Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कर्ज फेडण्यासाठी जमीन विकली, वावर गहाण अन् पत्नीचे मंगळसूत्रही ठेवले; अखेर तरुण शेतकऱ्याने जीवन संपवले

कर्जाचा डोंगर कमी करण्यासाठी जमीन विकली, आणखी एक वावर गहाण ठेवला आणि पत्नीचे मंगळसूत्रही गहाण ठेवले... तरीही परिस्थिती बदलली नाही. त्यातच ६० दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने खरिपाचे पीक हातातून गेले अन् अखेर बुलढाण्यातील तरुण शेतकरी शंकर भारसाकडे यांनी जीवन संपवले.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Oct 04, 2026 | 04:22 PM
कर्ज फेडण्यासाठी जमीन विकली, वावर गहाण अन् पत्नीचे मंगळसूत्रही ठेवले; अखेर तरुण शेतकऱ्याने जीवन संपवले

कर्ज फेडण्यासाठी जमीन विकली, वावर गहाण अन् पत्नीचे मंगळसूत्रही ठेवले; अखेर तरुण शेतकऱ्याने जीवन संपवले

Follow Us
Follow Us:
  • कर्ज फेडण्यासाठी जमीन विकली, वावर आणि पत्नीचे मंगळसूत्रही गहाण
  • ६० दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा; खरिपाचे पीक वाया गेल्याने संकट
  • सहा ओळींच्या चिठ्ठीत आर्थिक विवंचना मांडल्याची माहिती
 

बुलढाणा : दुष्काळसदृश परिस्थिती, हातातून गेलेले खरिपाचे पीक आणि वाढत्या कर्जाच्या ओझ्यामुळे शेतकरी कुटुंबांसमोरील आर्थिक संकट किती गंभीर झाले आहे, याची जाणीव करून देणारी घटना बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील चोंडी येथे घडली. कर्जबाजारीपणामुळे तरुण शेतकरी शंकर भारसाकडे यांनी जीवन संपवल्याची घटना समोर आली आहे. कर्ज फेडण्यासाठी केलेले प्रयत्न आणि शेतीतून उत्पन्नाची आशा मावळल्याने ते आर्थिक विवंचनेत होते, अशी माहिती समोर आली आहे.

हेही वाचा: Pune News: परीक्षेनंतर शिक्षकांनी पालकांना सांगण्याचं म्हटलं अन् १४ वर्षीय अनमोल घरातून गायब; जान्हवी किल्लेकरचं भावनिक आवाहन!

कर्ज फेडण्यासाठी जमीनही विकली

शंकर भारसाकडे यांनी कर्जाचा भार कमी करण्यासाठी आपली एक जमीन विकल्याचे सांगण्यात येते. आणखी एक वावर गहाण ठेवण्यात आला होता. कुटुंबाच्या आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी पत्नीचे मंगळसूत्रही गहाण ठेवण्यात आल्याची माहिती आहे. मात्र, या प्रयत्नांनंतरही कर्जाचा भार कमी झाला नसल्याचे कुटुंबीयांकडून सांगण्यात येत आहे.

सहा ओळींच्या चिठ्ठीत आर्थिक विवंचनेचा उल्लेख

घटनेपूर्वी शंकर भारसाकडे यांनी सहा ओळींची चिठ्ठी लिहिल्याची माहिती समोर आली आहे. त्यामध्ये आर्थिक परिस्थिती आणि कर्जाच्या संकटाचा उल्लेख असल्याचे सांगण्यात येत आहे. कर्ज फेडण्यासाठी केलेले प्रयत्न करूनही परिस्थितीत सुधारणा होत नसल्याची व्यथा त्यांनी मांडल्याचे कुटुंबीयांकडून सांगण्यात आले.

हेही वाचा: आठ महिन्यांची गर्भवती… दोन गुन्ह्यांत जामीन, आता पतीनेच मागितला घटस्फोट; निदा खानसमोर नवे संकट!

६० दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा

संग्रामपूर तालुक्यात यंदा पावसाने ओढ दिल्याने खरीप पिकांवर मोठा परिणाम झाला आहे. तब्बल ६० दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा असल्याने अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेले पीक पावसाअभावी वाया जाण्याची परिस्थिती निर्माण झाली असून, त्याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर झाला आहे. चोंडी येथील या घटनेमुळे दुष्काळसदृश परिस्थिती, कर्जबाजारीपणा, वाढता शेतीखर्च आणि अनिश्चित उत्पन्न यामुळे शेतकरी कुटुंबांसमोरील आर्थिक संकट पुन्हा अधोरेखित झाले आहे. अशा संकटात सापडलेल्या शेतकरी कुटुंबांना वेळेत आर्थिक तसेच मानसिक आधार आणि आवश्यक शासकीय मदत मिळण्याची गरज व्यक्त होत आहे.

Web Title: Buldhana sangrampur farmer shankar bharsakade death debt drought

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 04, 2026 | 04:22 PM

Topics:  

  • buldhana news
  • Farmer Death
  • Farmer Issue
  • Farmer Suicide

संबंधित बातम्या

Buldhana: आरटीओंनी जप्तीतील ३७ वाहने केली परत, ३५ वाहनांच्या लिलावाची प्रक्रिया सुरू; ३ लाख रुपयांचा दंड वसूल
1

Buldhana: आरटीओंनी जप्तीतील ३७ वाहने केली परत, ३५ वाहनांच्या लिलावाची प्रक्रिया सुरू; ३ लाख रुपयांचा दंड वसूल

Buldhana News: बांधावर महसूल-कृषी विभागाचे पंचनामे, पावसाअभावी खरीप पिके करपली; अमडापूर परिसरात सोयाबीनच्या पोकळ शेंगा
2

Buldhana News: बांधावर महसूल-कृषी विभागाचे पंचनामे, पावसाअभावी खरीप पिके करपली; अमडापूर परिसरात सोयाबीनच्या पोकळ शेंगा

Buldhana: खरीप  ई- पीक पाहणी नोंदणीला प्रारंभ; १० नोव्हेंबरपर्यंत पीक पाहणी पूर्ण करा,जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
3

Buldhana: खरीप ई- पीक पाहणी नोंदणीला प्रारंभ; १० नोव्हेंबरपर्यंत पीक पाहणी पूर्ण करा,जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

Buldhana: उद्योगपतींचे कर्ज माफ, मग शेतकऱ्यांचे पुनर्गठन का? खासदार अरविंद सावंत यांचा सवाल; दुष्काळ मदतीवरून शिवसेना आक्रमक
4

Buldhana: उद्योगपतींचे कर्ज माफ, मग शेतकऱ्यांचे पुनर्गठन का? खासदार अरविंद सावंत यांचा सवाल; दुष्काळ मदतीवरून शिवसेना आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.