शिर्डीत बंडखोरी उफाळणार? मंत्री विखेंना स्वपक्षातूनच आव्हान
लोकसभा निवडणुकीमध्ये (Loksabha) अनेक मतदारसंघांमध्ये अनपेक्षित निकाल लागल्यानंतर विधानसभेसाठी (Assembly) देखील अपेक्षित निकाल लागण्याची धास्ती सर्वच आजी-माजी आमदारांनी घेतली आहे. तर इच्छुक उमेदवारांनीही आपली मोर्चे बांधणी सुरू केली आहे.
शिर्डी (Shirdi) विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार राधाकृष्ण विखे (Radhakrushna Vikhe) यांच्या विरोधात जनतेत नाराजी व रोष आहे. मंत्री विखे हे पालकमंत्री असताना यंदाच्या लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीच्या दोन्ही जागांवरील उमेदवारांचा पराभव झाला. विधानसभा निवडणुकीत ते स्वतः निवडून येणार नाही अशी जनभावना आहे यामुळे आपण विधानसभा निवडणूक लढवावी असा जनकौल पाहता मी विधानसभेसाठी शिर्डीमधून इच्छुक असल्याचे भाजप (BJP) नेते राजेंद्र पिपाडा यांनी पत्रकार परिषदेत म्हंटले आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले, शिर्डी (Shirdi) मतदारसंघातून उमेदवार बदलला तर जागा वाचेल. तसेच केवळ घराणेशाहीच सुरु आहे. यामुळे शिर्डीचा विकास खुंटला आहे. लोकांकडून आग्रह आहे जनतेच्या इच्छेला प्रतिसाद देत शिर्डी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे म्हणतच पिपाडा यांनी आपणास उमेदवारी मिळावी यासाठी पक्षातील वरिष्ठांना भेटणार असल्याचे स्पष्ट केले. मी या विधानसभा निवडणुकीत आपल्याला उमेदवारी द्यावी अशी मागणी वरिष्ठ नेत्यांकडे करणार आहे असे पिपाडा म्हणाले.