

मोहाडी तालुक्यातील शाळांमध्ये सध्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शिक्षक मोठ्या प्रमाणावर शासकीय कामांमध्ये व्यस्त असल्याने शाळांमधील त्यांची उपस्थिती कमी झाली आहे. एप्रिल महिना हा विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असतो. या काळात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, शंका निरसन आणि अभ्यासाची पुनरावृत्ती आवश्यक असते. मात्र, घरभेटी व माहिती संकलनाच्या कामांमुळे या गोष्टींवर परिणाम होत असल्याची तक्रार पालकांकडून केली जात आहे. मोहाडी तालुक्यातील सुमारे १ लाख ४२ हजार ३९९ लोकसंख्येच्या जनगणनेसाठी ३५ पर्यवेक्षक आणि १९५ प्रगणकांची नियुक्ती करण्यात आली असून त्यात शिक्षकांचा मोठा सहभाग आहे. याशिवाय १४७ शिक्षकांना बीएलओ म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. शालेय जबाबदाऱ्या आणि प्रशासकीय कामांचा दुहेरी ताण शिक्षकांवर पडत असून, कामात त्रुटी आढळल्यास कारवाईचा इशाराही दिला जात असल्याने शिक्षकांमध्ये मानसिक तणाव वाढला आहे.

परीक्षा काळात पटपडताळणीला विरोध

परीक्षांच्या काळात पटपडताळणी प्रक्रिया राबवण्याच्या निर्णयाला शिक्षण क्षेत्रातून तीव्र विरोध होत आहे. या प्रक्रियेमुळे परीक्षा नियोजनात अडथळे निर्माण होत असून विद्याथ्यांच्या अभ्यासावर आणि निकालावर विपरित परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पटपडताळणी आणि परीक्षा या स्वतंत्र प्रक्रिया असून त्या एकाच वेळी राबवणे अव्यवहार्य असल्याचे मत मुख्याध्यापकांनी व्यक्त केले आहे.

अंदाज समितीकडून मनपाची झाडाझडती; प्रशासकीय कारभारातील गंभीर त्रुटी उघडकीस

परीक्षा काळात पटपडताळणी प्रक्रिया राबवणे हे पूर्णतः अयोग्य असून यामुळे शिक्षकांवर कमालीचा ताण वाढत आहे. शैक्षणिक गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी ही मोहीम तातडीने थांबवून विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय प्रशासनाने घेणे आवश्यक आहे.- राजू बालपांडे, अध्यक्ष, भभंडारा जिल्हा मुख्याध्यापक संघ

प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा

भंडारा जिल्हा मुख्याध्यापक संघटनेने या पटपडताळणी प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती देण्याची मागणी शिक्षण विभागाकडे केली आहे. परीक्षा काळात अशा मोहिमा राबवणे विद्यार्थी व शिक्षकांच्या हिताचे नसून, प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

Web Title: Teachers burdened with non academic duties concerns rise over impact on student results

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 10, 2026 | 02:34 PM

Topics:  

  • Bhandara
  • Marathi News
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

LPG Cylinder Rules : 16 ऑगस्टनंतर ‘या’ ग्राहकांना मिळणार नाही LPG सिलिंडर? कनेक्शन चालू ठेवण्यासाठी त्वरित करा ‘हे’ काम
1

LPG Cylinder Rules : 16 ऑगस्टनंतर ‘या’ ग्राहकांना मिळणार नाही LPG सिलिंडर? कनेक्शन चालू ठेवण्यासाठी त्वरित करा ‘हे’ काम

Share Market Weekly Outlook : शेअर बाजारात तेजी की मंदी? 17 ते 21 ऑगस्टमध्ये ठेवा बारीक लक्ष; ‘हे’ ट्रिगर्स ठरवणार मार्केटची दिशा
2

Share Market Weekly Outlook : शेअर बाजारात तेजी की मंदी? 17 ते 21 ऑगस्टमध्ये ठेवा बारीक लक्ष; ‘हे’ ट्रिगर्स ठरवणार मार्केटची दिशा

Vaping Ban Demand : लहान मुलं नशेच्या विळख्यात? चॉकलेट-फळांच्या फ्लेवरमध्ये निकोटीन प्रॉडक्ट्स; कठोर कायद्याची मागणी
3

Vaping Ban Demand : लहान मुलं नशेच्या विळख्यात? चॉकलेट-फळांच्या फ्लेवरमध्ये निकोटीन प्रॉडक्ट्स; कठोर कायद्याची मागणी

Designer Rakhi Business Idea : डिझायनर राख्यांना मोठी मागणी! फक्त ‘इतक्या’ रुपयांच्या गुंतवणूकीत सुरु करा व्यवसाय
4

Designer Rakhi Business Idea : डिझायनर राख्यांना मोठी मागणी! फक्त ‘इतक्या’ रुपयांच्या गुंतवणूकीत सुरु करा व्यवसाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.