Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिरपूर येथील आगीत चार दुकानातील साहित्य खाक; वाशिम, मालेगाव, रिसोड येथील अग्निशमनदल दाखल

Washim fire incident: रविवारी पहाटे रपूर येथील के. कोंडबा तात्या ढवळे विद्यालयासमोरील टिनशेडमधील चार दुकानांना भीषण आग लागून संपूर्ण साहित्य जळून खाक झाले. वाशिम, मालेगाव आणि रिसोड येथील अग्निशमन दलाने अनेक तासांच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणली.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 27, 2026 | 01:40 PM
शिरपूर येथील आगीत चार दुकानातील साहित्य खाक; वाशिम, मालेगाव, रिसोड येथील अग्निशमनदल दाखल
Follow Us
Follow Us:
  • शिरपूर येथील आगीत चार दुकानातील साहित्य खाक
  • वाशिम, मालेगाव, रिसोड येथील अग्निशमनदल दाखल
  • संपूर्ण माल आगीत भस्मसात
शिरपूर: येथील के. कोंडबा तात्या ढवळे विद्यालयासमोरील टिनशेडमधील चार दुकानांना रविवारी पहाटे ३.३० वाजताच्या सुमारास भीषण आग लागून नुकसान झाले, आगीने काही क्षणांतच रौद्ररूप धारण केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. वाशिम, मालेगाव आणि रिसोड येथून अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यानंतर अनेक तासांच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात आली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी चारही व्यावसायिकांचा वर्षानुवर्षांचा संसार आणि व्यवसायाचे संपूर्ण साहित्य आगीत भस्मसात झाले.

Buldhana crime news: तलवारीने कापला केक; तिघांवर गुन्हा दाखल, वडगाव खंडोपत येथील घटना

पहाटेच्या सुमारास परिसरातील नागरिकांना दुकानांमधून धुराचे लोट आणि आगीच्या ज्वाळा दिसल्यानंतर घटनेची माहिती पोलिस व स्थानिक नागरिकांना देण्यात आली. सकाळची वेळ असल्याने रस्त्यावर वर्दळ कमी होती. त्यामुळे आग लागल्याचे उशिरा लक्षात आले. तोपर्यंत आगीने चारही दुकानांना बेहा घातल्ला होता.या आगीत आकाश भालेराव यांचे ऑटोमोबाईल व दुचाकी दुरुस्तीचे दुकान, गजानन गाभणे यांचा आरओ अॅक्वा फिल्टर पाण्याचा प्लांट, ओंकार भांदुर्गे यांचे चहा-नाश्त्याचे हॉटेल तसेच मदन इंगोले यांचे कृषी सिंचन साहित्याचे दुकान पूर्णपणे जळून खाक झाले, आकाश यांच्या गरजमध्ये दुरुस्तीसाठी आलेल्या ग्राहकांच्या अनेक दुचाक्याही आगीत जळून गेल्या. वाहनांचे केवळ लोखंडीसांगाडे शिल्लक राहिल्याचे विदारक चित्र पाहायला मिळाले, गॅरेजमधील यंत्रसामग्री, स्पेअर पार्ट्स, तेलाचे डबे व इतर साहित्य पूर्णतः नष्ट झाले.

गाधणे यांच्या आरओ प्लांटमधील पाण्याच्या टाक्या, कॅन, मोटारी, फिल्टर यंत्रणा, विद्युत वायरिंग आणि इतर उपकरणे जळून मोठे नुकसान झाले. ओकार भांदुर्गे यांच्या चहा-नाश्त्याच्या दुकानातील फर्निचर, खाद्यसाहित्य, गॅस शेगड्या, भांडी आणि इतर साहित्य राख झाले. मदन इंगोले यांच्या कृषी सिंचन साहित्याच्या दुकानातील पीव्हीसी पाइप, ठिबक सिंचन साहित्य, कृषी उपकरणे व विक्रीसाठी ठेवलेला संपूर्ण माल आगीत भस्मसात झाला.

शॉर्टसर्किटचा प्राथमिक अंदाज

प्राथमिक माहितीनुसार ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा अंदाज व्या करण्यात येत आहे. मात्र नेमके कारण शोधण्यासाठी संबंधित विभागाकडून तपास सुरू आहे. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यानी घटनास्थळी पंचनामा करून नुकसानीची नोंद केली,

अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न

घटनेची माहिती मिळताच शिरपूर पोलिस ठाण्याच्या ठाणेदार थोगिता भारद्वाज, पोलिस उपनिरीक्षक धनराज तायडे यांच्यासह प्रवीण गावंडे, शंकर खोडवे, नागेश देवकर, संदीप उघाडे व इतर पोलिस कर्मचारी तातडीने घटनास्थळी – दाखल झाले. त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून वाशिम, मालेगाव आणि रिसोड येथील अग्निशमन दलाला पाचारण केले. ३ अग्निशमन बंबांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. आगीची तीव्रता इतकी होती की चारही दुकाने पूर्णपणे जळून गेल्यानंतरच उसग नियंत्रणात आली.

व्यावसायिकांवर आर्थिक संकट

या आगीत चारही व्यावसायिकांनी अनेक वर्षाच्या मेहनतीने उभा कैलेला व्यवसाय काही तासात राख झाल्याने व्यापारी हतबल इझाले. स्थानिक ग्रामस्थ व सामाजिक संस्थांकडून मदतीचा हात पुढे करण्यात येत असला, तरी झालेल्या नुकसानीच्या तुलनेत ती अपुरी आहे.

Farmers News: विदर्भात २६ टक्के पेरणी बाकी, राज्यात अमरावती विभाग आघाडीवर, जिल्ह्यांमध्ये बुलढाणा ‘टॉप’

Web Title: Shirpur fire incident four shops gutted maharashtra news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2026 | 01:40 PM

Topics:  

  • buldhana news
  • fire Accident
  • Washim

संबंधित बातम्या

Buldhana News: पावसाअभावी शेती संकटात,आर्थिक वर्ष पूर्णतः कोलमडले; कोरड्या दुष्काळाच्या छायेत ‘बळीराजा’
1

Buldhana News: पावसाअभावी शेती संकटात,आर्थिक वर्ष पूर्णतः कोलमडले; कोरड्या दुष्काळाच्या छायेत ‘बळीराजा’

Washim News: मुलींसोबत दुष्कृत्य; शिक्षकाला अटक; काटा जि. प. शाळेतील प्रकार; विद्यार्थिनींच्या तक्रारीने गैरप्रकार उघड
2

Washim News: मुलींसोबत दुष्कृत्य; शिक्षकाला अटक; काटा जि. प. शाळेतील प्रकार; विद्यार्थिनींच्या तक्रारीने गैरप्रकार उघड

२१ लाखांचा मुद्देमाल जप्त; मेहकर, सिंदखेडराजा अन् बुलढाणा तालुक्यात कारवाई, अवैध बायोडिझेल विक्रीचा पर्दाफाश
3

२१ लाखांचा मुद्देमाल जप्त; मेहकर, सिंदखेडराजा अन् बुलढाणा तालुक्यात कारवाई, अवैध बायोडिझेल विक्रीचा पर्दाफाश

Buldhana News: ‘लेक लाडकी’ योजनेचा १२ हजार कुटुंबांना लाभ, मुलींच्या शिक्षणाला बळ; १४ हजार कुटुंबांची नोंदणी
4

Buldhana News: ‘लेक लाडकी’ योजनेचा १२ हजार कुटुंबांना लाभ, मुलींच्या शिक्षणाला बळ; १४ हजार कुटुंबांची नोंदणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.