28 लाखांची नोकरी सोडून बनला ठग; IIT च्या मित्रासोबत 400 कोटींहून अधिक रुपयांचा लावला चूना
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतील तब्बल 3.70 कोटी रुपयांवर सायबर गुन्हेगारांनी डल्ला मारण्याचा प्रकार पुढे आला आहे. सायबर गुन्हेगारांनी 7 ते 10 फेब्रुवारीदरम्यान अनेक व्यवहारांमध्ये दिल्ली आणि नोएडा येथील खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर केले आहेत. सुटीच्या दिवशी हा प्रताप केला असावा, अशी शंका बँकेचे सीईओ राजेश्वर कल्याणकर यांनी ‘नवराष्ट्र’शी बोलताना व्यक्त केली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
हेदेखील वाचा : Pune News : PMPML बसच्या पास दरात लवकरच वाढ होणार? वाढती तूट भरून काढण्यासाठी घेतला जाणार निर्णय
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून आरटीजीएसद्वारे हस्तांतरित केलेली रक्कम नागपूर येथील येस बँकेमार्फत लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केली जाते. त्याचप्रमाणे, 7 आणि 10 फेब्रुवारी या दोन दिवसांत 34 खातेदारांच्या खात्यांमधून आरटीजीएसद्वारे ही रक्कम हस्तांतरित झाली. तथापि, हस्तांतरित रक्कम संबंधित खात्यांमध्ये जमा झाली नाही. त्यामुळे संशय निर्माण झाला. 3.70 कोटी रुपये मूळ खात्यात जमा होण्याऐवजी इतरत्र हस्तांतरित झाल्याचे पुढे आले.
ग्राहक असलेल्या बँकांना केले टार्गेट
या विषयावर बोलताना सीडीसीसी बँकेचे सीईओ राजेश्वर कल्याणकर म्हणाले, ‘सायबर दरोडेखोरांनी आमचे ग्राहक असणाऱ्या बँकांना टार्गेट केले. झालेला व्यवहार तपासण्यात येत असून, यासाठी आमची आयटी टीम व टाटा कन्सल्टन्सी काम करत आहे. आतापर्यंत 80 ते 90 लाख आम्ही परत मिळविले आहेत. यापूर्वी, असा अटॅक रिझर्व बँकेवरही झाला आहे.
पुण्यातील नागरिकांची तब्बल 1.89 कोटींची फसवणूक
सायबर चोरट्यांनी शेअर बाजारातील गुंतवणूक तसेच ऑनलाईन टास्कचे आमिष यासह वेगवेगळ्या कारणांनी पुण्यातील नागरिकांची तब्बल १ कोटी ८९ लाखांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी ४२ वर्षीय महिलेने डेक्कन पोलिसांत तक्रार दिली आहे. तक्रारदार जिमखाना भागात राहण्यास आहेत. त्यांना चोरट्यांनी शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखविले. त्यांच्याकडून वेगवेगळ्या कारणांनी ४ लाख ८ हजार ४९९ रुपयांची फसवणूक केली. कोरेगाव भागातील एकाची शेअर बाजारात गुंतवणूक व लोणावळ्यात बंगला खरेदी करुन देण्याच्या आमिषाने १ कोटी १२ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केली आहे.
हेदेखील वाचा : Rajan Salvi News: एकनाथ शिंदेचं ‘मिशन टायगर ‘ कामयाब; ठाकरेंना ‘जय महाराष्ट्र,’ राजन साळवी हाती धनुष्यबाण घेणार