Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Buldhana: अवैध पाणी उपशावर कारवाई करा, पाणीटंचाई निवारणासाठी सज्ज राहा; जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

Buldhana Water Shortage News: संभाव्य एल-निनोच्या प्रभावामुळे बुलढाणा जिल्ह्यात आगामी काळात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांनी प्रभावी नियोजन करण्याचे निर्देश दिले आहेत.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 18, 2026 | 04:58 PM
Buldhana Water Shortage

Buldhana Water Shortage

Follow Us
Follow Us:
  • बुलढाण्यात पाणीटंचाईचं संकट?
  • एल-निनोच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन अलर्ट
  • जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य
बुलढाणा: संभाव्य ‘एल-निनो’च्या प्रभावामुळे आगामी काळात पाणीटंचाईची परिस्थिती उद्भवण्याची शक्यता लक्षात घेता, जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी आतापासूनच प्रभावी नियोजन करावे. अवैध पाणी उपशावर कठोर कारवाई करून उपलब्ध जलस्रोतांचे संरक्षण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील जिजाऊ सभागृहात आयोजित पाणीटंचाई व्यवस्थापनाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी सुधीर खांदे, रोजगार हमी योजना उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री ठाकरे, निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश कव्हळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष डाबरे, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यात पाणीटंचाईची संभाव्य परिस्थिती लक्षात काम करावे. पाणीपुरवठ्याचे सूक्ष्म काटकसरीने वापर होईल, याची घेऊन सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने नियोजन करून उपलब्ध पाण्याचा दक्षता घ्यावी.

आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करा

जिल्ह्यात अवैध पाणी उपशास बंदी घालण्यात आली असून, या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करावी. अवैधरीत्या पाणी उपसा होत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर तातडीने कारवाई करावी. उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांनी या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देऊन नियमित देखरेख ठेवावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शेतकऱ्यांशी संवेदनशीलतेने वागा

शासनाकडून शेतकऱ्यांना पाच हजार रुपये मदत देण्याच्या अनुषंगाने आवश्यक पूर्वतयारी करावी. संबंधित शेतकऱ्यांची अॅग्रीस्टैंक नोंदणी व ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घेण्यासाठी नियोजन करावे. शेतकऱ्यांना योजनांचा लाभ मिळवून देताना त्यांच्याशी संवेदनशीलतेने वागावे आणि आवश्यक सहकार्य करावे, असेही जिल्हाधिकारी डॉ. देवरे यांनी सांगितले.

जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य द्या

‘विकसित भारत रोजगार व आजीविका हमी अभियान (ग्रामीण) अंतर्गत जलसंधारणाची कामे प्रभावीपणे राबवावीत. पावसाचे पाणी साठविणे आणि भूजलपातळीत वाढ करण्यासाठी वॉटर हार्वेस्टिंग, शेततळी, खुल्या जागांमध्ये पाणी मुरविण्यासाठी खडे तयार करणे, गाळ काढणे तसेच अन्य जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य द्यावे. रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ही कामे नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यावर भर द्यावा, असे निर्देश त्यांनी दिले.

Buldhana: ‘जिगाव ‘साठी ३५ हजार कोटी द्या; केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांकडे ना. प्रतापराव जाधव यांची मागणी

Web Title: Buldhana water shortage el nino illegal water extraction action pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 18, 2026 | 04:58 PM

Topics:  

  • Buldana News
  • buldhana news
  • Water Shortage

संबंधित बातम्या

Wardha News : वर्धेकरांनो, पाणी जपून वापरा! १४ गावांचा पाणीपुरवठा ५ दिवस बंद, २१ ऑक्टोबरपासून तांत्रिक कामासाठी शटडाऊन
1

Wardha News : वर्धेकरांनो, पाणी जपून वापरा! १४ गावांचा पाणीपुरवठा ५ दिवस बंद, २१ ऑक्टोबरपासून तांत्रिक कामासाठी शटडाऊन

Buldhana: खरीप हंगामासाठी घरगुती सोयाबीन बियाणे जतन करा; जिल्हा कृषी विभागाचे आवाहन
2

Buldhana: खरीप हंगामासाठी घरगुती सोयाबीन बियाणे जतन करा; जिल्हा कृषी विभागाचे आवाहन

Buldhana: दुष्काळावर मात करण्यासाठी प्रशासनाचा मास्टर प्लॅन; १० हजारांहून अधिक कामांचे नियोजन
3

Buldhana: दुष्काळावर मात करण्यासाठी प्रशासनाचा मास्टर प्लॅन; १० हजारांहून अधिक कामांचे नियोजन

Maharashtra Drought 2026: दुष्काळाचा हाहाकार! पाच दुष्काळ पाहिलेल्या ९५ वर्षीय वृद्धाची हृदयद्रावक हाक; ‘अशी परिस्थिती कधी…’
4

Maharashtra Drought 2026: दुष्काळाचा हाहाकार! पाच दुष्काळ पाहिलेल्या ९५ वर्षीय वृद्धाची हृदयद्रावक हाक; ‘अशी परिस्थिती कधी…’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.