Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या 260 शाळांवर असणार CCTV चा ‘डोळा’; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य

जिल्ह्यातील १३२७ शाळा असून, पहिल्या टप्प्यात जास्त पटीसंख्येच्या २६० शाळांची निवड करण्यात आली आहे. निवड झालेल्या प्रत्येक शाळेला ४ कॅमेऱ्याचा एक संच दिला जाणार आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 10, 2026 | 11:09 AM
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या 260 शाळांवर असणार CCTV चा 'डोळा'; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या 260 शाळांवर असणार CCTV चा 'डोळा'; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य

Follow Us
Follow Us:

सिंधुदुर्ग : शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. जास्त पटसंखेच्या शाळांना प्राधान्य या तत्त्वानुसार पहिल्या टप्प्यात २६० शाळांत कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. बदलापूर येथील शाळेत चार वर्षांच्या दोन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली होती. या पार्श्वभूमीवर शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता.

या अनुषंगाने शालेय इमारत व परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय शासनाने पारित केला होता. यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून शिक्षणासाठी दिल्या जाणाऱ्या पाच टक्के निधीचा वापर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्हा वार्षिक योजना २०२४/२५ व २०२५/२६ अंतर्गत प्रत्येक वर्षी दोन कोटी याप्रमाणे चार कोटी निधी शिक्षण विभागाला सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी मिळणार आहे. जास्त पटसंख्येनुसार प्राधान्यक्रमाने कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.

हेदेखील वाचा : Maharashtra Heat Wave : विदर्भात उष्णतेची लाट; मुंबई-ठाण्यासह कोकणाला ‘येलो अलर्ट, ‘ पुढील २ दिवस महत्त्वाचे

प्रत्येक शाळेला 4 कॅमेरे

जिल्ह्यातील १३२७ शाळा असून, पहिल्या टप्प्यात जास्त पटीसंख्येच्या २६० शाळांची निवड करण्यात आली आहे. निवड झालेल्या प्रत्येक शाळेला ४ कॅमेऱ्याचा एक संच दिला जाणार आहे. सांगली येथील जय इलेक्ट्रिकल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला हे काम देण्यात आले आहे. मुख्याध्यापकांच्या देखरेखीखाली आठवड्यातून तीन वेळा फुटेज तपासावे, काही आक्षेपार्ह आढळल्यास पोलिसांच्या निदर्शनास आणून द्यावे, असेही निर्देश देण्यात आले आहेत.

मुख्याध्यापकांवर जबाबदारी

संबंधित शाळांचा सर्व परिसर कव्हर करून कॅमेरे बसविण्याची जबाबदारी संबंधित मुख्याध्यापकांवर सोपवण्यात आली आहे. कॅमेरे बसविल्यानंतर ठराविक काळात त्याचे फुटेज तपासणे व काही आक्षेपार्ह बाबी आढळल्यास त्याच्यावर कारवाई करण्याची जबाबदारी मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समितीवर सोपविण्यात आली आहे.

बोर्ड परीक्षेतही सीसीटीव्ही कॅमेरा

फेब्रुवारी/मार्च २०२६ मध्ये होणाऱ्या इयत्ता दहावी व बारावीच्या शालांत परीक्षांदरम्यान कॉपीसारखे गैरप्रकार रोखण्यासाठी राज्यातील सर्व परीक्षा केंद्रांवरील प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे आदेश शालेय शिक्षण विभागाने दिले आहेत. मात्र, या आदेशासाठी कोणताही आर्थिक निधी उपलब्ध करून न देता संपूर्ण आर्थिक भार शाळा व संस्थांवर टाकण्यात आल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने केला आहे.

हेदेखील वाचा : Maharashtra Breaking News Updates Today : महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर

Web Title: Cctv will be monitoring 260 schools of sindhudurg zilla parishad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2026 | 11:07 AM

Topics:  

  • cctv cameras
  • Education Department
  • School news

संबंधित बातम्या

शालेय पोषण आहाराच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; जुन्नर तालुक्यात पुरवठा अन् गुणवत्ता तपासणी यंत्रणेची कार्यपद्धती चर्चेत
1

शालेय पोषण आहाराच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; जुन्नर तालुक्यात पुरवठा अन् गुणवत्ता तपासणी यंत्रणेची कार्यपद्धती चर्चेत

Tribal Department Scam: आदिवासी विकास विभागातील घोटाळा कुणाच्या आशीर्वादाने?
2

Tribal Department Scam: आदिवासी विकास विभागातील घोटाळा कुणाच्या आशीर्वादाने?

शिक्षणाचा बाजार! अनुदान मिळूनही जास्तीची फी? पुणे विभागातील शाळांना शिक्षण उपसंचालकांचा दणका!
3

शिक्षणाचा बाजार! अनुदान मिळूनही जास्तीची फी? पुणे विभागातील शाळांना शिक्षण उपसंचालकांचा दणका!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.