
Chandrapur News: पहिल्याच पावसात राजुरा सर्व्हिस रोडची दुरवस्था; खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका वाढला
Chandrapur News: पेपरफुटीविरोधात चंद्रपुरात तिरंगा जनआक्रोश बाईक रॅली; केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी
राजुरा शहरापासून काही अंतरावर सुमठाणा परिसरात नागपूर-हैदराबाद (व्हाया आदिलाबाद) राष्ट्रीय महामार्गावर राजुरा शहरात प्रवेश करण्यासाठी स्वतंत्र सर्व्हिस रोड तयार करण्यात आला आहे. हा महामार्ग पूर्ण होऊन सहा महिन्यांचाही कालावधी लोटलेला नसताना पहिल्याच पावसात या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. सध्या गडचांदूर व कोरपना मार्गावरून येणारे काही चारचाकी व दुचाकी वाहनचालक या रस्त्याचा वापर करीत असले, तरी रस्त्याच्या दुरवस्थेमुळे त्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. पावसामुळे खड्यांमध्ये पाणी साचत असल्याने वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही आणि अपघाताचा धोका वाढला आहे.
गेल्या तीन वर्षांत राष्ट्रीय महामार्गाच्या कामादरम्यान झालेल्या निष्काळजीपणामुळे अनेक दुचाकीस्वारांना आपला जीव गमवावा लागल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी बामणीजवळ झालेल्या अपघातानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याशिवाय वर्धा नदीवरील कठडे नसलेल्या पुलावरून चिखलयुक्त रस्त्यावरून प्रवास करण्याऐवजी अनेक नागरिक राजुरा-सास्ती या पर्यायी मार्गाने लांबचा प्रवास करून सुरक्षिततेला प्राधान्य देत आहेत. त्यामुळे वेळ आणि इंधनाचा अतिरिक्त खर्चही सहन करावा लागत आहे. केंद्रीय रस्ते नितीन वाहतूक मंत्री गडकरी यांनी देशात जागतिक दर्जाचे महामार्ग उभारण्याचे आश्वासन दिले होते. मात्र राजुरा-आदिलाबाद राष्ट्रीय महामार्गावरील सर्व्हिस रोडची पहिल्याच पावसात झालेली दुरवस्था या दाव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करत असल्याची प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत. ‘
मोदींच्या नावावर मतं मागणारे दादा आपण कुठे आंबे चोरत आहात? अमोल बालवडकरांचा चंद्रकांत पाटलांना सवाल
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या मार्गाची तातडीने पाहणी करून खड्डे बुजवावेत, सर्व्हिस रोडची दर्जेदार दुरुस्ती करावी आणि संबंधित कंत्राटदाराच्या कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. अनेक अपघात या रस्त्यावर झाले मात्र कंपनी मृताची किंमत ठरवून मोकळे होत आले आहे. मात्र रस्ता दुरुस्तीकडे लक्ष नाही अजूनही या रस्त्याने मोठी दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी संबंधित यंत्रणेलाच घ्यावी लागेल, असा इशाराही नागरिकांनी दिला.