राम सातपुते यांनी भरला उमेदवारी अर्ज (फोटो- ट्विटर)
अकलुज: राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डाजी व देशाचे गृहमंत्री अमित शहा तसेच राज्याचे सर्व महायुतीचे नेते या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की, मला पुन्हा एकदा माळशिरस विधानसभेची भारतीय जनता पार्टी महायुतीची उमेदवारी देऊन इथल्या जनतेची सेवा करण्याची संधी दिली. या ठिकाणी या निवडणुकीमध्ये इथल्या जनतेने निवडणूक हातात घेतली आहे आणि मोहिते पाटील परिवारातील ज्यांच्या सोबत पाच वर्षे आम्ही काम केलं त्यांच्या मार्गदर्शनात काम केलं ते आमदार रणजीत सिंह मोहिते पाटील हे भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत तेव्हा मला विश्वास आहे की, भारतीय जनता पार्टी सोबतच रनजीत दादा आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते असतील आणि भारतीय जनता पार्टीचे आमदार म्हटलं की ते भारतीय जनता पार्टीच्या सोबतच ते असतील व दृश्य स्वरूपात अदृश्य स्वरूपात अनेक हात माझ्या सोबत आहेत जे मला आशीर्वाद देऊ पाहत आहेत.
विरोधकांन विरोधात बोलणे मला योग्य नाहीये मला मागच्या लोकसभेच्या निवडणुकीला सगळे एकत्र असताना ६५ हजार मतं भारतीय जनता पार्टीला पडले मी सोलापूर लोकसभेत अडकलो होतो त्यामुळे इथल्या जनतेने या ठिकाणी पाहिले की जे गणपतीला दारू पाजणारे लोक आहेत याला उत्तरे जनता निश्वित देईन आणि माळशिरस तालुक्याने ठरवलेला आहे की तहसीलदाराला मारणारा आमदार नाही पाहिजेत तर इथला सेवा करणारा आमदार पाहिजे. असे प्रतिपादन विद्यमान आमदार राम सातपुते यांनी केले. माळशिरस मतदारसंघांमध्ये तुरशीची वातावरण असताना अगदी शेवटची दोन दिवस राहिलेले असताना महायुतीकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय समजले जाणारे विद्यमान आमदार रामभाऊ सातपुते यांना महायुतीकडून तिकीट जाहीर करण्यात आले.
त्यांचा उमेदवारी अर्ज आज रोजी माळशिरस तालुक्यातील भाजपचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते यांच्या समवेत मोठ्या शक्ती प्रदर्शनात सादर करण्यात आला यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, दलितांचा हक्क म्हणजे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण दिलेले आहे ते खोटं सर्टिफिकेट काढून निवडणुकीस उभे राहणाऱ्या उमेदवाराच्या पाठीशी येथील जनता कधी उभी राहणार नाही. तेव्हा मला विश्वास आहे की या ठिकाणी इथली जनता आमच्या सोबत आहे गावागावातील सर्व जनता काही ठिकाणी आपल्याला पुढारी दिसते परंतु जनता पूर्ण आमच्या सोबत आहे. निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे आणि राम सातपुतेचे काम मागच्या पाच वर्षांमध्ये इथल्या जनतेने पाहिलेला आहे मला विश्वास आहे त्या कामाच्या जोरावरच कामाच्या माणसाला इथली जनता कामाला मतदान करील आम्हाला विश्वास आहे.
मी सरकारचे धन्यवाद व्यक्त करतो माळशिरस तालुक्यामध्ये एक लाखापेक्षा जास्त असणाऱ्या लाडक्या बहिणींना थेट साडेसात हजार रुपये खात्यावरती टाकायचं काम हे कमळ चिन्ह आहे त्या कमळ चिन्हाच्या सरकारने केलेले आहे त्यामुळे लाडक्या बहिणी आमच्या सोबत आहेत येत्या काळामध्ये लाडकी बहीण योजना सुरू ठेवायची असेल तर कमळाला मतदान करावं लागेल कारण हे काँग्रेसचे राष्ट्रवादीचे सगळे सावत्र भाऊ या ठिकाणी ही योजना बंद करून पाहतात आणि इथली जनता निश्चित आमच्या सोबत आहे. या निवडणुकीत कसा विजय असणार किती मतांनी विजयी आपल्याला दिसेल २३ तारखेला गुलाल आमचाच असेल आणि निश्चित याठिकाणी सर्व भागातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद येतील जनता आम्हाला या ठिकाणी पूर्ण ताकतीने आमच्या सोबत राहील विरोधी उमेदवार काय म्हणतोय ते जितकी मत म्हणतात त्यामुळे त्यांनी काही बोलू नये. एवढंच सांगतो की येत्या काळामध्ये इथली जनता आमच्या सोबत आहे. अनेक दृश्य अदृश्य हात पूर्ण ताकतीने आमच्या सोबतच त्यामुळे आपल्याला २३ तारखेला दिसेल विकासाच्या आणि कामाच्या जोरावर येथील जनता मला भरपूर मताधिक्याने निवडून देईल. उमेदवारी अर्ज दाखल करताना माळशिरस मतदारसंघातील भाजपचे कार्यकर्ते तसेच नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.