Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 25 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News: लोणेरेतील शेतात गटाराचे सांडपाणी; पिकांचे नुकसान, संतप्त शेतकऱ्यांचा उपोषणाचा इशारा

रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील लोणेरे येथे गटाराचे दूषित सांडपाणी थेट शेतांमध्ये जात असल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. वारंवार तक्रारी करूनही ग्रामपंचायतीकडून उपाययोजना न झाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी आता उपोषणाचा इशारा दिला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 25, 2026 | 02:43 PM
Raigad News: लोणेरेतील शेतात गटाराचे सांडपाणी; पिकांचे नुकसान, संतप्त शेतकऱ्यांचा उपोषणाचा इशारा

Raigad News: लोणेरेतील शेतात गटाराचे सांडपाणी; पिकांचे नुकसान, संतप्त शेतकऱ्यांचा उपोषणाचा इशारा

Follow Us
Follow Us:
  • लोणेरेतील शेतकऱ्यांनी गटाराचे सांडपाणी शेतात सोडल्यामुळे शेतीचे मोठे नुकसान होत असल्याचा आरोप ग्रामपंचायतीवर केला आहे.
  • वारंवार तक्रारी करूनही कोणतीही दखल घेतली जात नसल्याने शेतकऱ्यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे.
  • दूषित सांडपाण्यामुळे जमिनीची सुपीकता कमी होत असून भात आणि कडधान्य पिकांचे उत्पादन घटत असल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे.
माणगाव: लोणेरे ग्रुप ग्रामपंचायतने मागील काही वर्षापासून लोणेरे येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या मागील बाजूला असणाऱ्या भातशेती मध्ये लोणेरे गावातील स्थानिक असणाऱ्या शेतकऱ्यांना त्यापैकी कुठल्याही शेतकऱ्यांना विश्वासात न घेता परिसरातील धनिक लोकांनी गटारांचे सांडपाणी नैसर्गिकरित्या नाल्यात सोडल्यामुळे शेतकऱ्यांच्या जमीन नापीक होत असल्यामुळे अनेकवेळा ग्रामपंचायत प्रशासनाकडे तक्रार करून कुठलीच दखल घेतली जात नसल्याने येणाऱ्या काळात उपोषणाला बसणार असल्याचे शेतकऱ्यांनी आमच्या प्रतिनिधी जवळ बोलताना सांगितले.

Maharashtra Earthquake: महाराष्ट्र हादरलं! नाशिकमध्ये 3.6 तर पालघरमध्ये 3.1 रिश्टर तीव्रतेचा भूकंप, प्रशासन सतर्क, जीवितहानी नाही

मानवी आरोग्यासाठी अत्यंत घातक अशा दूषित पाण्यामुळे पिकांची वाढ खुंटते पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव होतो आणि उत्पादनात मोठी घट येते. अन्नधान्याच्या गुणवत्तेवर विपरीत परिणाम होऊन त्याचा मानवी आरोग्यावर देखील परीणाम होत आहे. गटाराच्या पाण्यात मानवी विष्ठा आणि विविध हानिकारक जिवाणू असतात अशा गटाराच्या पाण्यावर अन्नधान्य खाल्ल्यास ते मानवी आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकतात.

नुकसानग्रस्त शेतकरी नितेश तुकाराम टेंबे, जयदास टेंबे, शाम टेंबे, सदानंद टेंबे यांच्या शेतात गटाराचे सांडपाणी साचले आहे. यामुळे उन्हाळी कडधान्य पीक देखील घेता येत नसून पावसाळ्या मध्ये तर शेत म्हणजे अक्षरशः गटारे झाली आहेत त्यामुळं उन्हाळी आणि पावसाळी शेती करणे अवघड होऊन बसले आहे. याकडे मात्र शेतकरी वर्ग ग्रामपंचायत प्रशासना कडे मागणी करून सुध्दा कुठलीही उपाययोजना करून देण्यास ग्रामपंचायत प्रशासन पूर्ण पणे अपयशी ठरले आहे.

ग्रामपंचायत प्रशासनाने यापुढे गभीरपणे विचार करण्याची गरज आहे. नवीन बांधकाम परवानगी घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना ग्रामपंचायत प्रशासनाने आणि ग्रामसेवक यांनी नवीन बांधकाम करणाऱ्यांनी नैसर्गिकरित्या पाणी जाण्यासाठी नाले, त्याचे स्वतःचे पाणी जाण्यासाठी उपाययोजना किंवा शोषखड्डे आहेत किंवा नाहीत. याची पाहणी छाननी केल्याशिवाय बांधकाम परवाने ग्रामपंचायत प्रशासनाने दिले नाहीत तर अशा समस्या यापुढे निर्माण होणार नाहीत. – शाम टेंबे, स्थानिक शेतकरी

BEST Bus Action: BEST बसचालकांसाठी नवा नियम; प्रवाशांच्या सुरक्षेसाठी साध्या वेशात अधिकारी ठेवणार पाळत

जमिनीची सुपीकता धोक्यात

लोणेरे शहरातील गटाराचे दूषित, सांडपाणी शेतात जात असल्याने भातशेतीचे शेतीचे व कडधान्ये पिकांचे अत्यंत मोठे नुकसान होत आहे तसेच प्लास्टिक पिशव्या बॉटल याने अक्षरशः शेताची दैना झालेली पहायला मिळत आहे तसेच गटारातून वाहत येणाऱ्या कचऱ्यापासून या पाण्यामुळे जमिनीची सुपीकता देखील नष्ट होते आणि पिकांवर गंभीर परिणाम होत आहेत. गटाराचे पाणी शेतात सोडल्याने जमिनीचे आरोग्य धोक्यात येऊन पिकांची प्रत आणि उत्पादन घटणे यासारखे नुकसान शेतकरी वर्गाला सहन करावे लागत आहेत.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Lonere farmers warn hunger strike over sewage water damaging farmland in raigad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 25, 2026 | 02:43 PM

Topics:  

  • Marathi News
  • NAVARASHTRA
  • raigad

संबंधित बातम्या

Chandrapur News: पहिल्याच पावसात राजुरा सर्व्हिस रोडची दुरवस्था; खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका वाढला
1

Chandrapur News: पहिल्याच पावसात राजुरा सर्व्हिस रोडची दुरवस्था; खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका वाढला

Chandrapur News: पेपरफुटीविरोधात चंद्रपुरात तिरंगा जनआक्रोश बाईक रॅली; केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी
2

Chandrapur News: पेपरफुटीविरोधात चंद्रपुरात तिरंगा जनआक्रोश बाईक रॅली; केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी

Zomato News: हॉटेलपेक्षा ऑनलाईन जेवण महाग का? CCI कडून जोमॅटोला क्लीन चिट; ‘हे’ कारण ठरले महत्त्वाचे!
3

Zomato News: हॉटेलपेक्षा ऑनलाईन जेवण महाग का? CCI कडून जोमॅटोला क्लीन चिट; ‘हे’ कारण ठरले महत्त्वाचे!

Health Workers Protest: आरोग्य कर्मचाऱ्यांचा ‘अन्नत्याग’! वसई-विरार महापालिकेच्या 500 कर्मचाऱ्यांचा वेतन हक्कासाठी लढा
4

Health Workers Protest: आरोग्य कर्मचाऱ्यांचा ‘अन्नत्याग’! वसई-विरार महापालिकेच्या 500 कर्मचाऱ्यांचा वेतन हक्कासाठी लढा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.