Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Washim News: तीन मेहुण्यांना ५ वर्षांचा कारावास, पत्नीची निर्दोष मुक्तता; जावयाच्या हत्येचे प्रकरण

Washim Brother In Law Murder Case: वाशिममधील जावयाच्या हत्या प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालयाने तिघा मेहुण्यांना दोषी ठरवत प्रत्येकी ५ वर्षांचा सश्रम कारावास आणि १५ हजार रुपयांचा दंड ठोठावला. तर मृताच्या पत्नीची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 03, 2026 | 04:47 PM
court order

court order

Follow Us
Follow Us:
  • तीन मेहुण्यांना ५ वर्षांचा कारावास
  • पत्नीची निर्दोष मुक्तता
  • जावयाच्या हत्येचे प्रकरण
वाशिम: जिल्ह्यातील मंगरूळपीर मार्गावरील साखरा परिसरात ऑक्टोबर २०२४ मध्ये घडलेल्या जावयाच्या हत्येप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने तिघा मेहुण्यांना दोषी ठरवत प्रत्येकी ५ वर्षांचा सश्रम कारावास व १५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तर, या प्रकरणातील चौथी आरोपी असलेल्या मृताच्या पत्नीची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली.

बुलढाण्यात पावसाचा धुमाकूळ; ११ तालुक्यांमध्ये १०० मिमीपेक्षा अधिक पाऊस, मलकापूर-सोलापूर महामार्ग ठप्प

२३ ऑक्टोबर २०२४ रोजी नारायण इंगळे हे त्यांचे मित्र प्रल्हाद इंगळे यांच्यासह मंगरूळपीर मार्गावरील राजमुद्रा राजा हॉटेलजवळ चहा पिण्यासाठी थांबले होते. त्यावेळी नारायण इंगळे यांचे मेहुणे विशाल महाले, सचिन महाले आणि अनिल महाले यांनी संगनमताने त्यांच्यावर हल्ला केला. ‘आमच्या बहिणीला मारता का?’ असे म्हणत लोखंडी रॉड आणि प्लास्टिकच्या पाईपने त्यांना बेदम मारहाण करण्यातआली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या नारायण इंगळे यांना उपचारासाठी मंगरूळपीर येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर या प्रकरणाचा तपास वाशिम ग्रामीण पोलिसांकडे सोपविण्यात आला.

या प्रकरणाचा निकाल जिल्हा न्यायाधीश-१ जे. पी. झपाटे यांच्या न्यायालयाने १ ऑगस्ट रोजी दिला. न्यायालयाने आरोपी विशाल उर्फ किसाना वसंत महाले (२८), सचिन वसंत महाले (२५) आणि अनिल उर्फ जगदीश परशराम महाले (२१, सर्व रा. जांभूरुण महाली, ता. जि. वाशिम) यांना भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ मधील कलम १०५ (२) सह कलम ३(५) अन्वये दोषी ठरवून प्रत्येकी पाच वर्षांचा सश्रम कारावास आणि १५ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.दंडाची रक्कम न भरल्यास अतिरिक्त कारावास भोगावा लागणार आहे. दरम्यान, या प्रकरणातील चौथी आरोपी व मृताची पत्नी शारदा नारायण इंगळे (वय ३७हिच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ४९ अंतर्गत आरोप सिद्ध करण्यासाठी पुरेसे पुरावे उपलब्ध नसल्याने न्यायालयाने तिची निर्दोष मुक्तता केली.

११ साक्षीदारांची नोंदविली साक्ष

या खटल्यात एकूण ११ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. त्याआधारे नारायण इंगळे यांचा मृत्यू मेहुण्यांकडून झालेल्या मारहाणीमुळे झाल्याचे न्यायालयाने ग्राह्य धरले. सरकारी पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता पी. एस. ढोबळे यांनी कामकाज पाहिले, तर अॅड. राहुल एम. पुरोहित यांनी त्यांना सहकार्य केले. प्रकरणाचा तपास तत्कालीन वाशिम ग्रामीण पोलिस ठाण्याच्या ठाणेदार श्रीदेवी पाटील यांनी केला. तपास कार्यात भैरवी अजय शिंदे आणि पोलिस कॉन्स्टेबल किरण तायडे यांनी सहकार्य केले.

खामगावात ढगफुटीसदृश पाऊस; जळगाव जामोद, संग्रामपूर, शेगाव, खामगाव तालुक्यांना फटका

Web Title: Washim son in law murder case three brothers in law convicted

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2026 | 04:45 PM

Topics:  

  • murder case news
  • Washim
  • Washim Crime News

संबंधित बातम्या

Washim News: धावपट्टी, थाळीफेक स्पर्धेत म्हसणीच्या विद्यार्थ्यांची बाजी; तालुकास्तरीय विविध स्पर्धेत प्रथम व द्वितीय क्रमांक
1

Washim News: धावपट्टी, थाळीफेक स्पर्धेत म्हसणीच्या विद्यार्थ्यांची बाजी; तालुकास्तरीय विविध स्पर्धेत प्रथम व द्वितीय क्रमांक

Washim News: वाशिम जिल्ह्यातील दुष्काळाची पाहणी करा; पालकमंत्री भरणे यांचे प्रशासनाला निर्देश
2

Washim News: वाशिम जिल्ह्यातील दुष्काळाची पाहणी करा; पालकमंत्री भरणे यांचे प्रशासनाला निर्देश

एस. आर. कॉन्व्हेंटच्या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड; बुद्धिबळ अन्  योगासनात १२ विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी
3

एस. आर. कॉन्व्हेंटच्या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड; बुद्धिबळ अन् योगासनात १२ विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.