बुलडाणा : पल्स पोलीओ लसीकरण मोहिम ही अत्यंत व्यापक व महत्वाकांक्षी योजना आहे. या मोहिमेंतर्गत 0 ते 5 वर्षे वयोगटातील सर्व बालकांना पोलिओचे लसीकरण करण्यात येत आहे. आज सकाळी सुरवात करण्यात आली. खामगांव तालुक्यात व शहरात एकूण 30 हजार 554 बालक असून 254 केंद्रावर लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.
पल्स पोलीओ लसीकरण मोहिम ही अत्यंत व्यापक व महत्वाकांक्षी योजना आहे. या मोहिमेंतर्गत 0 ते 5 वर्षे वयोगटातील तालुक्यातील सर्व बालकांना पोलिओच्या लसीकरणाची मोहिमेची सुरुवात आज खामगांव मतदार संघाचे आमदार आकाश फुंडकर यांच्या हस्ते बालकांना डोस पाजून सुरु करण्यात आली. आपल्या तालुक्यातील ५ वर्षाच्या आतील एकही बालक पोलिओ लसीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता प्रत्येक स्तरावर घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. निलेश टापरे यांनी सांगितले. प्रवास करणाऱ्या बालकांना लस देण्यासाठी एस. टी. स्टॅन्ड, रेल्वे स्टेशन, आदी ठिकाणे येथे लसीकरण केद्रे उघडण्यात आले आहेत. या मोहिमेत ग्रामीण व शहरी भागासाठी खामगांव उप सामान्य रुग्णालयातील सर्व परिचारिका, आशा सेविका, सहभागी झाल्या आहेत. दुपारपर्यंत खामगांव तालुक्यात 500 च्या वर बालकांना पोलिओचा डोस देण्यात आला होता.
[read_also content=”अभिजात भाषा म्हणजे काय? एखाद्या भाषेला हा दर्जा कसा मिळतो? आतापर्यंत कोणकोणत्या भाषांना मिळालाय दर्जा ? https://www.navarashtra.com/latest-news/dinvishesh/marathi-bhasha-din/marathi-bhasha-gaurav-din-special-article-nrps-246035.html”]