Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Buldhana: दुष्काळावर मात करण्यासाठी प्रशासनाचा मास्टर प्लॅन; १० हजारांहून अधिक कामांचे नियोजन

Buldhana drought Kharif Season Crisis: बुलढाणा जिल्ह्यात अल्प पर्जन्यमानामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने रोजगारनिर्मिती आणि दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांना गती दिली आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 17, 2026 | 05:51 PM
photo- Ai generated

photo- Ai generated

Follow Us
Follow Us:
  • बुलढाण्यात दुष्काळ निवारणासाठी मोठी तयारी
  • जलसंधारणापासून वृक्षलागवडीपर्यंत हजारो कामांचे नियोजन
  • ३.९४ लाख मजुरांना रोजगाराचे उद्दिष्ट

बुलढाणा: यंदाचा खरीप हंगाम शेतकऱ्यांसह शेतमजुरांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. त्यातच रब्बी हंगामातूनही अपेक्षित रोजगार आणि उत्पन्नाची हमी नाही. खरीप हंगामात अत्यल्प राहिलेल्या पर्जन्यमानामुळे जिल्ह्याला दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. कोरड्या दुष्काळामुळे जिल्ह्यातील उद्भवलेल्या दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध उपायोजनांना गती दिली आहे. जलसंधारण, सिंचन क्षमता वाढविणे, वृक्षलागवड, कृषी विकास आणि ग्रामीण पायाभूत सुविधांच्या कामांवर भर देण्यात येत असून, २०२६-२७ च्या वार्षिक नियोजन आराखड्यात तब्बल १० हजार ११३ कामांचे नियोजन करण्यात आले. या माध्यमातून जिल्ह्यातील ३ लाख ९४ हजार ९५ मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्यासोबतच भविष्यातील पाणीटंचाई कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले.

Washim: जबरी चोरी करणारी टोळी गजाआड; स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; ६ लाखांवर मुद्देमाल हस्तगत

जिल्ह्यात ग्रामीण भागातील रोजगारनिर्मितीला चालना देण्यासोबतच जलसंधारण, वृक्षलागवड, सिंचन सुविधा आणि दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांवर भर देण्यात येत आहे. सन २०२६-२०२७ या आर्थिक वर्षाच्या वार्षिक आराखड्यात एकूण १ लाख ७५ हजार ३६४ कामांचा समावेश करण्यात आला आहे. या माध्यमातून ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, पाणीटंचाईवर मात करणे आणि नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन करणे, हा उद्देश आहे. जिल्ह्यात सध्या एकूण १० हजार ११३ कामे शेल्फवर उपलब्ध असून, त्यांची मजूर क्षमता ३ लाख ९४ हजार ९५ इतको आहे. त्यामुळे गरजेनुसार विविध विकासकामे हाती घेऊन ग्रामीण भागातील मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्याची संधी निर्माण झाली.

जलसंधारण, वृक्षलागवडीच्या कामांवर भर

जिल्ह्यात सुरू असलेल्या कामामध्ये जलसंधारण आणि वृक्षलागवडीशी संबंधित कामांचा मोठा समावेश आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, या क्षेत्राशी संबंधित एकूण १२ हजार ५७८ कामे असून, त्यामध्ये वृक्षलागवड, फळबाग लागवड, सिंचन विहिरी आणि मातोश्री पांदण रस्त्याचा समावेश आहे. यामध्ये २ हजार ६४८ वृक्षलागवडीची कामे, ५ हजार ७०८ फळबाग लागवडीची कामे, ३ हजार ४०१ सिंचन विहिरीची कामे आणि ५२७ मातोश्री पांदण रस्त्यांच्या कामांचा समावेश आहे. या कामांमुळे शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढविणे, हरित क्षेत्रात वाढ करणे, फळबाग लागवडीला प्रोत्साहन देणे आणि शेतरस्त्यांची सुविधा सुधारणे शक्य होणार आहे. या सर्व कामांमधून एकूण ५५ लाख ४१ हजार ८२० मनुष्यदिनांची निर्मिती होण्याची क्षमता असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे ही कामे ग्रामीण भागातील रोजगारनिर्मितीसोबतच कृषी विकासासाठीही महत्वाची ठरणार आहेत

दुष्काळ निवारणासाठी विशेष उपाययोजना

जिल्ह्याच्या २०२६-२०२७ च्या वार्षिक आराखड्यात दुष्काळ निवारणाच्या दृष्टीने विविध कामांचा समावेश करण्यात आला. पावसाचे पाणी जमिनीत मुरविणे, भूजल पातळीत सुधारणा करणे, पाण्याचा कार्यक्षम वापर करणे आणि शेतीला पाण्याची उपलब्धता वाढविणे, या उद्देशाने पुढील कामांचे नियोजन करण्यात आले.

रोजगारासोबतच शाश्वत विकासाचे उद्दिष्ट

जिल्ह्यातील विविध विकासकामांच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती आणि नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन या दोन्ही उद्दिष्टांना महत्त्व देण्यात वेत्त आहे. जलसंधारणाची कामे, विहीर पुनर्भरण, शेततळी, फळबाग लागवड आणि वृक्षलागवड यांसारख्या उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा मजबूत होण्यास मदत होऊ शकते.

Washim: कारंजा-वाशिम मार्गावर भीषण दुर्घटना! दोन मुख्याध्यापकांसह तिघांचा मृत्यू; परिसरात शोककळा

Web Title: Buldhana drought relief 10000 works rural employment 2026 27 pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 17, 2026 | 05:51 PM

Topics:  

  • Aid to Farmers
  • buldhana news
  • Crisis on farmers

संबंधित बातम्या

Buldhana: ‘जिगाव ‘साठी ३५ हजार कोटी द्या; केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांकडे ना. प्रतापराव जाधव यांची मागणी
1

Buldhana: ‘जिगाव ‘साठी ३५ हजार कोटी द्या; केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांकडे ना. प्रतापराव जाधव यांची मागणी

Buldhana: दुष्काळग्रस्तांसाठी ग्राम महसूल अधिकाऱ्यांचा पुढाकार; एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला
2

Buldhana: दुष्काळग्रस्तांसाठी ग्राम महसूल अधिकाऱ्यांचा पुढाकार; एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला

Buldhana: मलकापुरात १२ डीजे मालकांविरुद्ध गुन्हा, दुर्गा स्थापना मिरवणुकीतील डीजेला दणका; आवाजाची नोंद १२०.४ डेसिबल
3

Buldhana: मलकापुरात १२ डीजे मालकांविरुद्ध गुन्हा, दुर्गा स्थापना मिरवणुकीतील डीजेला दणका; आवाजाची नोंद १२०.४ डेसिबल

Buldhana: उत्पादन घटले; सोयाबीनचे दर वधारले, अपुऱ्या पावसाचा फटका; शेतकरी दुहेरी आर्थिक संकटात
4

Buldhana: उत्पादन घटले; सोयाबीनचे दर वधारले, अपुऱ्या पावसाचा फटका; शेतकरी दुहेरी आर्थिक संकटात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.