Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 27 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chandrapur News: कोट्यवधींच्या रस्त्याची उधळपट्टी? नागभीडमध्ये नव्याने बांधलेला रस्ता पुन्हा खोदला, नागरिकांमध्ये संतापाची लाट

नागभीड शहरात लाखो रुपये खर्चून बांधण्यात आलेला सिमेंट काँक्रीट रस्ता काही दिवसांतच पुन्हा खोदण्यात आल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. पेव्हर ब्लॉकची सुविधा उपलब्ध असतानाही थेट रस्ता फोडल्याने प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 31, 2026 | 11:11 AM
1072 किमीच्या पुणे ग्रँड-2 साठी रस्ते सज्ज होणार; सप्टेंबरनंतर खोदाईला नकार, जिल्हा प्रशासन पाठवणार पत्र

1072 किमीच्या पुणे ग्रँड-2 साठी रस्ते सज्ज होणार; सप्टेंबरनंतर खोदाईला नकार, जिल्हा प्रशासन पाठवणार पत्र

Follow Us
Follow Us:
  • पेव्हर ब्लॉकची व्यवस्था असतानाही नागभीडमध्ये नव्याने बांधलेला सिमेंट रस्ता खोदण्यात आल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
  • रस्ता खोदून चार दिवस उलटले तरी दुरुस्तीचे काम सुरू न झाल्याने वाहनचालक आणि पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
  • सार्वजनिक निधीचा अपव्यय झाल्याचा आरोप करत नागरिकांनी या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे.
नागभीड: शहरात नगर परिषदेच्या नियोजनशून्य आणि बेजबाबदार कारभाराचा आणखी एक नमुना समोर आला आहे. लाखो रुपये खर्चुन बांधण्यात आलेला सिमेंट काँक्रीट रस्ता अवघ्या काही दिवसातच पुन्हा खोदण्यात आल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे रस्ता फोडून चार दिवस उलटूनही संबंधित विभागाकडून दुरुस्तीचे कोणतेही काम करण्यात आलेले नाही.

Raigad News: महाडमध्ये दूषित पाण्याचा कहर! पानसरे मोहल्ल्यात दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे नागरिक हैराण

सिमेंट काँक्रीट रस्ते बांधताना भविष्यात पाणीपुरवठा, वीज केबल, दूरसंचार किंवा इतर युटिलिटी सेवांच्या दुरुस्ती व देखभालीसाठी रस्ता खोदावा लागू नये, यासाठी ठराविक अंतरावर पेव्हर ब्लॉक बसविण्याची तरतूद केली जाते. या सुविधेसाठी सार्वजनिक निधीतून मोठ्या प्रमाणावर खर्च करण्यात येतो. मात्र, नागभीडमध्ये या तांत्रिक सुविधेकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे दिसून येत आहे. ज्या ठिकाणी अवघ्या दोन मीटर अंतरावर पेव्हर ब्लॉकची सोय उपलब्ध होती, त्या ठिकाणीही महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी आणि पाणीपुरवठा विभागाच्या कामासाठी थेट सिमेंट काँक्रीट रस्ता खोदण्यात आला. यामुळे रस्त्याचे मोठे नुकसान झाले असून नागरिकांना वाहतुकीदरम्यान अडचणींचा सामना करावा लागत आहे.

रस्ता उखडलेल्या अवस्थेत असल्याने वाहनचालक, पादचारी तसेच ज्येष्ठ नागरिकांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. धूळ, चिखल आणि वाहतुकीतील अडथळ्यांमुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहे. एकीकडे शासन दर्जेदार आणि टिकाऊ रस्त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करत असताना, दुसरीकडे स्थानिक प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे सार्वजनिक निधीचा अपव्यय होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. या गंभीर समस्येकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडून दुर्लक्ष होत असल्याचे आरोप नागरिकांनी केला. रस्ता खोदण्यापूर्वी योग्य नियोजन का करण्यात आले नाही, पेव्हर ब्लॉकचा वापर का करण्यात आला नाही आणि चार दिवस उलटूनही दुरुस्तीचे काम का सुरू झाले नाही.

पेव्हर ब्लॉक असताना रस्ता खोदण्याची गरज काय? आणि खोदकाम केल्यानंतर चार दिवसांपासून दुरुस्ती का नाही? असा संताप व्यक्त केला. तसेच याप्रकरणाची तातडीने चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी व रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी – शिरीष वानखेडे, माजी नगरसेवक, नागभीड

पोहण्याचा मोहच बेतला जीवावर; साठवण तलावात बुडून तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू, ‘ते’ स्वप्न राहिले अधुरेच…

नागरिकांमध्ये तीव्र संताप

शहरात मोठ्या प्रमाणात सिमेंट रस्ते बांधण्यात आले आहे. त्यामुळे प्रशासनाने लाखों रुपये खर्च केले. तसेच रस्ते बांधताना भविष्यातील कामांसाठी पेव्हर ब्लॉकची व्यवस्था करण्यात आली असताना, त्याचा वापर न करता थेट सिमेंट रस्ताच का खोदण्यात आला? त्यामुळे नागरिकांमध्ये संताप निर्माण झाला आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचार्‍यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Public outrage in nagbhid as newly built cement road is dug up within days

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2026 | 11:11 AM

Topics:  

  • Chandrapur
  • Marathi News
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

Credit Card : क्रेडिट कार्डचा वापर तुफान वाढला! महिन्याभरात 2 लाख कोटींहून अधिक खर्च; ‘हे’ दोन बँक अव्वल स्थानी
1

Credit Card : क्रेडिट कार्डचा वापर तुफान वाढला! महिन्याभरात 2 लाख कोटींहून अधिक खर्च; ‘हे’ दोन बँक अव्वल स्थानी

बापरे! सर्वात महागडा घटस्फोट… 35 वर्षांचा संसार मोडला, ‘हा’ बिझनेसमॅन पत्नीला देणार तब्बल 82 अब्ज रुपये
2

बापरे! सर्वात महागडा घटस्फोट… 35 वर्षांचा संसार मोडला, ‘हा’ बिझनेसमॅन पत्नीला देणार तब्बल 82 अब्ज रुपये

E20 Janta Party: मुद्दा पेटणार? CJP नंतर आता E20 जनता पार्टीची एन्ट्री! 100% शुद्ध पेट्रोलची सोशल मीडियावर मोठी मागणी
3

E20 Janta Party: मुद्दा पेटणार? CJP नंतर आता E20 जनता पार्टीची एन्ट्री! 100% शुद्ध पेट्रोलची सोशल मीडियावर मोठी मागणी

Air Suvidha 2.0 च्या नावाखाली ऑनलाईन घोटाळा! बनावट वेबसाईटवरुन पैशांची मागणी; सरकारने दिला इशारा
4

Air Suvidha 2.0 च्या नावाखाली ऑनलाईन घोटाळा! बनावट वेबसाईटवरुन पैशांची मागणी; सरकारने दिला इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.