Washim ZP Schools CCTV Surveillance Measures
जिल्ह्यात अल्पवयीन मुली व महिलांवरील लैंगिक अत्याचार, छेडछाड आणि गैरप्रकारांना प्रतिबंध करण्यासाठी शाळांमध्ये प्रभावी सुरक्षा व्यवस्था असणे आवश्यक असल्याचे डॉ. वाठोरे यांनी निवेदनात नमूद केले. सर्व जिल्हा परिषद शाळांच्या परिसरात आवश्यक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवून त्यांचे रेकॉर्डिंग सुरक्षित ठेवावे व नियमित निरीक्षणाची व्यवस्था करावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच शाळेत विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या शाळांमध्ये महिला सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करावी, विद्यार्थिनींमध्ये गुड टच-बॅड टच, स्वसंरक्षण व लैंगिक अत्याचार प्रतिबंधाबाबत जनजागृती करावी आणि तक्रारींच्या तातडीच्या निवारणासाठी प्रभावी यंत्रणा उभारावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली. विद्यार्थिनी व महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गांभीर्याने घेऊन प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी.






