Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 30 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Buldhana News: भूखंड घशात घालण्याचा भूमाफियांचा प्रयत्न सुरू; तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन

Buldhana Government Land Encroachment: बुलढाणा तालुक्यातील देऊळघाट येथे गट क्र. ३१७ मधील जवळपास एक एकर शासकीय भूखंड बळकावण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या प्रकरणी प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत काहींनी बुलढाणा तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 30, 2026 | 06:15 PM
Buldhana Government Land Encroachment

Buldhana Government Land Encroachment

Follow Us
Follow Us:
  • शासनाची दिशाभूल करून भूखंड बळकावण्याचा प्रयत्न
  • तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन
  • अधिकारी पोहोचले घटनास्थळी
बुलढाणा: तालुक्यातील देऊळघाट येथील जवळपास १ एकर शासकीय भूखंड शासनाची दिशाभूल करून बळकावण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा शासकीय भूखंड वाचविण्यासाठी काहींनी बुलढाणा तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरू केले. प्रशासन भूमाफियांशी हातमिळवणी करून या गंभीर प्रकरणाला दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप आंदोलनकत्र्यांनी केला. देऊळघाट येथील जिल्हा परिषद हायस्कूलसमोर गट क्र. ३१७ मध्ये शासकीय भूखंड असून, त्यातील काही जमीन खादी ग्रामोद्योग, दफनभूमीला देण्यात आली. काही जमीन पडीक होती. त्यावर तलाठी कार्यालयाचे बांधकाम सुरू असून, उर्वरित जमिनीवर गावातील केरकचरा टाकण्यात येत आहे. शुक्रवारी सकाळी काहीजण त्या पडीक जमिनीवर अँगल गाळत असल्याचे गावकऱ्यांना दिसून आले. विचारणा की काहींनी विचारणा केली असता त्यांना उडवाउडवीचे उत्तरे मिळाली.

Washim News: कर्जमुक्तीचा दुसरा टप्पा; तब्बल १७ हजार शेतकऱ्यांना मिळाला १५० कोटींचा लाभ, ७, ४०४ आधार प्रमाणीकरण बाकी

यासंदर्भात बुलढाणा तहसीलदार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, ते उपलब्ध होऊ शकले नाही. प्रशासन कोणतीच दखल घेत नसल्याचे लक्षात येतास माजी सरपंच आरिफ खान, माजी सरपंच गजनफरोउल्ला खान, माजी तंटामुक्ती अध्यक्ष जुनेद खान, सदस्य विकास देशमुख बुलढाणा तहसील कार्यालयात पोहोचले. त्यांनी प्रशासनाच्या उदासीन भूमिकेचा निषेध व्यक्त करत तहसील कार्यालयातच ठिय्या आंदोलन सुरू केलेले आहे. खान यांनी माहिती देताना सांगितले की, गट क्रमांक १३८ मधील जमिनीचा सातबारा असलेले लोक अवैधरित्या गट क्रमांक ३१७ मधील शासकीय भूखंडाला आपली जमीन दाखवत अतिक्रमण करून आपल्या ताब्यात घेत आहे. जोपर्यंत सदर अतिक्रमण हटविण्यात येत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली.

अधिकारी पोहोचले घटनास्थळी

देऊळघाट येथील शासकीय जमिनीवर अवैधरित्या ताबा घेतला जात आहे. यासंदर्भात बुलढाणा तहसील कार्यालयात ही आंदोलन सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर बुलढाणा ग्रामीणचे ठाणेदार आशिष रोही, प्रशिक्षणार्थी तहसीलदार निकिता गजरे, तलाठी सावळे घटनास्थळी पोहोचून त्यांनी कागदपत्रे तपासून काम थांबविण्याचे आदेश दिले. परंतु, या पथकाच्या परतल्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी लोखंडी अँगल गाडण्याचे काम केले जात होते..

Buldhana News: लोणारची कामे दर्जेदार करा; पर्यटकांच्या सुविधांवर भर द्या, विभागीय आयुक्त नयना गुंडेंचे निर्देश

Web Title: Buldhana deulghat government land encroachment tehsil office protest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 30, 2026 | 06:15 PM

Topics:  

  • buldhana news
  • tehsil office

संबंधित बातम्या

धडक कारवाई; दुसरबीड, बीबी, सुलतानपूरमधील अतिक्रमिकांना प्राथमिक नोटीस, महामार्गालगतच्या अतिक्रमणांवर प्रशासनाचा हातोडा
1

धडक कारवाई; दुसरबीड, बीबी, सुलतानपूरमधील अतिक्रमिकांना प्राथमिक नोटीस, महामार्गालगतच्या अतिक्रमणांवर प्रशासनाचा हातोडा

Fencing Championship 2026: तलवारबाजी स्पर्धेत ‘जिजाऊंच्या लेकींचा’ डंका; सुवर्णसह आठ पदकांवर कोरले नाव
2

Fencing Championship 2026: तलवारबाजी स्पर्धेत ‘जिजाऊंच्या लेकींचा’ डंका; सुवर्णसह आठ पदकांवर कोरले नाव

Buldhana News: अतिवृष्टीग्रस्तांसाठी १० कोटींचा निधी; ७ हजार ६५८ शेतकऱ्यांना मिळणार दिलासा, पीक नुकसानीसाठी मदत
3

Buldhana News: अतिवृष्टीग्रस्तांसाठी १० कोटींचा निधी; ७ हजार ६५८ शेतकऱ्यांना मिळणार दिलासा, पीक नुकसानीसाठी मदत

Buldhana News: लोणारची कामे दर्जेदार करा; पर्यटकांच्या सुविधांवर भर द्या, विभागीय आयुक्त नयना गुंडेंचे निर्देश
4

Buldhana News: लोणारची कामे दर्जेदार करा; पर्यटकांच्या सुविधांवर भर द्या, विभागीय आयुक्त नयना गुंडेंचे निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.