
मालदीवला जाणाऱ्यांसाठी मोठा इशारा! कोणतीही सबब स्वीकारली जाणार नाही, मृत्यूदंडाचीही शिक्षा होऊ शकते; कारण जाणून घ्या
Delhi Airport fire News : उड्डाणाच्या काही क्षणांपूर्वीच विमानाला आग; २३२ प्रवाशांचा थरारक बचाव
सबब चालणार नाही
मला कायद्याची माहिती नव्हती, ही सबब चालणार नाही. कोणत्याही देशात, स्थानिक कायद्यांची माहिती नसल्याचा दावा करणे कायदेशीर दंडापासून मुक्त करू शकत नाही. कायद्याचे उल्लंघन केल्यास अपरिहार्यपणे गंभीर परिणामांना सामोरे जावे लागते. जर प्रवासादरम्यान एखाद्या अनोळखी व्यक्तीने तुमचे सामान सोबत नेण्याचा आग्रह धरला किया तुम्हाला कोणतीही कृती संशयास्पद वाटली, तर त्या घटनेची माहिती त्वरित भारत सरकारच्या ‘नॅशनल नाकोटिक्स हेल्पलाइनवर (१९३३) या क्रमांकावर कळवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
एनसीबीचा सल्ला
नवीन कायद्यातील तरतुदी
नवीन नियमांनुसार, अंमली पदार्थांची तस्करी करणे किंवा केवळ अंमली पदार्थ बाळगणे या गुन्ह्यांसाठी जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. शिवाय, जर एखादी व्यक्ती मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थाच्या तस्करीमध्ये सहभागी असल्याचे आढळले, तर मृत्यूदंडाच्या शिक्षेची कायद्यात तरतूद करण्यात आली आहे. तुमच्याकडे अंमली पदाथांचे प्रमाण अगदीच कमी आहे, केवळ या कारणास्तव तुम्ही शिक्षेतून वाचाल, असा गैरसमज बाळगू नका. सुधारित कायद्यांनुसार, अंमली पदार्थांचे अगदीच सूक्ष्म प्रमाण बाळगल्याससुद्धा अत्यंत कठोर शिक्षा करण्याची तरतूद करण्यात आली आहे. अलीकडेच मालदीवमध्ये अंमली पदार्थांशी संबंधित प्रकरणांमध्ये अनेक परदेशी नागरिकांना अटक करण्यात आली, त्यात अनेक भारतीय नागरिकांचाही समावेश आहे. या गंभीर बाबीची दखल घेत, मालदीवमधील भारतीय उच्चायोग आणि एनसीबी या दोघांनीही हे प्रतिबंधात्मक पाऊल उचलले आहे.
(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)