
Washim Farmer Loan Waiver:
तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाच्या दुरुस्तीला वेग; कामे दोन दिवसांत पूर्ण करण्याचे नियोजन
योजनेअंतर्गत अद्याप ७ हजार ४०४ पात्र लाभार्थी शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण बाकी आहे. अॅग्रीस्टैंक फार्मर आयडीची नोंदणी नसल्याने प्रमाणीकरण प्रलंबित आहे. योजनेचा लाभमिळविण्यासाठी अॅग्रीस्टैंक पोर्टलवर शेतकऱ्यांची नोंदणी असणे बंधनकारक आहे. प्रमाणीकरण बाकी असलेल्या शेतकऱ्यांनी आपला विशिष्ट क्रमांक आणि आधार क्रमांक घेऊन नजीकच्या ‘आपले सरकार सेवा केंद्रा’ला भेट द्यावी. अॅग्रीस्टैंक फार्मर आयडीची नोंदणी करून लवकरात लवकर आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर आणि जिल्हा उपनिबंधक माणिकराव लटपटे यांनी केले.
वाशिम जिल्ह्यात आतापर्यंत ४६ हजार ६९८ शेतक-यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे, त्यापैकी ४३ हजार ६६० पात्र लाभाष्यांच्या खात्यात पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात मिळून ३७४.९१ कोटी रुपये जमा झाले आहेत. यामध्ये सेवा सहकारी संस्थाच्या (जिल्हा मध्यवर्ती बैंक) २५ हजार २०५ सभासदांना २००.२३ कोटी रुपये, तर राष्ट्रीयकृत बैंकांच्या १८ हजार ४५५ सभासदांना १७४ ६८ कोटी रुपयांचा लाभ मिळाला आहे.