Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 28 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chandrapur News: चिखलमय रस्त्यांमुळे विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास; दमपूर-मोहद्यात ग्रामस्थांचा संताप

चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील दमपूर-मोहदा परिसरात पावसामुळे रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. चिखल, साचलेले सांडपाणी आणि नालेसफाईच्या अभावामुळे नागरिकांसह विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत असून ग्रामस्थांनी तातडीच्या उपाययोजनांची मागणी केली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 28, 2026 | 02:36 PM
Chandrapur News: चिखलमय रस्त्यांमुळे विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास; दमपूर-मोहद्यात ग्रामस्थांचा संताप

Chandrapur News: चिखलमय रस्त्यांमुळे विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास; दमपूर-मोहद्यात ग्रामस्थांचा संताप

Follow Us
Follow Us:
  • दमपूर-मोहदा परिसरातील रस्ते पावसामुळे चिखलमय झाल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.
  • शाळेत जाणाऱ्या ५० ते ६० विद्यार्थ्यांना दररोज जीव धोक्यात घालून चिखलातून प्रवास करावा लागत आहे.
  • ग्रामस्थांनी रस्ते दुरुस्ती आणि नालेसफाई तातडीने करण्याची प्रशासनाकडे मागणी केली आहे.
चंद्रपूर: जिवती तालुक्यातील दमपूर-मोहदा परिसरातील रस्त्यांची पावसामुळे अक्षरशः दुरवस्था झाली आहे. संततधार पावसामुळे मुख्य रस्त्यासह अंतर्गत मार्गावर मोठ्या प्रमाणात चिखल साचला असून, नागरिकांना ये-जा करताना मोठी कसरत करावी लागत आहे. विशेषतः शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसह वृद्ध नागरिकांना या चिखलमय रस्त्यांचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

Raigad News: स्मार्ट मीटरबाबत महावितरणचं मोठं स्पष्टीकरण; ग्राहकांवर कोणतीही सक्ती केली जाणार नाही

दमपूर-मोहदा हे जवळपास ६ हजार लोकसंख्येचे महत्त्वाचे गाव आहे. मात्र, एवढी मोठी लोकसंख्या असूनही गावात मुलभूत सुविधांचा अभाव असल्याचे चित्र आहे. गावातील नाल्यांची योग्य साफसफाई न झाल्याने घरातील सांडपाणी थेट रस्त्यावर वाहत आहे. त्यातच पावसाचे पाणी मिसळल्याने रस्त्यांना चिखलाचे स्वरूप आले आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. नागरिकांना दरवर्षी अशाच समस्यांना सामोरे जावे असल्याने स्थानिक लागत नागरिकांनी संबंधित प्रशासनाने तातडीने रस्त्याची दुरुस्ती करून चिखलाची साफसफाई करावी, अशी मागणी केली आहे. पावसाळ्यात अशा समस्यांकडे त्वरित लक्ष देण्याची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. (फोटो सौजन्य – AI Created) 

ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात नाराजी

रस्त्यांची दुरवस्था आणि नात्याची साफसफाई न झाल्याने ग्रामस्थांमध्ये ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी आहे. पावसाळ्यापूर्वी आवश्यक उपाययोजना न केल्यामुळे नागरिकांना दरवर्षी अशाच समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षितता लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने रस्ते दुरुस्ती व नालेसफाईची कामे हाती घ्यावीत, अशी मागणी नागरिकांनी केली.

MPSC औषध निरीक्षक भरतीतील कथित पेपरफुटी प्रकरणाला नवे वळण; तक्रारदाराचाच यू-टर्न?

शाळेची वाट बिकट, विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास

लभंगुडा येथील शाळेत परिसरातील ५० ते ६० विद्यार्थी दररोज शिक्षणासाठी येतात. मात्र, शाळेकडे जाणाऱ्या रस्त्यावर गुडघाभर चिखल साचल्याने विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. चिखल तुडवत शाळेत पोहोचताना अनेक विद्याभ्यर्थ्यांचे पाय घसरून पडत असून, दुखापतीचा धोका वाढला आहे. पावसाळ्यात हा मार्ग विद्यार्थ्यांसाठी धोकादायक बनतो आणि पालकांमध्ये चिंतेचे वातावरण असते. प्रशासनाने तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करून विद्यार्थ्यांना सुरक्षित मार्ग उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी होत आहे.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Chandrapur dampur mohda roads turn muddy students face difficult commute in monsoon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 28, 2026 | 02:36 PM

Topics:  

  • Chandrapur
  • Marathi News
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

Agriculture News: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! युरियाची टंचाई आता कायमची संपणार! ‘या’ नवीन खताला मिळाली मंजुरी
1

Agriculture News: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! युरियाची टंचाई आता कायमची संपणार! ‘या’ नवीन खताला मिळाली मंजुरी

Engineering Admission 2026: अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या खिशावर दरोडा! सीईटी सेलकडून १७ कोटींऐवजी १०६ कोटी जमा करण्याचा डाव
2

Engineering Admission 2026: अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या खिशावर दरोडा! सीईटी सेलकडून १७ कोटींऐवजी १०६ कोटी जमा करण्याचा डाव

Chandrapur News: भेसळयुक्त दुधावर प्रशासनाचा लगाम; चंद्रपुरात दूधपुरवठ्यात ९ हजार लिटरची घट
3

Chandrapur News: भेसळयुक्त दुधावर प्रशासनाचा लगाम; चंद्रपुरात दूधपुरवठ्यात ९ हजार लिटरची घट

Monsoon Small Business: पावसाळ्यात कमी खर्चात सुरू करा ‘हे’ 5 व्यवसाय; होईल तुफान कमाई! जाणून घ्या सविस्तर
4

Monsoon Small Business: पावसाळ्यात कमी खर्चात सुरू करा ‘हे’ 5 व्यवसाय; होईल तुफान कमाई! जाणून घ्या सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.