ठाणे रेल्वे स्थानकावर मध्यरात्रीपासून ६२ तासांचा मेगाब्लॉक सुरू झाला आहे. मुंबईहून कल्याणकडे जाणाऱ्या जलद मार्गावर 62 तासांचा आणि मुंबईकडे जाणाऱ्या धीम्या मार्गावर 12 तासांचा मेगाब्लॉक आहे. त्यामुळे मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडल्याचे दिसून येत आहे. ट्रेन 20 ते 25 मिनिटे उशीराने धावत आहे.. आज कामाचा दिवस असून कार्यालयात जाणाऱ्यांचे हाल सुरु आहे. त्यातच कल्याण डोंबिवली ठाणे या प्लॅटफॉर्मवर गर्दी आहे. सकाळची कामाची वेळ, उकाडा आणि गाड्या उशिरा आल्यामुळे प्रवासी हैराण झाले आहेत. तर दुसरीकडे प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी आणि बसेसच्या जादा गाड्या चालविण्यात येत आहे. पण या जादा गाड्यापण उशीराने धावत असल्यामुळे मुंबईकरांचे एकंदरित मेगाहाल झाल्याचे पाहायला मिळत आहे.
मध्य रेल्वेच्या मेगाब्लॉकमुळे रेल्वेच्या आज (31 मे) मध्य आणि हार्बर मार्गावरील 161 लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत, सध्या ठाणे स्थानकापासून 20 मिनिटांच्या अंतरावर मुंबईकर लोकल ट्रेन आहे. एका ठिकाणी जलद आणि धीम्या लोकलच्या प्रवाशांमध्ये संभ्रम आहे, नंतर ठाण्याहून मुंबईकडे जाणारा स्लो ट्रॅक कधी सुरू केला जाईल, त्यानंतर ही परिस्थिती बदलेल, अशी अपेक्षा आहे.
मध्य रेल्वेचा तीन दिवसाचा जम्बोमेगा ब्लॉकचा आज पाहिला दिवस असून रेल्वे प्रशासनाच्या आवाहनानंतर अनेक कंपन्यांनी आपल्या कामगारांना वर्क फ्रॉम होम देण्यात आले आहे. यामुळे रेल्वे स्थानकांवर रोजच्यापेक्षा कमी गर्दी पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे शासकीय कर्मचारी व ज्या कंपनीने सुट्टी दिली नाही. त्या कंपन्यांची कर्मचाऱ्यांची स्टेशल परिसरात गर्दी पाहायला मिळाली असून वेळेवरती रेल्वे नसल्याने प्रवाशांनी बसने प्रवास करण्यास पसंती दिली. यामुळे बस स्थानकावरी प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळत आगे.
दरम्यान कल्याण पश्चिमेतील बैल बाजार चौकात बस स्थानकावरती बस येत नसल्याने एक ते दीड तास बसची वाट पाहत प्रवाशांना उभे राहावे लागत आहे. एसटी व पालिका प्रशासनाने जादा बस सोडण्याचे आवाहन केले आहे. मात्र बस नसल्याने सुविधा देण्याबाबत प्रशासन फेल गेल्याचा आरोप करत पहिल्या दिवशीच प्रवाशांना मनस्तापाला सामोरे जावं लागले. त्यामुळे आणखी दोन दिवस अशाच त्रास सहन करावा लागणार की काय? असा सवाल संत्पत प्रवासी करत आहे.