Jalgaon Jamod Drought News
जळगाव जामोद: यंदा पावसाचे प्रमाण अत्यल्प आणि अनियमित राहिल्यामुळे जळगाव जामोद तालुक्यातील निंभोरा बुद्रुक, खेर्डा खुर्द येथील शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले, पिकांची वाढ समाधानकारक न झाल्याने बळीराजाला प्रचंड आर्थिक अडचणींचा सामना करावा – लागत आहे. या भीषण परिस्थितीची दखल घेत संपूर्ण जळगाव जामोद तालुका कोरडा दुष्काळग्रस्त घोषित करण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी तालुक्यातील निंभोरा बु. व खेडों खुर्द येथील शेतकऱ्यांनी मंगळवारी तहसीलदारांना निवेदन दिले आहे. मागण्या मान्य न झाल्यास २८ सप्टेंबरपासून तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसण्याचा निर्वाणीचा इशारा शेतकऱ्यांनी दिला.
जळगाव जामोद तालुका तातडीने दुष्काळग्रस्त घोषित करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवावा. यावेळी अमोल बहादरे, ज्ञानेश्वर खंडारे, पांडुरंग उगले, रमेश देशमुख, आनंद सुरळकर, आनंद बुदे, नारायण खंडारे, विठ्ठल दिवडे, विलास डवंगे, अनंता कोंडे, प्रज्वल देशमुख, ज्ञानेश्वर अंभोरे, गजानन बुंदे, दशरथ उगले, भीमराव वानखडे, सागर सपकाळ सह अन्य शेतकरी उपस्थित होते.
पिकावर नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यान्न त्वरित आर्थिक मदत देण्यात यावी, शासकीय योजनांचा लाभ दुकाळी सवलती आणि उपलब्ध शासकीय योजनांचा लाभ सर्व शेतकऱ्यांना मिळावा चारा व पाण्याची सोयः पाणीटंचाई आणि जनावराच्या चाऱ्याची गंभीर समस्या लक्षात घेऊन तातडीने अवाश्यक उपाययोजना कराव्यात, पीक विमा वाटपः २०२५-२६ चा पीक विमा शेतक-यांना विनाविलंब देण्यात यावा, बुलढाणा जिल्हाधिकारी आणि जळगाव जामोदवे उपविभागीय अधिकारी यांनाही वा निवेदनाची प्रत पाठवण्यात आली. शेतकरी आधीच अरमानी संकटाने होरपळाला असून, आता प्रशासनाने तातडीने पावले न उचलल्यास २८ सप्टेंबरपासून शेतक-यांचा उद्रेक आमार उप्रेषणाच्या रूपात पाहायला मिळू शकतो. त्यामुळे आता प्रशासन यावर काय निर्णय घेोगार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून आहे.
Washim News: वाशिम जिल्ह्यातील दुष्काळाची पाहणी करा; पालकमंत्री भरणे यांचे प्रशासनाला निर्देश






