Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Health Workers Protest: आरोग्य कर्मचाऱ्यांचा ‘अन्नत्याग’! वसई-विरार महापालिकेच्या 500 कर्मचाऱ्यांचा वेतन हक्कासाठी लढा

वसई-विरार शहर महापालिकेच्या विविध रुग्णालये आणि आरोग्य केंद्रांमधील सुमारे ५०० कंत्राटी व ठोक मानधनावरील आरोग्य कर्मचाऱ्यांनी आपल्या न्याय्य मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. २०१७ च्या महासभेतील ९० टक्के वेतनाच्या ठरावाची अंमलबजावणी, वेतनातील थकबाकी, पीएफ दंडाच्या नावाखाली कपात केलेले ७९ लाख रुपये परत करणे मागणी आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jul 25, 2026 | 01:37 PM
(फोटो सौजन्य: chatgpt)

(फोटो सौजन्य: chatgpt)

Follow Us
Follow Us:
  • आरोग्य कर्मचाऱ्यांचा अन्नत्याग
  • महापालिकेच्या ५०० जणांचा वेतन हक्कासाठी लढा
  • सेवा सुरू ठेवत लढाही सुरु
VVMC Health Workers Protest: महापालिकेच्या विविध रुग्णालये व आरोग्य केंद्रांमध्ये कार्यरत असलेल्या सुमारे ५०० कंत्राटी व ठोक मानधनावरील आरोग्य कर्मचाऱ्यांनी २०१७ च्या महासभेतील ९० टक्के वेतनाच्या ठरावाची अंमलबजावणी, वेतनातील फरकाची थकबाकी, पीएफ दंडाच्या नावाखाली कपात करण्यात आलेले ७९ लाख रुपये परत करणे आणि किमान वेतन कायद्याची अंमलबजावणी या प्रमुख मागण्यांसाठी शुक्रवारपासून रुग्णसेवा अबाधित ठेवत काम बंद न करता अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.

Palghar News : सफाळे किनारपट्टीवर प्रकल्पांविरोधात एल्गार! पेट्रोलियम अन् विमानतळाला विरोध; बैठकीत जनआंदोलनाचा निर्धार

पाचशे कर्मचारी कंत्राटी किंवा ठोक मानधनावर कार्यरत

वसई-विरार महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत शहरातील दोन माता-बाल संगोपन केंद्रे, सात रुग्णालये, २१ प्राथमिक आरोग्य केंद्रे, १५ ‘आपला दवाखाना’ आणि ३५ आयुष्मान आरोग्य वर्धिनी केंद्रांमधून नागरिकांना मोफत आरोग्य सेवा दिली जाते. या सर्व ठिकाणी जीएनएम, एएनएम, पीएचएन, फार्मासिस्ट, प्रयोगशाळा सहाय्यक, क्ष-किरण तंत्रज्ञ आदी पदांवरील पाचशे कर्मचारी कंत्राटी किंवा ठोक मानधनावर कार्यरत आहेत.

अंमलबजावणी नाही

२० फेब्रुवारी २०१७ रोजी झालेल्या महापालिकेच्या महासभेत ठराव क्रमांक १४ मंजूर करून कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांना नियमित कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीच्या पहिल्या टप्प्यातील वेतन व भत्त्यांच्या ९० टक्के वेतन देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, नऊ वर्षे उलटूनही या ठरावाची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. ‘समान काम, समान वेतन’ हा घटनात्मक अधिकार असून त्याची अमलबजावणी झालेली नाही. महापालिकेच्या प्रशासकीय त्रुटीमुळे पीएफ भरण्यास झालेल्या विलंबाचा दंड कर्मचाऱ्यांच्या पगारातून कपात करून तब्बल ७९ लाख रुपये वसूल करण्यात आले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे.

निर्णय महापालिकेच्या सभेत घ्यावा लागणार

८८ कंत्राटी कर्मचाऱ्याऱ्यांच्या पीएफची रक्कम (ट्रान्सफर) करण्यात आली आहे. मात्र, ती कर्मचाऱ्याऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास विभागीय स्तरावर काही तांत्रिक अथवा प्रशासकीय अडचणी असण्याची शक्यता आहे. तसेच ९० टक्के वेतनाबाबतचा निर्णय हा महापालिकेच्या महासभेतच घ्यावा लागणार आहे. महापालिकेकडून संबंधित विभागाकडे वर्ग असल्याचं विधान आरोग्य सभापती निलेश देशमुख यांनी केलं आहे.

९० टक्के वेतनबाबतचा निर्णय धोरणात्मक

पीएफ दंडाची रक्कम महापालिकेने पिफ कार्यालयात भरणा केली आहे. ही रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा व्हावी, यासाठी महापालिका प्रयत्न करणार आहे, किमान वेतन कायद्यानुसार वेतन देण्यासाठी सुद्धा प्रशासन सकारात्मक आहे. ९० टक्के वेतनबाबतचा निर्णय धोरणात्मक असल्याने हा विषय महासभेसमोर ठेवावा लागणार आहे. त्यामुळे वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी सदर आंदोलन मागे घ्यावा, असं विधान उपायुक्त स्वाती देशपांडे यांनी केलं आहे.

आंदोलनातही बजावली नियमित आठ तास सेवा

विशेष म्हणजे, आंदोलनादरम्यान कोणतीही आरोग्य सेवा बंद ठेवली गेलेली नाही. सर्व कर्मचारी आपली नियमित आठ तासांची ड्युटी पूर्ण करून त्यानंतरही कार्यस्थळीच थांबत अन्नत्याग आंदोलन सुरू ठेवणार आहेत. मानव सेवा हीच ईश्वर सेवा या भूमिकेतून रुग्णसेवा अबाधित ठेवत आंदोलन करण्याचा निर्णय घेतल्याचे कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

पालघरमध्ये साकारणार भारतातील पहिले ऑफशोर विमानतळ; अरबी समुद्रात उभे राहणार ४५ हजार कोटींचे महाप्रकल्प

Web Title: Vasai virar health workers start annatyag protest without disrupting healthcare marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 25, 2026 | 01:37 PM

Topics:  

  • health
  • Marathi News
  • Medical
  • palghar
  • Protest
  • Protester
  • vasai
  • Vasai news

संबंधित बातम्या

Aishwarya Narkar: “तुम्ही स्वतःच 80s च्या आहात, ओरिजनल फोटो टाका…”; ऐश्वर्या नारकरांचं भन्नाट उत्तर
1

Aishwarya Narkar: “तुम्ही स्वतःच 80s च्या आहात, ओरिजनल फोटो टाका…”; ऐश्वर्या नारकरांचं भन्नाट उत्तर

Prajakta Mali: प्राजक्ताची ललितसाठी खास पोस्ट; ‘हँडसम’ म्हणत दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
2

Prajakta Mali: प्राजक्ताची ललितसाठी खास पोस्ट; ‘हँडसम’ म्हणत दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

परदेशी वैद्यकीय पदवीधारकांसाठी मोठी बातमी! FMGE Exam २०२६ चे वेळापत्रक जाहीर, ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज..
3

परदेशी वैद्यकीय पदवीधारकांसाठी मोठी बातमी! FMGE Exam २०२६ चे वेळापत्रक जाहीर, ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज..

Entertainment News: १२ वर्षांचा अनुभव, आता स्वतःचं क्लिनिक! अभिनेत्याची गणेशोत्सवात नवी सुरुवात
4

Entertainment News: १२ वर्षांचा अनुभव, आता स्वतःचं क्लिनिक! अभिनेत्याची गणेशोत्सवात नवी सुरुवात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.