Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Buldhana: कांद्याच्या दरवाढीने गृहिणींच्या डोळ्यांत पाणी; रब्बीच्या पेरणीवर पाण्याचे संकट, कांदा लागवडीवर परिणाम

Buldhana Onion Prices Hike Low Rainfall Impact: बुलढाणा जिल्ह्यात कांद्याचे दर प्रतिक्विंटल ६ हजार रुपयांपर्यंत पोहोचल्याने किरकोळ बाजारात कांदा ६० ते ७० रुपये किलोने विकला जात असून, वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांच्या घरखर्चाचे गणित बिघडले आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 11, 2026 | 06:44 PM
Buldhana Onion Prices

Buldhana Onion Prices

Follow Us
Follow Us:
  • कांदा महागला, गृहिणींचं बजेट कोलमडलं
  • बुलढाण्यात किलोचा दर ७० रुपयांवर
  • घटत्या लागवडीमुळे ग्राहकांची चिंता वाढली
बुलढाणा: जिल्ह्यात कांद्याच्या दराने सध्या सर्वसामान्यांच्या घरखर्चाचे गणित बिघडवले आहे. स्थानिक बाजारपेठेत कांद्याचे दर प्रतिक्विंटल ६ हजार रुपयांपर्यंत पोहोचल्याने किरकोळ बाजारात किलोमागे ६० ते ७० रुपये मोजावे लागत आहेत. त्यातच कमी पाऊस आणि कमी झालेली भूजल पातळीमुळे आगामी रब्बी हंगामातील कांदा लागवडीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. कांद्याचा उपलब्ध साठा कमी असताना नव्या उत्पादनाची आवकही घटल्यास दर आणखी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे ऐन सणासुदीत गृहिणींच्या स्वयंपाकघराचे बजेट वाढण्याची शक्यता आहे.

Washim: केंद्रीय पथकाकडून दुष्काळग्रस्त भागाची पाहणी; वाशिम जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा घेतला आढावा

कांदा हा दैनदिन स्वयंपाकातील महत्त्वाचा घटक आहे. भाजी, आमटी, कोशिंबीर असो वा सकाळच्या नाश्त्याच्या पोह्यांची चव कांद्याशिवाय अपुरी वाटते. मात्र, वाढत्या दरामुळे घरगुती स्वयंपाकात कांद्याचा वापर कमी करण्याची वेळ गृहिणींवर आली आहे. हॉटेल्स आणि छोट्या-मोठ्या नाश्त्याच्या गाड्यांनाही वाढत्या दराची झळ बसत आहे. सध्या किरकोळ बाजारात ६० ते ७० रुपये किलो दराने मिळणारा कांदा भविष्यात शंभर रुपयांचा टप्पा ओलांडणार का? याकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे. मात्र, आगामी दर हे लागवडीचे क्षेत्र, उत्पादन, साठवणूक आणि बाजारातील आवक यावर अवलंबून राहतील.

दसरा आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर खाद्यपदार्थांची मागणी वाढत असताना कांद्याच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खर्चात आणखी भर पडण्याची शक्यता आहे. रोजच्या जेवणापासून नाश्त्यापर्यंत कांद्याचे महत्त्व लक्षात घेता ही दरवाढ केवळ बाजारपेठेपुरती मर्यादित न राहता थेट घराघरांत जाणवत आहे. यंदाच्या हंगामात कमी पर्जन्यमानामुळे तलाव, लहान धरणे आणि विहिरींमधील पाणीसाठ्यावर ताण वाढला आहे. भूजल पातळी खालावल्याने विहिरी आणि बोरवेलमधून दीर्घकाळ सिंचनासाठी पुरेसे पाणी उपलब्ध होईलच, याची शाश्वती नाही.

कांदा लागवडीचे गणित बिघडणार

जिल्ह्यात खरीप हंगामात सोयाबीनसारख्या नगदी पिकांचे क्षेत्र मोठे आहे. त्यापाठोपाठ कपाशी, उडीद, मूग आणि ज्वारीची लागवड केली जाते. रब्बी हंगामात कांदा लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर यंदा पाण्याचे संकट उभे ठाकले आहे. जिल्ह्यातील खामगाव, मोताळा, संग्रामपूर आणि मलकापूर या तालुक्यांत सर्वाधिक कांदा लागवड केल्या जाते, मात्र यंदाच्या अपुऱ्या पावसामुळे या तालुक्यातील लागवड क्षेत्र घटनेची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

लागवड घटल्यास दरवाढीचे संकट

साठवणुकीतील कांदा खराब होणे आणि नवीन कांद्याची बाजारपेठेत मर्यादित आवक ही दरवाढीमागील कारणे असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे. त्यात आगामी हंगामात लागवड घटल्यास बाजारपेठेतील पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो, पुरवठा आणि मागणीतील अंतर वाढल्यास कांद्याचे दर आणखी चढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

वाशिममधील २९१ ‘शून्य निपुण’ शाळांवर विशेष लक्ष; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले निर्देश, प्रभावी उपाययोजनांसाठी जिल्हा सुकाणू समितीची सभा

Web Title: Buldhana onion price hike low rainfall impact rabi onion cultivation pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 11, 2026 | 06:44 PM

Topics:  

  • buldhana news
  • onion farmers
  • Onion Market
  • Onion Prices

संबंधित बातम्या

Buldhana News: १० दिवसांत जलसाठा ३ % घटला,  बुलढाणा जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची शक्यता
1

Buldhana News: १० दिवसांत जलसाठा ३ % घटला, बुलढाणा जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची शक्यता

Washim News: ‘मत वाचवा, देश वाचवा!’ वाशिममध्ये महाविकास आघाडीचे आंदोलन, निवडणूक आयोगाविरोधात एल्गार
2

Washim News: ‘मत वाचवा, देश वाचवा!’ वाशिममध्ये महाविकास आघाडीचे आंदोलन, निवडणूक आयोगाविरोधात एल्गार

बुलढाण्यात वर्षभरात  ६६ बालक, १० मातांचा मृत्यू; प्रमाण चिंताजनक; आरोग्य यंत्रणेपुढील आव्हाने कायम
3

बुलढाण्यात वर्षभरात ६६ बालक, १० मातांचा मृत्यू; प्रमाण चिंताजनक; आरोग्य यंत्रणेपुढील आव्हाने कायम

Buldhana: सोयाबीन काढणीला वेग; मध्य प्रदेशातून हजारो मजूर दाखल, स्थानिक मजुरांसमोर रोजगाराचा प्रश्न
4

Buldhana: सोयाबीन काढणीला वेग; मध्य प्रदेशातून हजारो मजूर दाखल, स्थानिक मजुरांसमोर रोजगाराचा प्रश्न

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.