दिशा सालियन प्रकऱणात मुंबई उच्च न्यायालयाकडून आदित्य ठाकरेंना क्लिनचीट
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आणि आमदार आदित्य ठाकरेंबाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. दिशा सालियन मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप झाले होते. या प्रकरणी आदित्य ठाकरें दोषी नसल्याचा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.
दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणात कोणतीही संशयास्पद माहिती नाही. हे आत्महत्येचे प्रकरण आहे. असे महाराष्ट्र सरकारच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात स्पष्ट केलं. तसेच आदित्य ठाकरेंचाही या प्रकरणात कोणताही हस्तक्षेप नसल्याचे न्यायालयात सिद्ध झाल्यानंतर आदित्य ठाकरेंनाही या प्रकरणात निर्दोष मुक्त करण्यात आले. बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतची मॅनेजर दिशा सालियनने ९ जून २०२० रोजी मालाडमधील इमारतीच्या १२ व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली. या प्रकरणावर आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप झाले होते.
दिशा सालियनच्या मृत्यूनंतर, तिच्या वडिलांनी या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती आणि या प्रकरणाची चौकशी मुंबई पोलिसांच्या एसआयटी (विशेष तपास पथक) किंवा सीबीआय कडून करावी अशी मागणी केली होती. महाराष्ट्र सरकारने मुंबई उच्च न्यायालयात दिशा सालियनच्या मृत्यूबाबत कोणत्याही संशयाला जागा नसल्याचं सिद्ध केले. तसेच, आदित्य ठाकरे यांची यात कोणतीही भूमिका नाही, ते देखील निर्दोष आहेत.
IND vs ENG : 310 धावा, 5 विकेट्स… 1 शतक! पहिल्या दिनी भारतीय फलंदाजांचा बोलबाला; वाचा सविस्तर
दिशाच्या वडिलांनी आपल्या मुलीवर क्रूरपणे बलात्कार करण्यात आला आणि नंतर तिची हत्या करण्यात आली आणि ती राजकीयदृष्ट्या दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला. बलात्कार आणि हत्येत आदित्य ठाकरे यांचाही सहभाग असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर,
राज्य सरकारच्या वतीने मालवणी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शैलेंद्र नगरकर यांनी जबाब दाखल केला. त्यांनी म्हटले आहे की, याचिकेत केलेले आरोप निराधार आणि निराधार आहेत. त्यांनी सांगितले की, वैज्ञानिक तपासणी आणि शवविच्छेदन अहवालाच्या आधारे क्लोजर रिपोर्ट दाखल करण्यात आला आहे.
Bachchu Kadu : विधानसभेला गमावलेली आमदारकी बच्चू कडू पुन्हा मिळवणार? मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
गेल्या पाच वर्षांपासून दिशा सालियनच्या गूढ मृत्यूचे प्रकरण चांगलेच चर्चेत राहिले. २०२२ मध्ये महाराष्ट्र विधानसभेतही हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. शिवसेना (शिंदे गट) आमदार भरत गोगावले आणि भाजप आमदार नितेश राणे यांनी दिशा सालियनच्या मृत्यूचा मुद्दा उपस्थित करून आदित्य ठाकरे यांच्या चौकशीची मागणी केली होती. या मुद्द्यावरून सभागृहात आमदारांमध्ये बराच गोंधळ झाला.
या प्रकरणात, नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली होती. दिशा सालियन एक सेलिब्रिटी मॅनेजर होती. तिने वरुण शर्मा, सुशांत सिंग राजपूत, भारती सिंग अशा अनेक प्रसिद्ध कलाकारांसोबत काम केले. ती टीव्ही अभिनेता रोहन राय याला डेट करत होती आणि तिच्या मृत्यूच्या काही महिन्यांपूर्वीच तिचे लग्न झाले होते.
८ जून २०२० दिशा सालियनचा मुंबईतील मालाड येथील इमारतीच्या १४ व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. धक्कादायक म्हणजे, तिच्या मृत्यूनंतर अवघ्या आठ दिवसांतच म्हणजे १४ जून रोजी, सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूचे प्रकरणही समोर आले. या दोन्ही प्रकरणांचा एकमेकांशी संबंध जोडला जाऊ लागला. या दोन्ही प्रकरणाचा तपासही एकत्र करण्यात आला. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या मुंबई पोलिसांनी त्यांच्या क्लोजर रिपोर्टमध्ये दिशा सालियनच्या मृत्यूला आत्महत्या असल्याचा निर्वाळा दिला होता. दिशा अनेक कारणांमुळे नैराश्याने ग्रस्त होती, यातूनच तिने आत्महत्या केल्याचे या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले होते.