मुंबई : भाजप (BJP) नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्ज बुडवल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून कंबोज यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. कंबोज यांच्यावर फसवणूक आणि कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोहित कंबोज यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आर्थिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. कर्ज बुडवल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कंबोज यांच्या कंपनीने २०११ ते २०१५ या कालावधीत इंडियन ओव्हरसिज बँकेकडून ५२ कोटी रुपयाचे कर्ज घेतले होते. पण ते कर्ज ज्या कारणासाठी घेतले, त्यासाठी त्यांचा न वापर करता ती रक्कम इतर ठिकाणी वापरण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच, त्यानंतर ते कर्ज बुडवल्याचाही ठपका कंबोज यांच्यावर ठेवण्यात आला होता.
कंबोज यांनी ते कर्ज बुडवले. याप्रकरणी कंबोज आणि त्यांच्या कंपनीच्या दोन संचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणूक आणि कट रचल्याचा त्यांच्याविरोधात आरोप ठेवण्यात आला आहे. कंबोज यांनी स्वतः ट्वीट करून त्यांच्याविरोधातले आरोप फेटाळले आहेत.
मोहित कंबोज म्हणाले की, “मला समजले की, मुंबई पोलिसांनी माझ्याविरोधात एफआयआर दाखल केली आहे. एक जुनी कंपनी जी २०१७ मध्ये बंद झाली आहे. त्याचे बॅंक इश्यू काढून माझ्यावर गुन्हा दाखल केला आहे. मला असे वाटते की, महाविकास आघाडी सरकार असे करुन माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असेल किंवा मला धमकावण्याचा प्रयत्न करत असेल तर तसे अजिबात होणार नाही. हा नवाब मलिकांचा बदला असेल किंवा संजय राऊतांचा, मी याविरोधात कोर्टात कायदेशीर लढा देईन. आम्ही याला घाबरणार नाही” असे म्हणत सर्व आरोप फेटाळले आहेत.