Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 26 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sudhir Gadgil : सांगलीचे भाजप आमदार सुधीर गाडगीळ यांच्या कारला भीषण अपघात; एअरबॅगमुळे मोठा अनर्थ टळला

BJP MLA Accident : सांगलीचे भाजप आमदार सुधीर गाडगीळ यांच्या कारला शनिवारी मिरज तालुक्यातील वड्डी ते कृष्णा घाट सेवा रस्त्यावर भीषण अपघात झाला. अचानक समोर आलेल्या दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात कारवरील नियंत्रण सुटून जोरदार धडक झाली. अपघातात आमदार गाडगीळ यांच्या हाताच्या बोटाला किरकोळ दुखापत झाली असून ते धोक्याबाहेर आहेत.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 27, 2026 | 06:44 PM
सांगलीचे भाजप आमदार सुधीर गाडगीळ यांच्या कारला भीषण अपघात; एअरबॅगमुळे मोठा अनर्थ टळला

सांगलीचे भाजप आमदार सुधीर गाडगीळ यांच्या कारला भीषण अपघात; एअरबॅगमुळे मोठा अनर्थ टळला

Follow Us
Follow Us:
  • सांगलीचे भाजप आमदार सुधीर गाडगीळ यांच्या कारला भीषण अपघात
  • एअरबॅग वेळेत उघडल्याने मोठा अनर्थ टळला
  • आमदारांना किरकोळ दुखापत, दुचाकीस्वार जखमी
BJP MLA Accident News Marathi : सांगलीचे भाजप आमदार सुधीर गाडगीळ यांच्या कारला शनिवारी (27 जून 2026) दुपारी सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी-नागपूर महामार्गावरील वड्डी (ता. मिरज) ते कृष्णा घाट सेवा रस्त्यावर भीषण अपघात झाला. अचानक समोर आलेल्या दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात कारवरील नियंत्रण सुटून जोरदार धडक झाली. अपघाताची तीव्रता मोठी असली तरी कारमधील एअरबॅग तत्काळ उघडल्याने मोठा अनर्थ टळला.

अपघातात आमदार गाडगीळ यांच्या हाताच्या बोटाला किरकोळ दुखापत झाली असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आले. मात्र, धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, सेवा रस्त्यावर अचानक दुचाकी आल्याने अपघात टाळण्यासाठी आमदार गाडगीळ यांच्या चालकाने वाहन वळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, अंतर कमी असल्याने कारची जोरदार धडक झाली. धडकेनंतर कारचे पुढील बाजूचे मोठे नुकसान झाले. अपघातानंतर काही काळ परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली.

MSRTC Financial Loss: एसटी महामंडळाला ऐन पीक सीझनमध्ये कोट्यवधींचा फटका! एप्रिल-मे महिन्यात अपेक्षित उत्पन्न बुडाले

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. अपघाताचा पंचनामा करण्यात आला असून नेमका अपघात कशामुळे झाला, याचा तपास सुरू आहे. या अपघातामुळे काही काळ सेवा रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. सुदैवाने एअरबॅग कार्यान्वित झाल्याने आमदार गाडगीळ यांच्यासह वाहनातील इतरांचा जीव वाचल्याची चर्चा घटनास्थळी होती.

या अपघातामध्ये दुचाकीस्वार जखमी झाला असून तत्काळ १०८ रूग्णवाहिका बोलवून त्यास मिरज सिव्हीलमध्ये उपचारास दाखल केले. अपघातानंतर घटनास्थळी तत्काळ पोलिसांनी धाव घेतली. महामार्ग पोलिसही धावले. घटनास्थळी गर्दी झाली होती. पोलिसांनी गर्दी हटवली. दुसऱ्या मोटारीतून आमदार गाडगीळ यांना खासगी रूग्णालयात उपचारासाठी नेले. प्राथमिक उपचारानंतर आमदार गाडगीळ हे निवासस्थानी आले. अनेकांनी दूरध्वनी करून त्यांची विचारपूस केली.

Monsoon Health News : पावसाळ्यात सर्पदंशाचा धोका वाढला! उल्हासनगरच्या रुग्णालयात एका दिवसात आठ जण दाखल

Web Title: Bjp mla sudhir gadgil car meets with major accident near miraj airbags save lives

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 27, 2026 | 06:44 PM

Topics:  

  • BJP
  • Sangli

संबंधित बातम्या

Marathi Language: परिवहन सभापतींच्या निमंत्रण पत्रिकेत मराठी हद्दपार; नावांमध्येही चुका, भाजप प्रोटोकॉलला बगल!
1

Marathi Language: परिवहन सभापतींच्या निमंत्रण पत्रिकेत मराठी हद्दपार; नावांमध्येही चुका, भाजप प्रोटोकॉलला बगल!

नितीन गडकरी खरंच राजकारण सोडणार? ‘त्या’ विधानावर आला मोठा खुलासा
2

नितीन गडकरी खरंच राजकारण सोडणार? ‘त्या’ विधानावर आला मोठा खुलासा

जत नगरपरिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीसाठी २,५८५ चौ.मी. शासकीय जमीन विनामूल्य देण्यास राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी
3

जत नगरपरिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीसाठी २,५८५ चौ.मी. शासकीय जमीन विनामूल्य देण्यास राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

‘भाजपाकडून आता मतदार याद्यांतही चोरी करण्याचा प्रयत्न’, SIR कामावर हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप
4

‘भाजपाकडून आता मतदार याद्यांतही चोरी करण्याचा प्रयत्न’, SIR कामावर हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.