Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 27 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सावखेड भोई ग्रामपंचायतीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरण; १५ दिवसांत कारवाईचे आश्वासन, उपोषणाची सांगता

सावखेड भोई ग्रामपंचायतीतील कथित निधी अपहार प्रकरणात कारवाईच्या मागणीसाठी प्रल्हाद हांडे यांनी केलेले उपोषण प्रशासनाच्या आश्वासनानंतर मागे घेतले. चौकशी अहवालात 15 व्या वित्त आयोगाच्या निधीमध्ये अपहार झाल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 11, 2026 | 09:22 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

सावखेड भोई ग्रामपंचायतीतील कथित आर्थिक गैरव्यवहार आणि निधी अपहार प्रकरणात दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी दिव्यांग नागरिक प्रल्हाद नारायण हांडे यांनी पंचायत समिती कार्यालयासमोर सुरू केलेले उपोषण मंगळवारी रात्री मागे घेतले. प्रशासनाकडून १५ दिवसांच्या आत आवश्यक कारवाई करण्यात येईल, असे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर त्यांनी उपोषणाची सांगता केली. प्रल्हाद हांडे यांनी ३० डिसेंबर २०२५ रोजी सावखेड भोई ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर चौकशी समिती नेमण्यात आली होती. समितीच्या अहवालात १५ व्या वित्त आयोगाच्या निधीमध्ये अपहार झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच संबंधित सरपंच आणि ग्रामसेवकांनी अपहाराची रक्कम ग्रामपंचायत निधीत जमा केल्याचाही उल्लेख अहवालात करण्यात आला आहे.

शासनाच्या ४ जानेवारी २०१७ च्या परिपत्रकानुसार अपहार सिद्ध झाल्यास संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करणे अपेक्षित आहे. मात्र चौकशीत अनियमितता स्पष्ट होऊनही अद्याप कोणतीही दंडात्मक कारवाई करण्यात आलेली नसल्याचा आरोप हांडे यांनी केला होता. याशिवाय तक्रारीच्या चौकशीसाठी वारंवार पंचायत समिती कार्यालयात जावे लागल्याने मानसिक, शारीरिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागल्याचेही त्यांनी निवेदनात नमूद केले.

राज्यातील एमआरआय, सीटी स्कॅन व पीईटी सीटी स्कॅन प्रकल्पांना गती देणार : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

चौकशी अहवालानुसार दोषींवर तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करावेत, संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि शासन निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करावी, या मागण्यांसाठी त्यांनी सोमवारी उपोषण सुरू केले होते. शासन नियमानुसार तक्रारीची चौकशी एका महिन्याच्या आत पूर्ण होणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात त्यासाठी चार महिन्यांचा कालावधी लागल्याचा आरोपही त्यांनी केला.

उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी गटविकास अधिकारी मुकेश माहोर, जिल्हा परिषद सहाय्यक गटविकास अधिकारी एस. डी. तायडे, शिवसेना नेते दीपक बोरकर, ग्रामसेवक एन. एस. राठोड आणि विठ्ठल माने यांनी उपोषणस्थळी भेट देऊन चर्चा केली. यावेळी चौकशी समितीच्या आदेशानुसार पुढील १५ दिवसांत आवश्यक कारवाई करण्यात येईल, असे लेखी आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले. त्यानंतर प्रल्हाद हांडे यांनी आपले उपोषण मागे घेतले.

कोळेगांवच्या उपसरपंचपदी मंगल बेंदगुडे यांची बिनविरोध निवड

यावेळी गणेश हांडे, प्रवीण हांडे, बंडूराजे डोळस, नारायण जाधव, कांता हांडे, ज्ञानेश्वर टेकाळे, ज्ञानेश्वर माने, रविंद्र मगर, अमोल टेकाळे, वैभव ढोबळे, प्रवीण माने, यश पाटील, संतोष टेकाळे आदी उपस्थित होते. या प्रकरणातील पुढील कारवाईकडे आता ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Case regarding alleged financial irregularities in the savkhed bhoi gram panchayat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2026 | 09:22 PM

Topics:  

  • buldhana news
  • Washim news

संबंधित बातम्या

शिरपूर येथील आगीत चार दुकानातील साहित्य खाक; वाशिम, मालेगाव, रिसोड येथील अग्निशमनदल दाखल
1

शिरपूर येथील आगीत चार दुकानातील साहित्य खाक; वाशिम, मालेगाव, रिसोड येथील अग्निशमनदल दाखल

Buldhana News : शासकीय शाळांमध्ये मुलांना प्रवेश द्या! अजित पवार गेल्याने राजकीय पोकळी
2

Buldhana News : शासकीय शाळांमध्ये मुलांना प्रवेश द्या! अजित पवार गेल्याने राजकीय पोकळी

Buldhana News : पहिल्याच पावसात रस्त्यांची दैना; खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त, अपघातांचा धोका वाढला
3

Buldhana News : पहिल्याच पावसात रस्त्यांची दैना; खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त, अपघातांचा धोका वाढला

Buldhana crime news: तलवारीने कापला केक; तिघांवर गुन्हा दाखल, वडगाव खंडोपत येथील घटना
4

Buldhana crime news: तलवारीने कापला केक; तिघांवर गुन्हा दाखल, वडगाव खंडोपत येथील घटना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.