मुंबई : भाजपा नेते मोहित कंबोज यांच्याबाबत एक महत्त्वाची व मोठी बातमी समोर येत आहे. भाजपा नेते मोहित कंबोज यांना दिलासा मिळाला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या कार्यकाळात भाजपा नेते मोहित कंबोज यांच्यावर आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. दरम्यान, संजय पांडे आणि मोहित कंबोज यांच्यातील वादावर त्यावेळी जोरदार चर्चा झाली होती. कथित बॅंक घोटाळा प्रकरणात मोहित कंबोज यांना EOW करून पुर्णपणे क्लीन चीट देण्यात आली आहे. आर्म्स ॲक्ट अंतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यांमधूनही कंबोज यांची सुटका करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांकडून या दोन्ही प्रकरणात भाजपा नेते मोहित कंबोज यांना क्लिन चीट देण्यात आल्याने कंबोज यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
[read_also content=”मविआचे आमदार आज दिवसभर विधानभवनाच्या पाऱ्यावर आंदोलन करणार? सीमाप्रश्नी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री गप्प का? विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांचा सवाल https://www.navarashtra.com/maharashtra/will-the-mla-mva-protest-on-the-steps-of-the-vidhan-bhavan-today-border-issue-cm-and-dcm-silent-opposition-leader-ajit-pawar-question-355889.html”]
दरम्यान, बॅक ऑफ इंडियाच्या (Bank of India) एका शाखेत फसवणूक केल्याबद्दल बर्याच लोकांवर कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात केंद्रीय अन्वेषण यंत्रणेच्या सीबीआय (CBI) टीमने मुंबईत पाच ठिकाणी छापे टाकले आहेत. सीबीआयला अव्यान ओव्हरसीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनी (Avyaan Overseas private limited) आणि त्या कंपनीचे एमडी, स्थानिक भारतीय जनता पक्षाचे नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांच्याविरूद्ध, बँक ऑफ इंडियाद्वारे तक्रार आली होती. त्यानंतर संचालक, मालक आणि त्या खासगी कंपनीशी संबंधित इतर आरोपी आणि कंपनीच्या लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण?
बँक ऑफ इंडियाच्या शाखेतल्या सुमारे 57.26 कोटी रुपयांच्या फसवणूकीशी संबंधित आहे. या प्रकरणात अनेक बँक कर्मचारीही सामील आहेत, म्हणूनच या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेता, अज्ञात लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बँकेसोबत झालेली ही फसवणूक 2013 ते 2018 या कालावधीमधील आहे. मेसर्स अव्यान ओव्हरसीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ही मुख्य आरोपी असलेली कंपनी मुंबईत आहे. सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरनुसार, फॉरेन बिल नीगोसिएशन लिमिट, एफबी खरेदी-विक्री, एक्सपोर्ट पॅकेजिंग क्रेडिट लिमिट अशा अनेक मुद्द्यांवरून फसवणूक केली गेली आहे. यामध्ये भाजपा नेते मोहित कंबोज यांचा देखील हात असल्याचं बोललं जात असल्यामुळं त्यांच्या विरोधात तक्रार आली होती.