Photo Credit- Social media
गडचिरोली: गडचिरोलीतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. निवडणुकीच्या तोंडावर भामरागडमधील पर्लकोटा नदीच्या पुलावर होणारा बॉम्बस्फोट करण्यात आल्याची माहिती आहे. सुदैवाने य स्फोटात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पण या बॉम्बस्फोटामुळे भामरागडमध्ये एकच खळबल उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस नेहमीप्रमाणे गस्त घालण्यासाठी निघाले होते. काही पोलिस पर्लकोटा नदीच्या पलीकडील भागात गस्ती घालत होते. त्यावेळी पर्लकोटा नदीवर पुलाचे बांधकाम सुरू होते आण काही कर्मचारी त्या ठिकाणी कामही करत होते. गस्त घालणाऱ्या पोलिसांनी पुलाच्या बांधकामाच्या ठिकाणी संशयास्पदरित्या केलेले मार्किंग आढळून आले. पोलिसांनी बांधकाम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ते चुण्याचे मार्किंग त्यांनी केले आहे का, असा प्रश्नही विचारला. त्यावेळी कर्मचाऱ्यांनी नाही असे उत्तर दिले.
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा गौरव “रुखवत” मधून होणार; गूढ रहस्य आणि प्रेमाची अनोखी
कर्मचाऱ्यांनी ते मार्किंग त्यांनी केलेले नसल्याचे सांगितल्यावर पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी तपास सुरू केला.तोच काही मिनिटात त् पुलाच्या जवळच मोठा स्फोट झाला. पण सुदैवाने या बॉम्बस्फोटात कोणत्याही प्रकारची जीवित आणि वित्तहानी झाली नाही. पण त्याठिकाणी पुन्हा अशाच प्रकारे बॉम्बस्फोट होण्याची शक्यता विभागाकडून वर्तवली जात आहे. दरम्यान बॉम्बस्फोटानंतर भामरागड आणि अल्लापल्ली मार्गावरील सर्व मार्गांवरील वाहने थांबवली जात आहे. तसेच वाहनांची तपासणीदेखील सुरू करण्यात आली आहे. त्याचबरोबर या नक्षलवाद्यांचा या स्फोटामागे हात तर नाही ना, याचाही तपास सुरू आहे. त्याचबरोबर त्या भागात आणखी बॉम्ब शोधक मोहीमही राबवण्यात येत आहे. अशीही माहिती मिळाली आहे.
आलापल्ली- भामरागड याठिकाणी राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. भामरागडजवळ असणाऱ्या पर्लकोटा नदीवरही नवीन पूल बांधला जात असून त्याठिकाणी काही मजूर काम करत असतात. पण पुलाच्या जवळच बॉम्बस्फोट झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. स्फोटाच्या ठिकामी चुन्याने ओढलेल्या रेषा दिसून आल्यामुळे या परिसरात पोलिसांनी सर्च ऑपरेशन सुरू आहे. अनेकदा नक्षलवादी जमिनीत स्फोटके पेरूनठेवतात. त्यानंतर असे स्फोट घडवून आणले जातात. त्यामुळे कुठलाही धोका नको म्हणून पोलिसांनी संपूर्म परिसर पिंजून काढण्यास सुरूवात केली आहे. बॉम्बशोधक आणि बॉम्ब नाशक पथकामार्फत तपासणी सुरू आहे.