Washim Combing Patrol Operation
वाशिम: जिल्ह्यामध्ये बऱ्याच दिवसांपासून पाहिजे असलेले आरोपी पोलिसांच्या रडारवर होते. आगामी काळामध्ये येणारे सणउत्सव शांततेत पार पाडण्याकरिता विघ्नसंतोषी लोकं, ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. परंतु, ते बऱ्याच दिवसांपासून पोलिसांना पाहिजे असलेले आरोपी, न्यायालयामधून जामीन झाल्यानंतर फरार झालेले आरोपी यांना शोधून त्यांच्याविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करणे आवश्यक असल्याची बाब वाशिम जिल्हा पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांनी हेरली. त्यानुसार उपविभागीय पोलिस अधिकारी वाशिम व वाशिम डिव्हीजनच्या सर्व ठाणेदारांना कोम्बिंग गस्त राबविण्याबाबत आदेशित करण्यात आले.
यानुसार गुरुवार व शुक्रवारच्या रात्रीदरम्यान कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यासाठी तशी रुपरेषा वाशिमचे पोपोलिसांनी लिस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील व अपर पोलिस अधीक्षक लता फड यांनी तयार केली. उपविभागीय पोलिस अधिकारी वाशिम रामकृष्ण पवार यांनी कोम्बिंग ऑपरेशनचे नेतृत्व केले. कोम्बिंगकरिता एकूण ४ पोलिस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा, वाशिम येथील अधिकारी व अंमलदार यांचे एकून १६ पथके तयार केली. एकाचवेळी ३२ ठिकाणावर छापे टाकण्यात आले.
या धाडसत्रादरम्यान शिरपूर पोलिस स्टेशनमधील पसार आरोपी लक्ष्मण मधुकर चव्हाण (रा. पांगरखेडा, ता मालेगाव) झडतीमध्ये १ गावठी कट्टा व ५ जिवंत काडतुस, २ नग लोखंडी धारदार तलवारी, ६ नग फर्शी कुऱ्हाडी, १० नग लोखंडी सुऱ्या व कोयते, ५०० फुट केबल, केबल कापण्याचे कटर, १ नग सायकलच्या चैनच्या अॅक्सलपासून बनविलेले लोखंडी गावठी शस्त्र, असा ४७,५०० रु. चा माल मिळून आला. दुसऱ्या कारवाईत जुगनू ींग पवार (रा. पांगरखेडा) याच्या घराची झडती घेतली असता, त्याच्या घरामध्ये एक धारदार तलवार व २४ नग देशी संत्रा भिंगरी दारूचे कॉर्टर किंमत १९२० रु.चे मिळून आले.
पोलिस स्टेशन शिरपूर अंतर्गत संहितामधील गुन्ह्यातील पाहिजे असलेला आरोपी शंकू गोविंदा पवार (रा. वसारी, ता. मालेगाव, जि. वाशिम) हा त्याच्या राहत्या घरी मिळून आला. पोलिस स्टेशन शिरपूरच्या ताब्यात देण्यात आले. चंद्रकांत गोविंदा पवार याचे घराची झडती घेतली असता, त्याच्या ताब्यामध्ये विनापरवाना ३० लिटर गावठी हातभट्टीची दारू किंमत ९ हजार रु. ची मिळून आल्याने जप्त करण्यात आली. तसेच वसारी येथील कार्यवाहीदरम्यान वसारी गावाजवळ रोडवर एमएच ३७ / टी- २५५७ क्रमांकाचा ट्रक दिसून आला. सदर ट्रकच्या चालकाला विचारपूस केली असता, त्याने सतिश महेश कुंजाम (२३. रा. लंगपाणी, ता लखनादोन, जि. शिवनी म. प्र.) असे नाव सांगितले. त्याला अधिक विचारपूस केली असता त्याने ट्रकमध्ये तांदूळ असून, तो भंडारा येथे घेऊन जात असल्याचे सांगितले. तांदुळ मालाबाबत कोणत्याही अधिकृत पावत्या मिळून आल्या नाहीत. वरून सदर ट्रकमधील तांदूळ रेशनचा असल्याबाबत संशय आल्याने सदरचा टूक पोलिस स्टेशन शिरपूर येथे लावण्यात आला.
चांडस येथील गुन्हेगार गंगाराम म्यानू चव्हाण याच्या घराची झडती घेतली असता, त्याचे घरामध्ये दुचाकी मिळून आली. झोडगा व बोरगाव येथे कोम्बिंग ऑपरेशनदरम्यान बोरगाव येथील संशयीत आरोपी अशोक प्रताप चव्हाण (५०, रा. बोरगाव, ता. मालेगाव) याच्या घराची झडती घेतली असता, घरामध्ये एक लोखंडी तलवार व किराणा सामान मिळून आले. सदर प्रकरणी पो. स्टे. शिरपूर येथे यापूर्वीच गुन्हा दाखल आहे. सदर गुन्ह्यात आरोपी अशोक प्रताप चव्हाण याची अटकेची कारवाई करण्यात आली. पुढील तपास पोउपनि राहुल बव्हाण पो. स्टे. शिरपूर करीत आहेत.
सदर कारवाईदरम्यान पो. स्टे. शिरपूर येथे आर्म अॅक्ट महाराष्ट्र पोलिस अधिनियम, आर्म अॅक्ट, दारूबंदी कायदा. दारूबंदी कायदा तसेच पोस्टे जऊळका येथे आर्म अॅक्टअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सदर कोम्बिंग ऑपरेशनसाठी पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील, अपर पोलिस अधीक्षक लता फड यांच्या मार्गदर्शनखाली तसेच रामकृष्ण पवार उपविभागीय पोलिस अधिकारी वाशिम यांच्या नेतृत्वाखाली पो. नि. सुधाकर आदे, पो. नि. राजेश खेरडे, मपोनि योगीता भारद्वाज, मसपोनि श्रीदेवी पाटील यांनी त्यांच्या टिमसह सहकार्य केले.






