Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 28 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chandrapur News: भेसळयुक्त दुधावर प्रशासनाचा लगाम; चंद्रपुरात दूधपुरवठ्यात ९ हजार लिटरची घट

चंद्रपूरमध्ये भेसळयुक्त दूध विक्रेत्यांवर सुरू असलेल्या प्रशासकीय कारवाईचा परिणाम आता प्रत्यक्ष दिसू लागला आहे. या कारवाईनंतर शहरातील दूधपुरवठ्यात घट झाली असली, तरी त्यामागे दुधाची कमतरता नसून भेसळयुक्त दूध विक्रीवर बसलेला आळा हे प्रमुख कारण असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 28, 2026 | 02:24 PM
Chandrapur News: भेसळयुक्त दुधावर प्रशासनाचा लगाम; चंद्रपुरात दूधपुरवठ्यात ९ हजार लिटरची घट

Chandrapur News: भेसळयुक्त दुधावर प्रशासनाचा लगाम; चंद्रपुरात दूधपुरवठ्यात ९ हजार लिटरची घट

Follow Us
Follow Us:
  • भेसळयुक्त दूध विक्रेत्यांवरील कारवाईनंतर चंद्रपूर शहरातील दूधपुरवठ्यात सुमारे ९ हजार लिटरची घट झाली.
  • प्रशासनाच्या धडक मोहिमेमुळे निकृष्ट दूध विक्रीला आळा बसल्याचे चित्र समोर आले आहे.
  • सणासुदीच्या काळात दुधाची मागणी ८ ते १० हजार लिटरने वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
चंद्रपूर: जिल्ह्यातील दूध व्यवसायावर सुरू झालेल्या कठोर प्रशासकीय कारवाईचा परिणाम आता प्रत्यक्ष दिसू लागला असून, शहरातील दूधपुरवठ्यात सुमारे ९ हजार लिटर (२%) घट झाली आहे. या घटीमागे दुधाची कमतरता नसून, भेसळयुक्त दूध विक्रीवर बसलेला आळा हे प्रमुख कारण असल्याचे चित्र आहे. प्रशासनाच्या धडक मोहिमेमुळे निकृष्ट व भेसळयुक्त दूध विक्रेत्यांचे धाबे दणाणले असून, बाहेरून येणाऱ्या अनेक छोट्या बँडचा पुरवठाही कमी झाला आहे.

Raigad News: स्मार्ट मीटरबाबत महावितरणचं मोठं स्पष्टीकरण; ग्राहकांवर कोणतीही सक्ती केली जाणार नाही

चंद्रपूर शहरात दररोज सरासरी ४० ते ४५ हजार लिटर दुधाचा पुरवठा होतो, अशी माहिती नवराष्ट्र शी बोलतांना जिल्हा दुग्ध व्यवसाय अधिकारी डॉ. वर्षा बागडे यांनी सोमवारी दिली. जिल्ह्यात सहकारी संस्थांमार्फत दररोज ७०० ते ८०० लिटर, तर खासगी डेअऱ्यांमार्फत १ लाख ते १.५० लाख लिटर दूध संकलित व वितरित केले जाते. गेल्या सहा महिन्यात शहरात २ लाख ७३ हजार २३८ लिटर दूध वितरित झाले असून, १ लाख २६ हजार २६७ लिटर दूध संकलित करण्यात आले आहे.

जिल्ह्यात एक सहकारी दूध संघ व त्याअंतर्गत ७ संस्था कार्यरत आहेत. याशिवाय मदर डेअरी, दिनशा, नंदिनीसह विविध कंपन्यांची सुमारे ११० संकलन केंद्रे आणि ७ खासगी दूध कंपन्या वितरणाचे काम करीत आहेत. नागभीड व ब्रह्मपुरी तालुक्यात सर्वाधिक दूध संकलन होत असल्याचे डॉ. बागडे यांनी सांगितले. दूध भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत ७ कारवाया केल्या. तपासणीसाठी घेतलेल्या ७नमुन्यांपैकी ३ नमुने निकृष्ट दर्जाचे आढळले विक्रेत्यांविरोधात दंडात्मक कारवाईची असून, संबंधित प्रक्रिया सुरू आहे.  (फोटो सौजन्य: Pinterest) 

सणासुदीच्या काळात वाढते दुधाची मागणी

या कारवाईनंतर बाजारातील दूध विक्री अधिक शिस्तबद्ध झाल्याचे चित्र आहे, अशी माहिती त्यांनी दिली. जिल्ह्यात सध्या ८०७ सहकारी व ४८ हजार १८ खासगी दूध उत्पादक शेतकरी दूध व्यवसायाशी जोडलेले आहेत. गाईच्या दुधाला प्रति लिटर ३२ ते ३५ रुपये, तर म्हशीच्या दुधाला ६० ते ६५ रुपये दर मिळत आहे. सणासुदीच्या काळात दुधाची मागणी नेहमीपेक्षा ८ ते १० हजार लिटरने वाढत असल्याचे डॉ. बागडे यांनी सांगितले.

Mumbai News: घाटकोपर पूर्व-पश्चिम प्रवास सुखकर होणार! कोंडीतूनही होणार सुटका, केबल-स्टेड’ पुलाचे काम वेगाने

जिल्हयात दिवसेंदिवस दुधाची मागणी वाढत आहे. ती पूर्ण करण्यासाठी जिल्ह्यात विदर्भ-मराठवाडा नावाने प्रकल्प येत आहे. त्यासाठी सर्व तयारी झाली असून, संकलन केंद्र उभारण्यात आले आहे. यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले जात आहे. – डॉ सुरेश कुंभरे, जिल्हा पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय उपायुक्त, चंद्रपूर

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Chandrapur milk supply drops after action against adulterated milk sellers chandrapur news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 28, 2026 | 02:24 PM

Topics:  

  • Chandrapur
  • Marathi News
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

Agriculture News: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! युरियाची टंचाई आता कायमची संपणार! ‘या’ नवीन खताला मिळाली मंजुरी
1

Agriculture News: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! युरियाची टंचाई आता कायमची संपणार! ‘या’ नवीन खताला मिळाली मंजुरी

Engineering Admission 2026: अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या खिशावर दरोडा! सीईटी सेलकडून १७ कोटींऐवजी १०६ कोटी जमा करण्याचा डाव
2

Engineering Admission 2026: अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या खिशावर दरोडा! सीईटी सेलकडून १७ कोटींऐवजी १०६ कोटी जमा करण्याचा डाव

Chandrapur News: चिखलमय रस्त्यांमुळे विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास; दमपूर-मोहद्यात ग्रामस्थांचा संताप
3

Chandrapur News: चिखलमय रस्त्यांमुळे विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास; दमपूर-मोहद्यात ग्रामस्थांचा संताप

Monsoon Small Business: पावसाळ्यात कमी खर्चात सुरू करा ‘हे’ 5 व्यवसाय; होईल तुफान कमाई! जाणून घ्या सविस्तर
4

Monsoon Small Business: पावसाळ्यात कमी खर्चात सुरू करा ‘हे’ 5 व्यवसाय; होईल तुफान कमाई! जाणून घ्या सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.