बारामती : सरपंचांना आता गाव विकासाची मोठी संधी असून, याचा पुरेपूर लाभ घेऊन आपल्या गावचा सर्वांगीण विकास करावा, असे आवाहन माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बारामती येथील कार्यक्रमात बोलताना केले आहे.
नवराष्ट्र वृत्त समूहाच्या वतीने दौंड, बारामती, इंदापूर, पुरंदर आणि भोर या तालुक्यातील विशेष कामगिरी करणाऱ्या सरपंचांचा सत्कार दत्तात्रय भरणे याचे हस्ते आयोजित करण्यात आला होता, या कार्यक्रमाचं भव्य आणि सुंदर नियोजन, युवा सरपंच आणि त्यांचे कार्यकर्ते यांची उत्साहपूर्ण उपस्थिती, भरणे आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष बारामती कृषी संशोधन संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांची भाषणातील दिलखुलास जुगलबंदी यामुळे कार्यकर्माची रंगत वाढली.
यावेळी बोलताना भरणे यांनी उपस्थित सरपंचांना आपल्या खास रसाळ वाणीतून बहुमोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेंद्र पवार आपल्या भाषणात म्हणाले, आपण पहिल्या स्वातंत्र्याचा अमृत महोस्तव साजरा करीत असताना परिस्थिती अंत्यत विस्कळीत असून, आपली वाटचाल नेमकी कुठे चालली हे कळत नाही, परिस्थिती गंभीर व चिंताजनक आहे. आपल्याला यापुढे आता दुसऱ्या स्वातंत्र्यासाठी पुढे यावे लागणार आहे.
[read_also content=”शिक्षक बदली प्रकरणात राज्य कास्ट्राईबची उडी; राज्याध्यक्ष गौतम कांबळे यांनी दिला ‘हा’ इशारा https://www.navarashtra.com/maharashtra/jump-to-state-caste-in-teacher-transfer-case-state-president-gautam-kamble-gave-this-warning-nrdm-313146.html”]
या कार्यक्रमात आदर्श युवा सरपंच, विशिष्ट कार्य सरपंच आणि महिला खास सरपंच यांचा स्मृती चिन्ह, प्रशस्तीपत्र, फेटा, शाल आणि गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास सरपंच, त्यांचे कार्यकर्ते, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.






