Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 25 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chandrapur News: पेपरफुटीविरोधात चंद्रपुरात तिरंगा जनआक्रोश बाईक रॅली; केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी

दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्ज आणि विविध स्पर्धा परीक्षांमधील कथित पेपरफुटीच्या निषेधार्थ चंद्रपुरात शुक्रवारी तिरंगा जनआक्रोश बाईक रॅली काढण्यात आली.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 25, 2026 | 02:53 PM
Chandrapur News: पेपरफुटीविरोधात चंद्रपुरात तिरंगा जनआक्रोश बाईक रॅली; केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी

Chandrapur News: पेपरफुटीविरोधात चंद्रपुरात तिरंगा जनआक्रोश बाईक रॅली; केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी

Follow Us
Follow Us:
  • पेपरफुटी आणि विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जाच्या निषेधार्थ चंद्रपुरात तिरंगा जनआक्रोश बाईक रॅली काढण्यात आली.
  • रॅलीत विद्यार्थ्यांना न्याय, केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा आणि निष्पक्ष चौकशीची मागणी करण्यात आली.
  • खा. प्रतिभा धानोरकर यांनी अमित शाह यांना पत्र पाठवून विद्यार्थ्यांवरील कारवाईची चौकशी व गुन्हे मागे घेण्याची मागणी केली.
चंद्रपूर: दिल्लीतील जंतर-मंतर येथे विविध स्पर्धा परीक्षांमधील कथित पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडी, आम आदमी पक्ष, संभाजी ब्रिगेड तसेच विविध सामाजिक संघटनांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी चंद्रपुरात ‘तिरंगा जनआक्रोश बाईक रॅली’ काढण्यात आली. रॅलीदरम्यान विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा आणि पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी, अशा मागण्यांसह केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

मोदींच्या नावावर मतं मागणारे दादा आपण कुठे आंबे चोरत आहात? अमोल बालवडकरांचा चंद्रकांत पाटलांना सवाल

दुपारी ३ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकातून रॅलीला प्रारंभ झाला. शहरातील प्रमुख मार्गावरून शिस्तबद्ध आणि जोशपूर्ण वातावरणात मार्गक्रमण करत रॅली सायंकाळी दीक्षाभूमी येथे पोहोचली. तेथे राष्ट्रगीताने रॅलीचा समारोप करण्यात आला. रॅलीत राजेंद्र वैद्य, शिवा राव, संदीप गिरे, दिलीप चौधरी, नागवंश नगराळे, रामू तिवारी, नरेंद्र बोबडे, संतोष कुचनकर यांच्यासह विविध पक्ष व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी, महिला प्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. समारोपस्थळी मनपा स्थायी समितीचे सभापती मनस्वी गिरे, पार्षद राजेश अडूर, ॲड. राहुल घोटेकर, सचिन कल्याळ, प्रवीण पडवेकर, दीपक जेजूरकर, बृजप्रकाश थमके, अनु दहेगांवकर तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिभा धानोरकरांचे अमित शाह यांना पत्र

नीट परीक्षेतील कथित गैरव्यवहार आणि दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जाच्या निषेधार्थ खा. प्रतिभा धानोरकर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र पाठवून तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली. विद्यार्थ्यांवरील पोलिस कारवाई अमानुष असून, त्यांच्या न्याय्य मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.

BEST Bus Action: BEST बसचालकांसाठी नवा नियम; प्रवाशांच्या सुरक्षेसाठी साध्या वेशात अधिकारी ठेवणार पाळत

लाठीचार्जात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना मोफत व उच्च दर्जाचे वैद्यकीय उपचार उपलब्ध करून द्यावेत, तसेच आंदोलनादरम्यान दाखल करण्यात आलेले सर्व गुन्हे बिनशर्त मागे घ्यावेत, अशी मागणी त्यांनी केली. विद्यार्थ्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवून धमकावणाऱ्या संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, असेही त्यांनी पत्रात नमूद केले. नीट परीक्षेतील कथित अनियमिततेमुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ झाल्याचा आरोप करत या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशीही त्यांनी मागणी केली.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Chandrapur tiranga bike rally against paper leak and lathicharge on students

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 25, 2026 | 02:53 PM

Topics:  

  • Chandrapur
  • Marathi News
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

Chandrapur News: पहिल्याच पावसात राजुरा सर्व्हिस रोडची दुरवस्था; खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका वाढला
1

Chandrapur News: पहिल्याच पावसात राजुरा सर्व्हिस रोडची दुरवस्था; खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका वाढला

Raigad News: लोणेरेतील शेतात गटाराचे सांडपाणी; पिकांचे नुकसान, संतप्त शेतकऱ्यांचा उपोषणाचा इशारा
2

Raigad News: लोणेरेतील शेतात गटाराचे सांडपाणी; पिकांचे नुकसान, संतप्त शेतकऱ्यांचा उपोषणाचा इशारा

Zomato News: हॉटेलपेक्षा ऑनलाईन जेवण महाग का? CCI कडून जोमॅटोला क्लीन चिट; ‘हे’ कारण ठरले महत्त्वाचे!
3

Zomato News: हॉटेलपेक्षा ऑनलाईन जेवण महाग का? CCI कडून जोमॅटोला क्लीन चिट; ‘हे’ कारण ठरले महत्त्वाचे!

Health Workers Protest: आरोग्य कर्मचाऱ्यांचा ‘अन्नत्याग’! वसई-विरार महापालिकेच्या 500 कर्मचाऱ्यांचा वेतन हक्कासाठी लढा
4

Health Workers Protest: आरोग्य कर्मचाऱ्यांचा ‘अन्नत्याग’! वसई-विरार महापालिकेच्या 500 कर्मचाऱ्यांचा वेतन हक्कासाठी लढा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.