बुलढाणा : ‘एव्हरी डे इज नॉट ए संडे फॉर फिश ओनली’ अशा अर्थाची एक मासे खाणाऱ्यांसाठीची म्हण आहे. प्रत्येक रविवारी ज्याला आवडेल तो मासा मिळेलच असे नाही. मात्र, मासा खाताना जबड्याला, जिभेला तो टोचला, अडकला नाही पाहिजे, ही काळजी घेतली जाते. यासाठी काटा नसलेले समुद्री मासेच विकत घेण्याचा कल ओळखून निलेश गवळी पाटील यांनी येथील धाड नाक्यावर थेट मुंबईतील समुद्री मासे उपलब्ध करून दिले आहे. शिवाय जिवंत माशांची वाहनाद्वारे दारोदारी विक्री सुरू केल्याने रोजगारालाही वाट मिळाली आहे.
[read_also content=”ट्रक चालकानेच केली २६ लाखाच्या विदेशी दारूची अफरातफर, अपघाताचे नाटक करत ट्रक घुसवला चक्क नाल्यात https://www.navarashtra.com/wardha/vidarbha/wardha/truck-driver-embezzles-rs-26-lakh-worth-of-foreign-liquor-pretends-to-be-an-accident-nraa-250512.html”]
निलेश गवळी यांनी ग्रॅज्युएशन पूर्ण केले. पण नोकरी मिळाली नाही. या नैराश्यातून त्यांनी सावरायचा प्रयत्न मात्र सुरू ठेवला. एकदा सातारा येथे जिवंत मासे विक्री करतांना पाहिले असता, त्यांनी हा प्रयोग बुलढाणा येथे करण्याचा निर्णय घेतला. मात्र, ही वाट बिकट होती. यासाठी त्यांनी सलग ३ वर्षे मस्य तलावाचा अभ्यास केला. निलेश गवळी यांना जिल्ह्यातील मस्य व्यवसायाचाही अभ्यास होताच. धरणाच्या, नदीच्या माशांमध्ये काटे अधिक असणाऱ्या खूप प्रजाती आहेत. महाग असले तरी माशांना मागणी आहे. समुद्री माशांना तर अधिकच मागणी असते, हे गवळी यांनी हेरले. कटला, रोहू, वायर, मरळ, पंकज असे माशांचे ठराविक प्रकार बुलढाण्यात पाहायला मिळतात. काटा अलगत बाजूला काढून खाण्यात कोकणी लोक तरबेज आहेत.
[read_also content=”जागतिक महिला दिनाच्या पूर्वीच महिलेवर गॅंग रेप ! विवाहितेसोबत होता तिचा पती, महिला सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर.. https://www.navarashtra.com/buldhana/vidarbha/buldhana/gang-rape-on-woman-just-before-international-womens-day-the-victim-was-with-the-married-woman-and-her-husband-nraa-250529.html”]
जिल्ह्यात मात्र अनेक मासे खवय्या काट्यांच्या नादाला लागण्यापेक्षा काटे नसलेल्या माशांना पसंती देतात. नेमकी हीच मेख निलेश गवळी पाटील यांनी ओळखली. येथील धाड नाक्यावर रामराम मच्छी शॉप उघडून मुंबईतील प्रसिद्ध असलेले समुद्री मासे उपलब्ध केले आहे. सुरमई, बांगडा, राणीमाशी, पांढरा व पिवळा बाम, छोटे प्रॉन्स, टायगर प्रॉन्स, गोडंबी,पांढरा पापलेट, मांदेली, बोंबील, रावस, मरळ असे विविध समुद्री मासे आता नागरिकांना सहज खरेदी करता येत आहे. शिवाय फिरत्या वाहनाद्वारे दारोदारी मत्स्य विक्री होत असल्याने खवय्यांना घरपोच सेवा उपलब्ध होत आहे.
[read_also content=”लतादीदींच्या १०० बहारदार गाण्यांचे तब्बल १२ तास गायन करून केली श्रद्धांजली अर्पण https://www.navarashtra.com/nagpur/vidarbha/nagpur/tribute-was-paid-by-singing-100-songs-of-latadidi-for-12-hours-nraa-250566.html”]
विदर्भातील पहिलाच प्रयोग
सर्वच ठिकाणी मासे विक्री केली जाते. परंतु, मासे ताजे मिळत नाहीत. दारोदारी जाऊन वाहनात ठेवलेल्या पाण्याच्या टाकीमधील जिवंत माशा विक्रीचा केलेला हा प्रयोग विदर्भातून पहिला असल्याचे निलेश गवळी सांगतात. शहरातील विविध भागात वाहनाद्वारे जिवंत मासे विक्री होत असल्याने खवय्यांना घरपोच सेवा उपलब्ध होत आहे.
रोजगाराचे जाळे
निलेश गवळी यांनी एका मत्स्य तलावाची निर्मिती केली. या माध्यमातून तब्बल ६० जणांना तर, रामराम मच्छी शॉपच्या माध्यमातून १२ तरुणांना रोजगार उपलब्ध झाला. लवकरच शॉपच्या ५ शाखा कार्यान्वित होणार, बेरोजगारांना संधी देण्यावर भर आहे. आजच्या तरुणांनी बेरोजगारीचे रडगाणे बाजूला सारून जिद्द व चिकाटीने सोय रोजगारातून विकास साधावा.
Reported by – प्रशांत खंडारे






