
Buldhana ST bus accident
या दुर्घटनेत एसटी बसमधील ६ प्रवासी जखमी झाले. यामध्ये गजानन चैरामजी चरपे (७२, रा. संभाजीनगर), सविता गजानन चरपे (६३, रा. संभाजीनगर), जीवन पंजाबराव वाघ (४१, रा. अनंत नगर, अकोला), सुरेश दुर्गाप्रसाद जोशी (रा. शिर्डी), चांदबी रमजान बोरीवाले (६५, रा. अकोला) आणि जमिला युनुस मोरीवाले (४७, रा. अकोला) अशी जखमींची नावे आहेत. जखमींपैकी ३ प्रवाशांची प्रकृती ठीक असल्याने त्यांना प्राथमिक उपचारानंतर सोडण्यात आले असून, इतर ३ जणांना अधिक उपचारासाठी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
या भीषण अपघातामुळे चिखली खामगाव मार्गावर काही काळ मोठी खळबळ उडाली होती आणि वाहतूक ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून बचावकार्य हाती घेतले व अपघातग्रस्त वाहने बाजूला सारून वाहतूक सुरळीत केली. पोलिस या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत.
बोरगाव वसू फाट्याजवळ दोन्ही वाहने समोरासमोर आल्यानंतर त्यांच्यात प्रचंड वेगाने धडक झाली. अपघाताचा आवाज होताच आसपासच्या ग्रामस्थांनी आणि प्रवाशांनी मदतीसाठी धाव घेतली, धडकेमुळे टिप्परच्या केबिनचा अक्षरशः चक्काचूर झाला होता, चालक वाघ है केबिनमध्ये – अत्यंत गंभीर अवस्थेत अडकले होते. त्यामुळे त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला.